Manoj Jarange LIVE Today: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरातून लाखो लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे मुंबई मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. तसेच मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागणीवर सरकार कसा तोडगा काढणार हे पाहावे लागणार आहे.

यासह राज्यातील विविध घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Manoj Jarange Patil Azad Maidan Maratha Reservation Protest Live Updates: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासह राज्यासह देशभरातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

15:09 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्यांना २०-२५ मिनिटे विलंब

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनांमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील सर्व गाड्या २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत. सोमवारी सकाळी गाड्या १० मिनिटे उशिराने धावत होत्या. कोणत्याही गाड्या रद्द करण्यात आलेल्या नाहीत.

14:41 (IST) 1 Sep 2025

जरांगेपाठोपाठ बच्‍चू कडूंच्‍या कर्जमाफी आंदोलनाची सरकारला चिंता!

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफी आंदोलनासाठी पूर्वतयारी चालवली आहे. …सविस्तर बातमी
14:36 (IST) 1 Sep 2025

Ganeshotsav 2025 : पुण्यात गणेशोत्सवात मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ महाविद्यालयीन तरुणाचा मोबाइल संच चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. …सविस्तर वाचा
14:30 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: “मराठा आंदोलक गाड्या, रस्ते रोखत आहेत,” सरकारची माहिती; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर उच्च न्यायालयात सुनावणी

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता न्यायालयात सुनावणी सुरू असून, मराठा आंदोलक मुंबईत प्रवाशांच्या गाड्या आणि वाहतूक रोखत असल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली आहे.

14:06 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी आझाद मैदानात डॉक्टरांचं पथक दाखल झाले आहे. याला संवाद साधून मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

14:05 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भेट घेतली.

14:03 (IST) 1 Sep 2025

Ganeshotsav 2025 : सिंधुदुर्ग : सावंतवाडी निरवडे येथे गणेश सजावटीतून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची व्यथा अधोरेखित

या वर्षी मनोज मदन बांदिवडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या टर्मिनसच्या कामाची व्यथा आपल्या सजावटीतून प्रभावीपणे मांडली आहे. …वाचा सविस्तर
13:43 (IST) 1 Sep 2025

Ganeshotsav 2025 : अमरावतीतील गणेशोत्‍सवात विविध मंदिरांच्‍या प्रतिकृती; शिर्डी साईमंदिर, अक्षरधाम मंदिर ठरतेय लक्षवेधी…

दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून नागरिकांना विविध तीर्थस्‍थळांचे दर्शन घेण्‍याची संधी प्राप्‍त झाली असून शहरातील सार्वज‍निक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले ऐतिहासिक मंदिराचे देखावे तसेच भव्य प्रवेशद्वार लक्षवेधी ठरत आहे. …सविस्तर बातमी
13:24 (IST) 1 Sep 2025

डोंबिवली आयरेतील समर्थ कॉम्पलेक्स बेकायदा इमारत रहिवासमुक्त करण्याच्या हालचाली

आयरे टावरीपाडा येथील समर्थ कॉम्पलेक्स बेकायदा इमारत ६५ महारेरा बेकायदा इमारत प्रकरणाच्या यादीत आहे. …सविस्तर वाचा
13:14 (IST) 1 Sep 2025

डिजीटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक; अंबरनाथमध्ये तीन लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा डिजीटल अरेस्टचा प्रकार असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. …अधिक वाचा
13:13 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या

मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत की, राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करण्याचा सरकारी आदेश जारी करावा. त्यांच्या मागण्यांमध्ये हैदराबाद आणि सातारा राजपत्रात सूचीबद्ध असलेल्या सर्व मराठ्यांना ओबीसी कोट्याचा लाभ घेण्यासाठी कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत.

13:11 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: मुंबई वाहतूक पोलिसांचे प्रवाशांना आवाहन

मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे, मुंबई वाहतूक पोलिसांनी सोमवारी दक्षिण मुंबईकडे जाताना प्रवाशांना सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. “सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईकडे जाताना वाहतूक मंदावण्याची आणि कधीकधी अडथळा येण्याची शक्यता आहे. गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक चौकांवर दिलेल्या सूचनांचे पालन करा”, असे वाहतूक पोलिसांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सर्व कार्यालयीन आणि प्रवाशांना थोडासा विलंब झाल्यामुळे “बफर टाइम लक्षात घेऊन” त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

13:09 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: सीएसएमटी स्थानकाजवळील काही बस सेवा बंद; मनोज जरंगे पाटील यांचे आंदोलन तीव्र

मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरंगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणामुळे सोमवारी सलग चौथ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर काही बस सेवा बंद ठेवण्यात आल्या, तर काही बस सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत. जरांगे पाटील यांचे समर्थक आज सकाळीही सीएसएमटी स्थानकाबाहेर मोठ्या संख्येने जमले होते.

13:00 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: अंतरवाली सराटीत आंदोलन करण्यास ओबीसी नेत्यांना परवानगी नाकारली, पोलिसांचा फौजफाटा तैनात

अंतरवाली सराटीत आज ओबीसी आंदोलक आंदोलन करणार आहेत. मात्र, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तरीही आंदोलनाचा अधिकार असल्याचे म्हणत आक्रमक पवित्रा घेत ओबीसींचे बाबासाहेब बटुळे आणि बाबासाहेब दखने हे अंतरवाली सराटीच्या सोनिया नगरमध्ये आमरण उपोषण करणार आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

12:49 (IST) 1 Sep 2025

Maratha Reservation Protest Bombay High Court PIL Hearing : मराठा आरक्षण आंदोलनाप्रकरणी उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाविरोधात केलेल्या जनहित याचिकेवर सोमवारी दुपारी तातडीची सुनावणी होणार आहे. …सविस्तर बातमी
12:38 (IST) 1 Sep 2025

Maratha Reservation: मराठा आंदोलकांचा क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये घुसण्याचा प्रयत्न; सचिवांनी जाहीर केले निवेदन

Maratha Reservation Protesters: दरम्यान, यावेळी काही आंदोलकांनी शेअर बाजाराचे मुख्यालया असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही ७ ते ८ आंदोलकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. …सविस्तर बातमी
12:25 (IST) 1 Sep 2025

डोंबिवलीत उर्सेकरवाडीत जिन्याचा रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यावर कारवाई

जिन्याचा रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यावर कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी रविवारी रात्री दहा वाजता मुसळधार पावसात कारवाई केली. …सविस्तर वाचा
12:12 (IST) 1 Sep 2025

Video : Ganeshotsav 2025 : नवी मुंबईत शेलार कुटुंबीयांनी साकारली हॅरी पॉटरची दुनिया… घरातल्या लहानग्याचा कल्पनाशक्तीची अशीही मांडणी

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शेलार कुटुंबीयांनी वाचनाची आवड आणि त्याच वाचनाचं आवडीतून हॅरी पॉटर कादंबरीतील दुनिया साकारली. …सविस्तर वाचा
12:09 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मराठा आंदोलकांकडून सीएसएमटी परिसरात विटी-दांडूचा खेळ

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान हे आंदोलक सीएसएमटी स्थानक परिसरात विटी-दांडू खेळत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

11:58 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil : उपोषणात जरांगे पाटील यांनी खाल्ला समोसा, एआय वापरून केलेल्या चित्रफितीमुळे संताप

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : आझाद मैदान या उपोषणस्थळी जरांगे पाटील हे समोसा खात असताना या चित्रफितीत दाखवण्यात आले आहे. …सविस्तर वाचा
11:55 (IST) 1 Sep 2025

Mumbai Traffic Diversion Updates : बेस्टच्या २६ मार्गात बदल, लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने

BEST Bus Route Diversions :बेस्ट बस थांब्यावर बराच वेळ उभे राहून सुद्धा बस येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. …अधिक वाचा
11:48 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Protest Live Updates: छगन भुजभळ यांनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक

आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राज्यातील ओबीसी नेते आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील ओबीसी प्रवर्गातून मागत असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात येणार आहे.

11:45 (IST) 1 Sep 2025

Manoj Jarange Patil Protest Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बैठक

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान ‘वर्षा’ येथे बैठकीला सुरुवात झाली आहे.

11:35 (IST) 1 Sep 2025

VIDEO : मराठा आरक्षण आंदोलन लांबण्याच्या शक्यतेने…गाव खेड्यातून अन्नधान्य खाद्य पदार्थांची रसद ओघ सुरु…

मराठा आरक्षण मागणी साठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. …अधिक वाचा
11:34 (IST) 1 Sep 2025

Maratha Reservation : मराठा आंदोलकांची गर्दी, तणावाचं वातावरण आणि मुसळधार पाऊस; अनेक नोकरदारांचा वर्क फ्रॉम होमचा पर्याय

आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यातच सोमवार सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक नोकरदारांनी सोमवारी वर्क फ्रॉम होम (Work From Home) चा पर्याय निवडला. …अधिक वाचा
11:34 (IST) 1 Sep 2025

Maratha Reservation protesters Video : मराठा आंदोलकाकडून सरकारची प्रतिकात्मक अंतयात्रा; रस्त्यावर अभ्यास, कबड्डीचा खेळ

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Updates : कुणी रस्त्यावर कबड्डी खेळली. तर कुणी पोलिसांचे रस्तेरोधक हटवत त्यावर बसून तो ओढत नेताना दिसले. …सविस्तर वाचा
11:34 (IST) 1 Sep 2025

Maratha Reservation :”मराठ्यांचा राग सरकारवर, सुप्रिया सुळे यांच्यावर नाही” जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून मराठा समाजाचे लोक तिथे मोठ्या संख्येने तिथे जमले आहेत. …सविस्तर वाचा
11:34 (IST) 1 Sep 2025

‘मोरया’ आणि मुरबाडचा आहे जवळचा संबंध; निजामशाही आणि मुघल काळातील पुरावे प्रकाशात

गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा सर्वच गणेशभक्त देत असतात. मात्र यातील मोरया साधू आणि मुरबाडचा थेट संबंध होता. त्याचे पुरावे एका पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आले आहेत. …सविस्तर बातमी
11:33 (IST) 1 Sep 2025

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर आंदोलकांचा रोष, गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या; भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

आझाद मैदानावर मनोज जरांगे – पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. …अधिक वाचा
11:33 (IST) 1 Sep 2025

सरकारने जमिन दिली, आदिवासींनी शेती फुलवली; शासकीय जमिनींवर आदिवासींची मिश्र पिकांची शेती

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी बांधवांना शेतजमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आदिवासी बांधव त्यांच्या या जमिनींचे काय करतात याचीही पाहणी श्रमिक मुक्ती संघटनेच्या माध्यमातून त्रयस्त व्यक्तींकडून केली जाते. …अधिक वाचा

मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलन लाईव्ह अपडेट्स.

जरागे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यावर कसा तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.