Maharashtra News Live Updates, 07 October 2025: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे महाराष्ट्राचे असल्याने राज्यातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये “संविधान सन्मान आंदोलन” आयोजित केले आहे.

याचबरोबर, राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी प्रशासनाकडून काम सुरू आहे. तसेच, येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठीही राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यासह राज्यातील विविध घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Latest Marathi News Today

13:29 (IST) 7 Oct 2025

१८ वर्षे पूर्ण होण्याआधीच मद्य परवाना मिळवल्याचा आरोप; समीर वानखेडे यांना रद्द परवान्याची प्रत सादर करण्याचे आदेश

हा परवाना मूळतः वानखेडे यांच्या आईच्या नावे काढण्यात आला होता. परंतु, अल्पवयीन असतानाही वानखेडे यांचे नाव त्यात नंतर जोडण्यात आले. त्यामुळे, अल्पवयीन असतानाच वानखेडे हे मद्यालय चालवत होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. …सविस्तर वाचा
13:06 (IST) 7 Oct 2025

विद्यार्थ्यांना उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे धडे… बजाजतर्फे सीओईपीत स्थापन होणाऱ्या ‘बेस्ट’चे महत्त्व काय?

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित कौशल्ये विकसित करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘बेस्ट’ या केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. …अधिक वाचा
12:58 (IST) 7 Oct 2025

“बँक खात्यात १०,००० रुपये ट्रान्सफर करून…”, ठाकरे गटाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांबद्दल बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले की, “केंद्रीय निवडणूक आयोगाने काल बिहार निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. निवडणुका खूप मनोरंजक असतील. बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा आयोजित करून राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी निष्पक्ष निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोग आणि भाजपाच्या दृष्टिकोनाचा पर्दाफाश केला आहे. पंतप्रधान मोदींनी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील ७५ लाख महिलांची मते त्यांच्या बँक खात्यात १०,००० रुपये ट्रान्सफर करून खरेदी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेद्वारे असेच केले. ते देशाचे पंतप्रधान आहेत, विशिष्ट पक्षाचे नाहीत.”

12:22 (IST) 7 Oct 2025

पुणे मेट्रोची कोटीच्या कोटी उड्डाणे… आयटी कंपन्या, व्यवसाय, रोजगाराला चालना

आतापर्य़ंत पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाइन) आणि वनाज ते रामवाडी (ब्ल्यू लाइन) या मार्गावर मेट्रो धावत आहे. सुरुवातीला अवघ्या २० हजार प्रवाशांचा प्रतिसाद होता. …सविस्तर वाचा
12:22 (IST) 7 Oct 2025

लिफ्टमध्ये अडकलेल्या तिघांची अर्ध्या तासाने सुखरूप सुटका; रावेत येथील घटना

ही घटना सोमवारी रावेत येथील म्हस्के वस्तीमधील श्रीहरी गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर तिघांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. …अधिक वाचा
12:22 (IST) 7 Oct 2025

पुणे महापालिका निवडणुकीसाठी पाच हजार केंद्राची आवश्यकता, प्रशासनाने सांगितले नियोजन !

मतदारयादीचा घोळ टाळण्यासाठी ‘साॅफ्टवेअर’चा उपयाेग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी ही माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. …अधिक वाचा
12:21 (IST) 7 Oct 2025

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या स्थलांतराचा प्रस्ताव रखडला; जागेच्या भाड्यावरून पेच

पोलिस आयुक्तालयाचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात मंगळवार पेठेतील ‘अंतरिक्ष’ टॉवरमधून सुरू करण्याच्या प्रस्ताव विचाराधीन आहे …वाचा सविस्तर
12:21 (IST) 7 Oct 2025

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : येत्या गुरुवारी या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद !

गवेगळ्या भागांतील जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन येथे विद्युत व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. …सविस्तर वाचा
12:21 (IST) 7 Oct 2025

नृत्यातून लाभले प्रवाही राहण्याचे सामर्थ्य; ज्येष्ठ कथक नृत्यगुरू शमा भाटे यांची कृतज्ञ भावना

शमा भाटे म्हणाल्या, ‘जीवनाच्या या प्रवासात माझे विश्व कथकने व्यापून टाकले. प्रवासातले खड्डे, वेदना, दुःख, अडचणी हे सारे सरून आता निखळ आनंद उरला आहे. …अधिक वाचा
12:20 (IST) 7 Oct 2025

देशातील १२६ विद्यापीठांना ऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्यास मान्यता… राज्यातील कोणत्या विद्यापीठांचा समावेश?

यूजीसीने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत पारंपरिक आणि दूरस्थ पदवी, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह ऑनलाइन अभ्यासक्रमांनाही यूजीसीकडून समकक्षता देण्यात आली आहे …अधिक वाचा
12:19 (IST) 7 Oct 2025

शेतकऱ्यांच्या मदतीची आज घोषणा;  १३ ते १५ हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज

राज्यातील २६ जिल्ह्यांमधील १७८ तालुक्यांमध्ये १२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ७२-७३ लाख शेतकऱ्यांचे सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक जमिनींवरील पिकांचे नुकसान झाले आहे. …सविस्तर वाचा
12:19 (IST) 7 Oct 2025

पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

गुंतवणूकदारांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे २०-२० गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर आयोजित केलेल्या बैठकीत केले. …सविस्तर बातमी
12:19 (IST) 7 Oct 2025

Navi Mumbai Airport : सविस्तर : विमानतळाच्या नावाचा प्रवास आणि ‘दिबा’ नावाचा इतिहास

Navi Mumbai Airport Inauguration 2025: विमानतळाला ठाणे, रायगड, पालघर पट्ट्यातील भूमिपुत्रांचे नेतेदिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने ‘दिबां’च्या नावाचीघोषणा औपचारिकता उरली आहे …अधिक वाचा
12:18 (IST) 7 Oct 2025

“गुलाबराव पाटील यांचे सरकारमध्ये कोणीच ऐकत नाही…”, रोहित पवार यांचा टोला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील, असा दावा आमदार पवार यांनी केला. …अधिक वाचा
12:18 (IST) 7 Oct 2025

नाशिक महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; सर्व हरकती, सूचना फेटाळल्या, आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा

अंतिम प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय सीमांकनासह नकाशे प्रसिद्ध झाले असले तरी आरक्षण सोडतीवर इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. …अधिक वाचा
12:18 (IST) 7 Oct 2025

नाशिक महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; सर्व हरकती, सूचना फेटाळल्या, आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा

अंतिम प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय सीमांकनासह नकाशे प्रसिद्ध झाले असले तरी आरक्षण सोडतीवर इच्छुकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. …अधिक वाचा
12:17 (IST) 7 Oct 2025

एकनाथ शिंदे यांच्या इशाऱ्यानंतर शिवसेनेला जाग… खड्ड्यांप्रश्नी महानगरपालिकेत ठिय्या

काही दिवसांपूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यासाठी नाशिकला मुक्काम करण्याचे जाहीर केले होते. …सविस्तर बातमी
12:17 (IST) 7 Oct 2025

पाच कोटी वापराविना परत…नंदुरबारचे पालकमंत्री माणिक कोकाटे संतप्त

सर्वाधिक वाईट परिस्थिती ही शिक्षण विभागाची असून आज नंदुरबारमधील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील ४६ शाळांना इमारत नसल्याने त्या खासगी घरात सुरु आहे. …सविस्तर वाचा
12:17 (IST) 7 Oct 2025

‘टीईटी’ ची शिक्षकांवर टांगती तलवार…शिक्षण राज्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? 

महाराष्ट्र राज्य कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टीईटी सक्तीचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली. …वाचा सविस्तर
11:57 (IST) 7 Oct 2025

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकल्याच्या घटनेचा यशोमती ठाकूर यांच्याकडून निषेध

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्याप्रकरणी काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “सर्वोच्च न्यायालयात अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका मनुवादी विचारांच्या वकीलाने बूट भिरकावल्याची घटना घडली असून हा प्रकार भारतीय लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. वर्णवर्चस्ववादी आणि मनुवादी विचारसरणीच्या प्रवाहातून उद्भवलेली ही घटना न्यायव्यवस्था, संविधान आणि लोकशाही मूल्यांवर थेट हल्ला आहे. अशा उजव्या विचारसरणीच्या आणि मनुवादी प्रवृत्तीच्या विरोधात काँग्रेस पक्ष सतत आणि निकराने लढा देत राहील. संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे जतन आणि सर्वसामान्य जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही.”

11:40 (IST) 7 Oct 2025

CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य; म्हणाले, “जेव्हा जनतेतून संतापाची भावना…”

On Shoes Attack On CJI B.R. Gavai: बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वकिलाला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले व नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. …वाचा सविस्तर
11:40 (IST) 7 Oct 2025

CJI B. R. Gavai यांच्यावर हल्ला, रोहित पवारांकडून भाजपा लक्ष्य; म्हणाले, “जेव्हा जनतेतून संतापाची भावना…”

On Shoes Attack On CJI B.R. Gavai: बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या वकिलाला न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले व नंतर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. …वाचा सविस्तर
10:53 (IST) 7 Oct 2025

Navi Mumbai Airport : विमानतळाच्या उद्घाटनाला शिवराज्याभिषेकासह, राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा नृत्यसंगीताविष्कार

या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याला केवळ विकासाचा उत्सव नव्हे, तर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा महाउत्सव म्हणता येईल. …सविस्तर वाचा
10:25 (IST) 7 Oct 2025

सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार यांचे मूक आंदोलन

सर्वोच्च न्यायालयात काल सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकल्याचा प्रकार घडला आहे. याच्याविरोधात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार बारामतीमध्ये मूक आंदोलनास बसले आहेत.

10:21 (IST) 7 Oct 2025

Maharashtra Breaking News Live: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शरद पवार गटाचे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर काल (सोमवारी) एका वकिलाने बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई हे महाराष्ट्राचे असल्याने राज्यातही अनेक ठिकाणी याचा निषेध नोंदवण्यात येत आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने (शरद पवार गट) या घटनेविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये “संविधान सन्मान आंदोलन” आयोजित केले आहे.

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स