Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्याचं मतदान येत्या ७ मे रोजी महाराष्ट्रासह देशभरातील एकूण १२ राज्यांमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही नेत्यांच्या प्रचारसभा चालू आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने पहिल्या दोन टप्प्यांची अंतिम टक्केवारी थेट ११ दिवसांनंतर जाहीर केल्यामुळे या आकडेवारीवर आता विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांची नेतेमंडळी वेगवेगळ्या माध्यमांना मुलाखती देत असून त्यातूनही अनेक दावे केले जात आहेत. या दाव्यांची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Live Updates

Marathi News Live Today, 02 May 2024: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

12:14 (IST) 2 May 2024
सूर्यदेव कोपले! मे महिन्यात देशातील ‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची लाट

महाराष्ट्रच नाही तर देशभरात सूर्य आग ओकू लागला आहे. प्रत्येक २४ तासांत तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होत आहे.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 2 May 2024
निवडणुकीच्या तोंडावर कल्याण-डोंबिवलीत दारूची आवक वाढली, कल्याण पूर्वेत तिसगावमध्ये दारूचा साठा जप्त

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या महिनाभराच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरात चोरट्या मार्गाने आणलेल्या दारूची आवक वाढली आहे. चाळी, झोपडपट्यांमध्ये या दारूचा सर्वाधिक वापर काही राजकीय मंडळींकडून मतांसाठी केला जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

वाचा सविस्तर…

11:58 (IST) 2 May 2024
दाम्पत्याने गुंगीचे औषध देऊन तरूणीचे केले अश्लील चित्रीकरण; बलात्कार, खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा

मुंबई : मालवणी येथे एका महिलेने २२ वर्षीय तरूणीला गुंगीचे औषध देऊन पतीसोबत तिचे अश्लील चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रीकरणाद्वारे धमकावून तरूणीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 2 May 2024
नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीही झाली नाही – शरद पवार

कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांनी मला उद्देशून अतृप्त आत्मा अशी टीका केली यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही. नरेंद्र मोदी यांच्या इतकी पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा कधीच झाली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे केली.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 2 May 2024
एटीएम वापरकर्त्यांनो सावधान! बुलढाण्यात दोघांसोबत जे घडले ते वाचून वेळीच सतर्क व्हा, अन्यथा…

एसबीआय शाखा सुंदरखेड येथे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून अनोळखी इसमाने फसवणूक केली.

सविस्तर वाचा…

11:24 (IST) 2 May 2024
‘बालिका वधू…’, अखेरचे मंगलाष्टक सुरू असतानाच लग्नमंडपी असे काही घडले की…

अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाई करुन एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 2 May 2024
ठाणेकरांसाठी पालिकेची कर सवलत योजना, दहा टक्क्यापासून ते दोन टक्क्यांपर्यंत मिळणार करसवलत

ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अर्थसंकल्पात ठरवून दिलेले उद्दीष्ट गाठण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांसाठी पालिकेने कर सवलत योजना लागू केली आहे.

वाचा सविस्तर…

11:14 (IST) 2 May 2024
मे महिन्यात आकाशात मनमोहक घडामोडी, शुन्य सावली दिवसही अनुभवता येणार

तापमानाचे रोज नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. सायंकाळी हवेतील गारव्यासोबतच आकाशातील विविध घडामोडी मनमोहक ठरतात.

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 2 May 2024
Maharashtra Live News in Marathi: सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, व्हिडीओ पाहा – रोहित पवार

बारामतीत सुप्रियाताईंच्या जनशक्तीविरोधात धनशक्तीचा कसा वापर होतो, याचा ट्रेलर बघायचा असेल तर हे व्हिडिओ बघा… मलिदा_गँगने बंद पडलेल्या घड्याळाला कितीही चावी दिली तरी आता वेळ बदललीय आणि वारं फिरलंय.. त्यामुळं बारामतीत तर वाजणार स्वाभिमानाचीच तुतारी… – रोहित पवार

11:01 (IST) 2 May 2024
एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत मोठी अपडेट, तारखा कधी जाहीर होणार? वाचा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीने पदभरती संदर्भात नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 2 May 2024
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी मात्र नाही, कारण काय? जाणून घ्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाच व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 2 May 2024
आतड्याला पीळ पडलेल्या चिमुरड्याला जीवदान! मिडगट व्हॉल्वुलस विकारावर यशस्वी उपचार

एका चार वर्षांच्या मुलाला मिडगट व्हॉल्वुलस हा विकार होता. त्यामुळे त्याची तब्येत खूपच खालावली होती.

सविस्तर वाचा…

10:25 (IST) 2 May 2024
भावी अभियंते गिरवणार आता अनुभवातून धडे! दोनशे तास प्रत्यक्ष कामाची मिळणार संधी

कौशल्यपूर्ण शहर अभियंते तयार व्हावेत, या हेतूने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आता भावी अभियंत्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

10:24 (IST) 2 May 2024
पिंपरी: कोयत्याचा धाक, गुंडगिरी करणारा तडीपार; इतर दोघांवर मोक्काअंतर्गत कारवाई; चिखली पोलिसांची कामगिरी

शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दहशत पसरविणाऱ्या आदर्श उर्फ सोन्या विठ्ठल लुडेकर याला तडीपार करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

10:11 (IST) 2 May 2024
Maharashtra Live News in Marathi: फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत – संजय राऊत

फडणवीस काहीही गौप्यस्फोट करत नाहीत. त्यांच्याकडे कोणतीही गोपनीय माहिती नाही. फडणवीस आता स्फोटक राहिलेले नाहीत. ते आता लवंगी फटाक्याइतकाही स्फोट करू शकत नाहीत. तेच तेच चऱ्हाट, उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला असेल, तर त्यात गौप्यस्फोट काय आहे? – संजय राऊत</p>

10:08 (IST) 2 May 2024
Maharashtra Live News in Marathi: निवडणूक आयोगानं माती खाल्ली आहे – संजय राऊत

कधीही मतदानाची टक्केवारी ११ दिवसांनी जाहीर होत नाही. निवडणूक आयोगानं पुन्हा माती खाल्ली आहे – संजय राऊत</p>

10:05 (IST) 2 May 2024
Maharashtra Live News in Marathi: निवडणूक आयोग भारताचा नसून मोदी-शाह यांचा झालाय – संजय राऊत

भारताचा निवडणूक आयोग भारताचा राहिला नसून तो मोदी-शाह या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं बाहुलं झालंय का? पाकिस्तानात ज्या प्रमाणे निवडणुका लष्कराच्या हातात असतात, त्याप्रमाणे आपल्याकडे निवडणूक आयोगानं केलेले घोळ हेच दाखवतायत की कुणीतरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला हाताळत आहे. भाजपा पहिल्या दोन टप्प्यांत मागे पडल्याचे आकडे समोर आल्यानंतर हे नवीन आकडे जाहीर करण्यात आले. हे आकडे आले कुठून? – संजय राऊत</p>

10:03 (IST) 2 May 2024
Maharashtra Breaking News Live Updates: संजय राऊतांचा धक्कादायक दावा!

६ ते ७ टक्के मतं अचानक वाढल्याचं दाखवलंय. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर ११ दिवसांनी त्यांनी आकडे दिले. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर तीन दिवसांनी हे आकडे आले. त्या सर्व मतदारसंघांमध्ये अचानक मतदानात ६ ते ७ टक्के वाढ झाल्याचं आयोगाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. नांदेडला मतदान संपलं तेव्हा ५२ टक्के मतदान झालं होतं. त्यात अर्धा ते एक टक्का फरक दुसऱ्या दिवशी मतदान संपल्यानंतर होतो. पण १० टक्के फरक कसा होऊ शकतो? देशभरात ज्या मतदारसंघांत मतदान झालं, तिथे असे आकडे आयोगानं जाहीर केले. ते अत्यंत धक्कादायक आहेत. तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर होण्यासाठी ११ दिवस लागलात? आत्तापर्यंत हे आकडे संध्याकाळी कळत होते. आश्चर्य असं की फक्त नागपूर मतदारसंघात त्यांनी अर्धा टक्का मतदान कमी दाखवलंय. इतर सर्व मतदारसंघांत हे प्रमाण वाढलंय – संजय राऊत</p>

(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

Marathi News Live Today, 02 May 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर