Maharashtra Politics Live Updates, 22 September 2025 : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा तापलेला आहे. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करत आहेत. दुसरीकडे छगन भुजबळांनी शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत.

तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केलं असून ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. तसेच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवल्याची माहिती समोर आली असून जालन्यात ही घटना घडली आहे. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Live Updates

Latest Marathi News Live Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

19:48 (IST) 22 Sep 2025

Mumbai Rainfall Updates : मुंबईत १०५ टक्के पाऊस

Mumbai Heavy Rainfall : यंदा मुंबईतही खूप पाऊस पडला असून मुंबईबाहेरील धरणक्षेत्रातही मुबलक पाऊस पडला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणे ९९ टक्के भरली आहेत. …अधिक वाचा
19:39 (IST) 22 Sep 2025

Maharashtra Rain Alert Updates : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार

Maharashtra Weather Update : पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. …अधिक वाचा
19:16 (IST) 22 Sep 2025

Navi Mumbai Airport ः विमानतळाचे उद्घाटन ३० तारखेला नाही; विमानतळाला दि.बा.पाटलांच नावं…

Navi Mumbai Airport Inauguration : ३० तारखेला या विमानतळाचे लोकार्पण होणार नाही अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. …अधिक वाचा
18:15 (IST) 22 Sep 2025

गारगाई धरणाच्या निविदा दोन महिन्यात काढा; मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांचे पालिका आयुक्तांना निर्देश

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी ४००० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. …वाचा सविस्तर
17:53 (IST) 22 Sep 2025

Hit and Run: मुंब्रा बाह्यवळणावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंब्रा बाह्यवळण मार्ग हा ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली शहारांना जोडणारा आहे. या मार्गावरून हजारो जड-अवजड वाहने दररोज वाहतुक करतात. …अधिक वाचा
17:52 (IST) 22 Sep 2025

Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन दिले थेट ‘हे’ निर्देश…

Marathwada Floods Eknath Shinde Relief Orders Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ठाण्यातून थेट फोनवर संवाद साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. …अधिक वाचा
17:51 (IST) 22 Sep 2025

डोंबिवली पूर्वेत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या भंगार वाहनांवर कारवाई

शुक्रवारी सकाळी हायड्रा मशिनच्या साहाय्याने खंबाळपाडा, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, चोळे भागातील धूळखात पडलेल्या मोटारी, रिक्षा, दुचाकी वाहने एका ट्रकमध्ये भरून खंबाळपाडा येथील पालिकेच्या भंगार वाहन केंद्रावर नेऊन जमा केली. …सविस्तर वाचा
17:31 (IST) 22 Sep 2025

गोकुळमध्ये महाडिकांचे राजकारण सुसंस्कृत; ठरावासाठी पैसे देण्याची प्रवृत्ती विद्यमान सत्ताधाऱ्यांची – धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली. …सविस्तर बातमी
17:10 (IST) 22 Sep 2025

धाराशिव, बीड आणि जालन्यात जोरदार पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

“सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके आणि लगतच्या भागात, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि जालना येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. स्थानिक प्रशासनाशी ते संपर्कात आहेत. याशिवाय जलसंपदा विभागाने स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय ठेवावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अधिकाऱ्यांशी सुद्धा सातत्याने समन्वय ठेवावा”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:52 (IST) 22 Sep 2025

Video : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात मुदत संपलेल्या माऊथ वाॅशचा शौचालय धुण्यासाठी वापर…

महापालिका, शासकीय रुग्णालयांमधील औषध खरेदी, त्यांचा वापर आणि मुदत संपलेल्या औषधांची विल्हेवाट या विषयावर नियंत्रक वैद्यकीय आरोग्य शासकीय यंत्रणेचे लक्ष आहे की नाही असे प्रश्न आता रुग्ण, नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत. …सविस्तर वाचा
16:35 (IST) 22 Sep 2025

कोल्हापूर : तोफेच्या सलामीने महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौसवाला प्रारंभ; करवीर नगरी गजबजली

साडेतीन खंडपीठापैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात आज पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. तोफेची सलामी होऊन नवरात्र उत्सवाच्या विधींना सुरुवात झाली. …सविस्तर वाचा
16:20 (IST) 22 Sep 2025

“मला रिकामं ठेवू नका, काही चुकलं असेल तर…”, धनंजय मुंडेंची भर सभेत सुनील तटकरेंना विनंती

Dhananjay Munde Demanded responsibility to Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या पाठिशी उभे असल्याने कराडने बीड जिल्ह्यात दहशत माजवल्याची टीका सातत्याने होत आली आहे. कराड आणि त्याच्या टोळीच्या अनेक गुन्हे प्रकरणांमुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचदरम्यान आरोग्याचं कारण पुढे करत मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, मुंडे यांना आता पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध लागल्याचं दिसत आहे.

सविस्तर वाचा

15:46 (IST) 22 Sep 2025

नवरात्रोत्सवावर विरजण : मंदिरावर रोषणाई करताना युवकाचा मृत्यू; मामाच्या डोळ्यादेखत झाला अंत…

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु असतांना एक दुर्देवी घटना घडली. …वाचा सविस्तर
15:06 (IST) 22 Sep 2025

रावण आणि आदिवासी जमाती यांचा संबंध काय?

अनेक वर्षांपासून भारतात ही परंपरा सुरू आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांपासून आदिवासींकडून या रावण दहनाला विरोध वाढत चालला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यातून रावण दहन बंद करण्याची मागणी होत आहे. …सविस्तर वाचा
14:42 (IST) 22 Sep 2025

विरारमध्ये टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना घडला अपघात

विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरात टँकरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. …सविस्तर बातमी
14:34 (IST) 22 Sep 2025
‘आमदार नसतानाही मला २० कोटींचा निधी’, सदा सरवणकर यांचं ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले…

विरोधी पक्षातील तसेच सत्ताधारी पक्षातील काही आमदार निधी मिळत नसल्याची तक्रार करीत असताना माजी आमदार सदा सरवणकर यांनी आमदार नसतानाही आपल्याला २० कोटींचा निधी मिळत असल्याचा वादग्रस्त दावा केला आहे होता. दरम्यान, त्यांच्या या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सदा सरवणकर म्हणाले की, “आताच्या आमदाराला तुम्ही दोन कोटी म्हणत असताल तर मी जेव्हा आमदार होतो तेव्हा आम्हाला २५ ते ३० कोटी मिळत होते. आजही मी आमदार नसताना मला त्यापैकी २०२३ आणि २०२४ कालावधीत मंजूर झालेले २० कोटींची कामे आजही व्हायची बाकी आहेत. याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सारखे नेते असतील तर आमदारांना विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत नाही”, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

13:57 (IST) 22 Sep 2025

Thane Metro Trial Run: ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

Thane Metro First Trial Run 2025 ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी (MVA) सरकारवर जोरदार टीका केली आहे. …वाचा सविस्तर
13:38 (IST) 22 Sep 2025

Video: Lamborghini crash: कोस्टल रोडवर आलिशान लॅम्बोर्गिनीचा भीषण अपघात; उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी शेअर केली चित्रफित

रविवार सकाळी दक्षिण दिशेला जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला. अपघातामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णपणे तुटला. मात्र, चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. …अधिक वाचा
13:26 (IST) 22 Sep 2025

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध; खंडपीठाचा याचिकांवर सुनावणी घेण्यास नकार

कुणबी सेवा संस्था, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, अहिर सुवर्णकार समाज संस्था, सदानंद महालिक आणि महाराष्ट्र नाभिक महासंघ यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या नव्या अध्यादेशाला आव्हान दिले आहे. …वाचा सविस्तर
13:08 (IST) 22 Sep 2025

सर्तक वाहतूक पोलीसांमुळे गुटखा वाहतूक उघडकीस

मुंब्रा पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल येथे शनिवारी दुपारी अडीच वाजता वाहतूक पोलीस कर्मचा-यांना एका हलक्या मोटारीचा संशय आल्याने त्याने वाहनाची चौकशी केल्यावर त्यामध्ये गुटख्याची वाहतूक होत असल्याचे समजले. …सविस्तर वाचा
13:01 (IST) 22 Sep 2025

Ready Reckoner Rate: अखेर ‘तो’ शासन निर्णय रद्द! शासकीय भूखंडावरील रहिवाशांना दिलासा

शासकीय भूखंडावरील सहकारी गृहनिर्माण संस्थांतील खरेदी-विक्री वा अन बेकायदा व्यवहार नियमाकूल करताना ज्या दिवशी ही प्रकरणे नियमाकूल झाली त्या दिवसापासून रेडी रेकनरचा दर आकारण्यात यावा, असा शासन निर्णय मे २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. …वाचा सविस्तर
12:36 (IST) 22 Sep 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०४७ पर्यंत देशात काय बदल करणार? चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती…

‘गेल्या ७० वर्षांच्या नेहरू-गांधी युगात देशाची अस्मिता रसातळाला गेली होती. आता २०४७ पर्यंत देशाला पुन्हा वैभवाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. काय करायचे आहे ते मोदी यांना अगदी स्पष्ट आहे,’ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. …सविस्तर बातमी
12:07 (IST) 22 Sep 2025

आता डोंबिवली जवळील २७ गावांमध्ये दुचाकीवरील लुटारूंचा धुडगुस; भोपरमध्ये पादचाऱ्याची सोनसाखळी लुटली

डोंबिवली शहराच्या २७ गाव परिसरात पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा किमती ऐवज हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. …वाचा सविस्तर
12:05 (IST) 22 Sep 2025

Mumbai Police Assault: महिला पोलिसाचे अजब कृत्य; तरुणीवर नेमफ्लेट फेकून मारली, थोडक्यात डोळा वाचला

एका महिला पोलिसाने आपल्या गणवेषावरील नेमप्लेट काढून तरूणीच्या चेह-यावर फेकून मारली. सुदैवाने तिचा डोळा वाचला आहे. …सविस्तर बातमी
11:37 (IST) 22 Sep 2025

हिंजवडी आयटी पार्क आणि चाकणची वाहतूक कोंडी फुटणार… अजित पवार यांचे नव्याने निर्देश

महामेट्रोकडून हाती घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील भक्ती-शक्ती मार्गावरील मेट्रो मार्गिका तळवडेपासून पुढे चाकणच्या एमआयडीसीपर्यंत नेण्यात येणार आहे. चाचपणी करून पर्यायी मार्गांची पाहणी करावी,’ अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. …सविस्तर बातमी
11:21 (IST) 22 Sep 2025

ठाणे मेट्रोची आज होणार चाचणी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते चार स्थानकांपर्यंत चाचणी केली जाणार

मुंबई महानगरातील वाहतुक कोंडी, उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि ४अ (कासारवडवली–गायमुख) प्रकल्प उभारला जात आहे. या मार्गिकेवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार स्थानकांपर्यंत चाचणी केली जाणार आहे. ही मेट्रो ट्रेन कशी असेल , त्याची वैशिष्ट्य काय आहेत, याविषयी सर्वांमध्ये उत्सुकता असून त्याबाबत जाणून घेऊया.

वाचा सविस्तर

10:58 (IST) 22 Sep 2025

आरसीएफ शाळेबाबत शिक्षण संचालकांचे महत्वाचे निर्देश; शाळा व्यवस्थापनाची जाबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीचीच

आरसीएफ शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि आरसीएफ कंपनीचीच असल्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी दिला आहे. …अधिक वाचा
10:57 (IST) 22 Sep 2025

माथेरान मधील घोड्यांमध्ये डोळ्यांच्या संसर्गाची साथ; पशुसंवर्धन विभागाकडून घोड्यांची तपासणी सुरू

माथेरान मधील घोड्यांना डोळ्यांचा विचित्र आजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. डोळ्यांना होणाऱ्या या संसर्गामुळे घोड्यांना अंधत्वाचा धोका निर्माण झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. …सविस्तर वाचा
10:56 (IST) 22 Sep 2025

धक्कादायक ! फेसबुकवर मैत्री; मित्राने अमली पदार्थ देऊन मैत्रिणींवर केला बलात्कार, त्याच्या मित्रानेही…

फेसबुकवर दोघांची मैत्री झाली. एके दिवशी घरी सोडून देण्याच्या बहाण्याने मित्राने मैत्रिणीला नशेच्या गोळ्या देत तिच्यावर बलात्कार केला एवढेच नाही तर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. …अधिक वाचा
10:56 (IST) 22 Sep 2025

बनावट मतदार नोंदणी : राज्य निवडणूक आयोगाची माहिती देण्यास टाळाटाळ; इलेक्ट्रॉनिक डेटा…

राजुरा विधानसभा मतदार संघात ६ हजार ८६१ बनावट मतदार नोंदणी प्रकरणात राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलीस विभागाला माहिती देण्यास टाळाटाळ करित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. …सविस्तर बातमी

“पैशांशिवाय आंदोलनं होतात का?” वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण; व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत म्हणाले…, (फोटो-संग्रहित छायाचित्र)