Maharashtra News Highlights: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आघाडी व युतीसंदर्भातल्या चर्चा झडू लागल्या असून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतही भाकितं केली जाऊ लागली आहेत. असं असतानाच पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच दुसरीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या व्यवहार प्रकरणावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने पुण्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. तसेच भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्याच कार्यकर्त्यांना मोठा इशारा दिला आहे. ‘तुमचं मोबाईलवरील एक चुकीचं बटण पुढच्या पाच वर्षांचा सत्यानाश करेल’, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर राज्यातील विविध भागांत पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
Maharashtra Weather News Live Updates : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माघ्यमातून घेऊयात.
दिवाळीत वाहन खरेदीला ‘वेग’ गेल्यावर्षीपेक्षा वाहनांची अधिक विक्री; इलेक्ट्रिक वाहने खरेदी घसरली
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिराला मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाचा ‘लूक’, नुतनीकरणासाठी शासनाकडून १५ कोटीचा निधी प्राप्त
नाशिकहून पुण्याला बसने जाणाऱ्या प्रवाशांनी हे लक्षात घ्यावे…
यात्रेत गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार
Gold-Silver Price : सोने, चांदीत आणखी मोठी पडझड… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर !
“माझ्या मृत्यूचं कारण…”, छळ करणाऱ्या आरोपींचा तळहातावर उल्लेख करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या
Satara Woman Doctor Dies By Suicide amid Rift with Cops : साताऱ्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या तळहातावर सुसाइड नोट लिहिली असून, त्यात तिने दोन पोलिस अधिकाऱ्यांवर बलात्कार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात वंजित बहुजन आघाडीचा RSS च्या कार्यालयावर मोर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये वंजित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. या मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Murlidhar Mohol : महापौर असताना बिल्डरची गाडी वापरली? धंगेकरांच्या आरोपावर मोहोळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “अडीच वर्ष…”
डोंबिवली पश्चिमेत मनसे, शिवसेना कार्यकर्ते, सामाजिक मंडळ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; आगामी पालिका निवडणुकीसाठी जुळवाजुळव
अंबरनाथचे दोन माजी नगरसेवक शिवसेनेत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत प्रवेश
बदलापुरातील शिवसेनेचे शहरप्रमुख भाजपच्या माजी मंत्र्यांच्या भेटीला; राजकीय दृष्टीने भेट महत्वाची, अनेक तर्कवितर्कांना उधाण
जमीन व्यवहार प्रकरणात कल्याणमधील शिंदे शिवसेना शहरप्रमुखाची फसवणूक; खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासका विरुध्द गुन्हा दाखल
गुजरातप्रमाणे महाराष्ट्र मंत्रिमंडळात बदल करण्याची तयारी?, मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांच्या कामगिरी ऑडिटवर म्हणाले…
सांगलीत चंद्रकांत पाटलांच्या भूमिकेने सावळा गोंधळ
Mira – Bhayandar News : मेट्रोखालील नव्या उड्डाणपुलाची अवघ्या वर्षभरात दुरवस्था; मार्गांवर खड्डे आणि रस्ता खचण्यास सुरुवात
Cluster Development : समूह पुनर्विकास प्रक्रिया थंडावली !उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतरच निर्णय
Vasai News : नरवीर चिमाजी आप्पा मैदानात खाऊगल्ली ? क्रीडा प्रेमींकडून विरोध
बविआ कार्यकर्त्याची आक्षेपार्ह चित्रफित प्रसारीत, भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
कोल्हापूरमध्ये ऐन दिवाळीत राजकीय वादाचे बार
“आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे राऊत कोण?”, चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर
“आमच्या पक्षाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोण काय व्यक्त होतं? समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत? यावर आम्ही दररोज काम करतो. कधी कधी निवडणुकीच्या काळात नकारात्मक किंवा सकारात्मक बातम्या येत असतात. त्यामुळे मी काल भंडाऱ्यातील भाजपाच्या एका कार्यक्रमात बोलताना असं म्हटलं की, आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कंमेंट आणि केलेले कामे हे व्हॉट्सअॅप आमचं वॉर रुम संपूर्ण चेक करतं. त्यामुळे निवडणुकीच्या काळत पक्षाने जे काही कामे सांगितले गेलेले असतात, त्यामध्ये आमच्या सरकारच्या ज्या काही योजना आलेल्या असतात या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो. तसेच हेच आम्ही व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे आमचा पक्ष कसा चालवावा शिकवणारे संजय राऊत नाहीत”, असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी राऊतांना दिलं आहे.
Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात फक्त ‘या’ शहरांत झालं पेट्रोल- डिझेल स्वस्त ; जाणून घ्या तुमच्या शहरांतील आजचे नवीन दर
पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता.
कोथरूडमध्ये सदनिकेतून आठ लाखांचा ऐवज लांबविला
Pune Cyber Crime: गॅस पुरवठा खंडीत करण्याच्या बतावणीने एक लाखांची फसवणूक
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष एकाच समाजातील; इतर समाजांत तीव्र नाराजी
बंटी शाहूच्या अडचणीत वाढ, लकडगंज ठाण्यात खंडणीचा गुन्हा
पिंपरी-चिंचवड : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या
सरन्यायाधीशांच्या निवृत्तीसाठी मोदी सरकारची तयारी, न्या.गवईंना पत्र पाठवित विचारले….
सोयाबीन खरेदीसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून….
रत्नागिरीत महायुतीत घोळात घोळ
भाजपचा ‘प्री-पोल’-‘पोस्ट-पोल’ फार्म्युला कोणाच्या हिताचा?
‘मुरलीधर मोहोळ महापौर असताना बिल्डरची गाडी…’, धंगेकरांचा आणखी एक गंभीर आरोप, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
