Mumbai Pune Nagpur News Updates 13 May 2025 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के लागला. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही घट झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे. त्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के निकाल लागला आहे.

तसेच, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात आज (मंगळवारी) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार,पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.

या बातम्यांसह मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 13 May 2025

22:30 (IST) 13 May 2025

न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटींच्या अपहाराप्रकरणी आरोपपत्र दाखल, १० आरोपींविरोधात आरोपपत्र

न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १० आरोपींविरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. १२ हजार ६३४ पानांचे हे आरोपपत्र आहे. …सविस्तर बातमी
22:18 (IST) 13 May 2025

‘सीबीएसई’च्या दहावी, बारावीच्या निकालात किंचित वाढ

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवार, १३ मे रोजी जाहीर झाला. …अधिक वाचा
21:33 (IST) 13 May 2025

सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी

सोलापूर: यंदाच्या तप्त उन्हाळ्यात सोलापुरात गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात घट होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी आकाशात ढगांचा गडगडाट होऊन अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

सोलापूर शहर व परिसरासह उत्तर व दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात आणखी बदल होऊन तापमानात घट झाली.

शहर व परिसरात अवकाळी पाऊस सुरू होताच सार्वत्रिक समाधान व्यक्त करण्यात आले. उष्णतेमुळे वैतागलेल्या लहान मुलांनी पावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटला. दुसरीकडे ग्रामीण भागात शेतात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकरीही सुखावले.

20:28 (IST) 13 May 2025

मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० टक्के, उत्तीर्णांची टक्केवारी ९५.८४

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यंदा मुंबई विभागातील ८ विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी म्हणजे १०० टक्के गुण मिळाले आहेत. …वाचा सविस्तर
20:18 (IST) 13 May 2025

इंंटरनेटवर कॉलगर्ल शोधणे तरुणाला पडले महागात, तरुणाला लाखोंचा सायबर गंडा

इंटरनेटवर कॉलगर्ल सेवा शोधणे २३ वर्षीय तरूणाला भलतेच महागात पडले. आरोपींनी पोलीस तक्रारीसह तरूणाला बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांला विविध बँक खात्यात सहा लाख १० हजार रुपये हस्तांतरित करण्यास भाग पाडले. …वाचा सविस्तर
20:10 (IST) 13 May 2025

ओशिवरा खाडीवर पूल बांधण्यास महापालिका प्रशासनाला परवानगी द्या, उच्च न्यायालयाचे एमसीझेडएमएला आदेश

प्रस्तावित प्रकल्पासाठी ३१ खारफुटींची कत्तल करावी लागणार आहे. परंतु, हा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे. त्यामुळे, खारफुटी कापण्यास परवानगी देत असल्याचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. …सविस्तर बातमी
19:12 (IST) 13 May 2025

मुंढव्यात शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य; अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य

पुणे : शेजाऱ्याने साडेसात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेला पीडित मुलीचा शेजारी आहे. त्याने ११ मे रोजी मुलीला खेळायला नेण्याच्या बहाण्याने सोसायटीतील गच्चीवर नेले. त्यानंतर त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या शेजाऱ्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

19:07 (IST) 13 May 2025

पुण्यात ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून फसवणूक सुरूच; कात्रज-कोंढवा परिसरातील महिलेला सायबर चोरट्यांचा गंडा

नामवंत हाॅटेलची जाहिरात समाज माध्यमात प्रसारित करून त्याला दर्शक पसंती मिळवून दिल्यास दररोज १५०० ते सहा हजार रुपये मिळवा, असे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. …अधिक वाचा
18:49 (IST) 13 May 2025

मुख्यमंत्र्यांसोबत होणारी ओबीसी संघटनांची बैठक तडकाफडकी रद्द का झाली ?

स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे २७ टक्के आरक्षण कायम राहावे, जात निहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या ओबाीसी संघटनांच्या होत्या. …वाचा सविस्तर
18:41 (IST) 13 May 2025

बुध्द पोर्णिमेच्या रात्री ताडोबात निसर्ग अनुभव; ६३ वाघांसह ५ हजार ५०२ वन्यप्राणी…

पर्यटकांना सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वनविभागाच्या मदतीने १६ प्रवेशद्वारांवरून मचाणीवर पोचवले आहे. तर कोर क्षेत्रातील ९६ मचाणीवर वन कर्मचारी सहभागी झाले होते …अधिक वाचा
18:20 (IST) 13 May 2025

Akola District SSC Result 2025 : दहावीच्या निकालातही अकोल्याची घसरणच; ८९.३५ टक्के निकालासह अमरावती विभागात तळाशी

दहावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातून २५ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २५ हजार २२९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील २२ हजार ५४४ म्हणजेच ८९.३५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. …अधिक वाचा
18:17 (IST) 13 May 2025

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अडचणीत वाढ, युवकाला धमकी,जातीवाचक शिवीगाळ

अभिषेक सिंगने आपल्याला ‘तुझे ऐसे झुठे केस में फसाऊंगा की जेल मे सडा राहेगा’ अशी धमकी दिल्याचेही प्रशांत याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. …सविस्तर बातमी
17:53 (IST) 13 May 2025

एकाच दिवशी तीन निकाल जाहीर; मिठाईच्या व्यवसायावर याचा काय परिणाम झाला माहिती आहे का?

निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये धाव घेतली आहे. शहराच्या अनेक शाळांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. …सविस्तर वाचा
17:34 (IST) 13 May 2025

Yavatmal SSC Result 2025 : यवतमाळात मुलींचीच सरशी; दहावीचा निकाल ९१.५१ टक्के… दोन शाळांचा निकाल मात्र….

दहावीत १९ हजार ८७९ मुले परीक्षेला बसली होती. त्यापैकी १७ हजार ६९३ मुले उत्तीर्ण झाली. तर १७ हजार ९४१ मुलींपैकी १६ हजार ९१९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. …वाचा सविस्तर
16:42 (IST) 13 May 2025

सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहे आजचे दर…

शस्त्रसंधीनंतर सोमवारी सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९४ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये नोंदवले गेले. …सविस्तर बातमी
16:32 (IST) 13 May 2025

भाजपने भाकरी फिरवली, शहराचे जिल्हाध्यक्ष बदलले तर ग्रामीणसाठी दोन नवे अध्यक्ष

विद्यमान शहर अध्यक्ष बंटी कुकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक मानले जातात. आमदार प्रवीण दटके  यांचे नाव अचानक या पदासाठी पुढे आले होते. …सविस्तर बातमी
16:12 (IST) 13 May 2025

अकोल्यातील ‘मोर्णामाय’ने घेतला मोकळा श्वास, सलग दीड महिना…. 

दाट जलकुंभीमुळे दम घोटलेल्या मोर्णा नदीने आता मोकळा श्वास घेतला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रातील ४.३ कि.मी.चा परिसर स्वच्छ करून जलकुंभी मुक्त करण्यात आला. …सविस्तर बातमी
16:09 (IST) 13 May 2025

पिंपरी- चिंचवड: जगतापांच्या वाटेवर ‘काटे’ टाकणाऱ्या शत्रुघ्न बापू शहराध्यक्ष पदी

भाजप चे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यासंदर्भात घोषणा केली. …वाचा सविस्तर
16:06 (IST) 13 May 2025

सायकल मार्गिकेसाठी ८० कोटी रुपयांचा चुराडा, मार्गिका बांधण्यासाठी ५५ कोटी, तर आता हटविण्यासाठी २५ कोटी खर्च

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथे सायकल मार्गिका बांधली होती. एमएमआरडीएने २०११ मध्ये कार्यान्वित केलेल्या या सायकल मार्गिकेचा शून्य वापर झाला. …सविस्तर बातमी
15:55 (IST) 13 May 2025

Palghar SSC Result 2025: जिल्ह्याचा १० वीचा निकाल ९५.३८ टक्के , मुलांच्या तुलनेत मुली दोन टक्क्यांनी पुढे

palghar Maharashtra SSC Result 2025 माध्यमिक परीक्षा दहावीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षेला बसलेल्या ६३ हजार ६१७ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. …अधिक वाचा
15:53 (IST) 13 May 2025

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ठरतेय शासकीय सेवचे प्रवेशद्वार, तब्बल ७२ जण…

शहरातील युवकांसाठी अभ्यासिका असावी या धोरणात्मक दूरदृष्टीने स्थानिक आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी या अभ्यासिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला. …सविस्तर बातमी
15:38 (IST) 13 May 2025

नवीन संच मान्यतेमुळे भंडारा जिल्ह्यातील ३९ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर; अनेक शिक्षक होणार अतिरिक्त

२०२४ – २५ च्या सदोष संच मान्यतेमुळे शाळांना अध्ययन-अध्यापन करताना शिक्षकच मिळणार नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे. …वाचा सविस्तर
15:06 (IST) 13 May 2025

दहावीचा निकाल कमी होऊनही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस… तज्ज्ञांचे म्हणणे काय?

गेल्यावर्षीपर्यंत पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर या पाच विभागांपुरती मर्यादित असलेली अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. …सविस्तर वाचा
14:35 (IST) 13 May 2025

यंदा दहावीचा निकाल १.७१ टक्क्यांनी घटला आहे; दहावीचा निकाल का घटला… राज्य मंडळाचे म्हणणे काय?

राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९९.३२ टक्के, तर गडचिरोली जिल्ह्याला निकाल सर्वांत कमी ८२.६७ टक्के लागला. …वाचा सविस्तर
14:06 (IST) 13 May 2025

नांदुऱ्यात भीषण अपघात; पती पत्नीसह मुलाचा मृत्यू ! चौघे गंभीर,

प्राप्त माहितीनुसार अपघातात ठार झालेले कुटुंब मराठवाडा विभागातील आहे. हे कुटुंब  लोकरवाडी तालुका माहूर , जिल्हा नांदेड येथील राहणारे आहे. …सविस्तर बातमी
13:13 (IST) 13 May 2025

राज्यात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळणार कसे? एकाही महाविद्यालयात १०० टक्के शिक्षक…

एकूण महाविद्यालयांपैकी १० महाविद्यालयात तर निम्म्याहून कमी शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सेवेवरील शिक्षकांवर कामाचा ताण वाढत आहे. …सविस्तर बातमी
13:01 (IST) 13 May 2025

गोखले पूल सुरू झाला…इतर उड्डाणपुलांच्या कामांचे काय ?

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकावरून जाणाऱ्या गोखले पूलाचा काही भाग २०१८ मध्ये अक्षरश: रेल्वे रुळांवर पडला. या दुर्घटनेत पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा अंत झाला. …वाचा सविस्तर
12:47 (IST) 13 May 2025

पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांकडून अटक; काडतुसे जप्त

सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त करण्यात आली. शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद असे अटक करण्यात आलेल्या सराइताचे नाव आहे. …सविस्तर बातमी
12:47 (IST) 13 May 2025

तंबाखू तस्करीतून गडचिरोलीत शेकडो कोटींची उलाढाल?, पोलिसांची कारवाई संशयास्पद…

गेल्या महिनाभरात दक्षिण गडचिरोलीतील अहेरी, आष्टी पोलीस हद्दीत कारवाई करीत पोलिसांनी तंबाखू तस्करांना अटक केली …अधिक वाचा
12:33 (IST) 13 May 2025

सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना : सामान्यांसाठी घरांच्या किमती कायम ठेवण्याचा म्हाडाकडून प्रस्ताव

सध्या या घरांपोटी विकासकांना रेडी रेकनरच्या १२५ टक्के दर आकारता येतो. यापैकी पाच टक्के रक्कम म्हाडाला सुपूर्द करणे बंधनकारक आहे. …सविस्तर बातमी

मुंबई पुणे नागपूर  ब्रेकिंग न्यूज टुडे