वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या वर्ग पाच व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येवू शकेल. संकेतस्थळा वर भेट देत आपला बैठक क्रमांक टाकून निकाल पाहता येईल. परीक्षा परिषदेच उपायुक्त अश्विनी भारूड यांनी तसे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. १८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी, शासकीय विद्या निकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्या निकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्या निकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी, या परीक्षाचा आंतरिम निकाल घोषित झालं आहे.

हेही वाचा : फडणवीस यांचा रामटेकमध्ये काय आहे प्लॅन ‘बी ‘ ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करुन घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिन मध्ये येत्या १० मे पर्यंत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणी साठी प्रत्येक पेपर साठी ५० रुपये असे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आदीत दुरुस्ती करण्यासाठी १० मे पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. सदर अर्ज ऑनलाईन खेरीज अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही. दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कसह प्राप्त झालेल्या अर्जनुसार गुण पडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिन मध्ये आल्यावर ३० दिवसात कळविण्यात येईल. ऑनलाईन आलेले गुण पडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिध्द केल्या जाणार आहे.