Mumbai Maharashtra Breaking Update : राज्यात मॉन्सूनला सुरुवात झाली असून मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दक्षिण मुंबईत पावसाने जोरदार पाऊस सुरू असून वाहतूकही मंदावली आहे. तर, दुसरीकडे राजकारणात विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध अद्यापही सुरू असून वैष्णवी हगवणे प्रकरणातील जालिंदर सुपेकर यांच्याबाबतही अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. अंजली दमानिया आज एसीबीच्या कार्यालयात जाणार असून धनंजय मुंडे यांच्याविरोधात ते पुरावे देणार आहेत. यासह राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या
“सुधाकर बडगुजर यांचे सलीम कुत्ताशी संबंध, १७ गुन्हे मागे घेतले जावेत म्हणून भाजपात…”; सीमा हिरे काय म्हणाल्या?
BJP सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊन ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपाला त्यांच्याच पक्षातून अंतर्गत विरोध होताना दिसत आहे. सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याला नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी थेट विरोध दर्शवला आहे. ज्यांच्यावर १७ गुन्हे दाखल आहेत, ज्यांचे संबंध दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत आहेत अशा बडगुजर यांना पक्षात घेऊ नये अशी मागणी सीमा हिरे यांनी केली. त्यामुळे येत्या दोन दिवसात नाशिकमध्ये राजकारण तापणार असणार असं दिसतं आहे.
निवृत्त न्यायाधीशांनी निवडणुका लढविल्याने, सरन्यायाधीश पुन्हा थेटच बोलले; म्हणाले, शेवटी लोकांचा विश्वास
सूडाच्या भावनेतून भरदिवसा निर्घृण हत्या; यवतमाळमध्ये तरुणाला संपविले
भाजपचे पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपातच! सीआयडी चौकशीची मागणी
मुंबई महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याची दीड कोंटींना फसवणूक
दोन महिला तलाठ्यांची मिळून लाचखोरी; न्यायालयाने दिली एक दिवसाची पोलीस कोठडी
ठाकरे बंधू एकत्र येणार का? बैठकीत काय चर्चा झाली? सुषमा अंधारे म्हणाल्या…
ते भाऊ आहेत, दोघांकडे एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांना कोत्याही तिसऱ्या मध्यस्ताची गरज नाही. जेव्हा वाटेल तेव्हा ते मोबाईल उचलतील आणि एकमेकांशी बोलतील. परंतु, हे मनसेच्या लोकांकडून जे स्टेटमेंट येतायत ते अपेक्षित नाही. पण तरीही आमची चर्चा सुरू असताना मी त्यांना विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की आम्हाला काहीच प्रोब्लेम नाही. त्यांनी ठरवायचं आहे. बॉल इन देअर कोर्ट. आमची भूमिका स्पष्ट केली आहे – सुषमा अंधारे</p>
आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वाढीस; तिघांना ३७ लाख रुपयांना गंडा
Raj Thackeray : राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “…तर मनसेच्या आंदोलनाला सरकार जबाबदार असेल”
“…मग मनसेच्या आंदोलनाला सरकारच जबाबदार असेल”, हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरेंचा इशारा
प्रति,
— Raj Thackeray (@RajThackeray) June 4, 2025
मा.श्री.दादा भुसे
शालेय शिक्षणमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात… pic.twitter.com/AFXzoPSqOs
चारच दिवसांत सोन्याच्या दरात मोठे बदल; हे आहे आजचे दर.
एकुलत्या बहिणीच्या लग्नासाठी भावाला न्यायालयाने दिला जामीन.
सावंतवाडीत हृदयद्रावक घटना: मुलाचा मृत्यू ऐकून वडिलांचाही दुर्दैवी अंत, संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अंबानींच्या “वनतारा”चे राज्यकर्त्यांना आकर्षण; पण, वाघाला खासगी प्राणिसंग्रहालयात डांबण्याचे..
हत्यासत्राने अकोला जिल्हा हादरला; आता २२ वर्षीय तरुणाला..
अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी;’ब्लॅकमेल’ करून विवाहितेवर.
अपंगांना रेल्वे तिकिट क्यूआर कोडद्वारे मिळणार; प्रमाणपत्र बाळगण्याची गरज नाही
तांदूळ घोटाळा! उपसचिवांच्या नेतृत्वातील समितीचे चंद्रपुरातील धान गिरण्यांवर छापे..
राज ठाकरेंचं नाव घ्यायला लाज वाटते का? संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका
महाराष्ट्राच्या हितासाठी कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढायला तयार आहोत. – आदित्य ठाकरे</p>
कोणताही पक्ष आमच्याबरोबर येत असेल तर …. सरळ सांगा ना राज ठाकरे सोबत येणार असतील तर आम्ही तयार आहोत. राज ठाकरेंचं नाव घ्यायला लाज वाटते का. उद्या अबु आझमी आणि ओवैसी यांनाही सोबत घेणार का? – संजय शिरसाट
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारातील ४ बसगाड्या जळाल्या ! इलेक्ट्रिक बसच्या आगीमुळे इतर ३ गाड्यांनाही आग
नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली आगारातील ४ बसगाड्या जळाल्या ! इलेक्ट्रिक बसच्या आगीमुळे इतर ३ गाड्यांनाही आग
देवगड तालुक्यात ३.३१ लाखांचा अवैध खत साठा जप्त; विक्रेत्यावर गुन्हा दाखल
संजय राऊतांची गिरीश महाजनांवर पुन्हा आगपाखड
सर्वच बाबतीत भ्रष्ट म्हणून गिरीश महाजन कुख्यात आहेत;
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 4, 2025
फडणवीस हे संस्कार संस्कृतीच्या फक्त गप्पा मारतात पण त्याना सोबत असे महाजन लागतात.
अभिषेक कौल नावाचा ठेकेदार महाजन यांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात बसून फाईल मंजूर करतो,
कौल याचा फ़ोन आल्या शिवाय महाजन फाईल वर सही करत नाही pic.twitter.com/2ZLEFcWQ1m
“शरद आणि अजित पवार एकत्र येण्याच्यादृष्टीने पावलं टाकली जातायत”, राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याचं विधान
मागेही बोललो होतो की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले पाहिजेत. यामुळे राज्यात आपली ताकद वाढेल. ते एकत्र येण्याच्या दृष्टीने पावलं टाकली जात असून चर्चा सुरू आहे. ते एकत्र येणं पक्ष आणि राज्यासाठी गरजेचं आहे – धर्मरावबाबा आत्राम
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या