Maharashtra Mumbai Breaking News Updates: गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यापासून राज्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून टीका होत आहे. तसेच अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही टिप्पणी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रोहित पवार यांनी काल ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये रोहित पवारांनी राज्यात ६००० कोटींचा आरोग्य घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवार यांच्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.

या घडामोडींसह राज्यातील विविध क्षेत्रांतील ताज्या बातम्यांचा ‘लाईव्ह ब्लॉग’च्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Mumai Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स

19:00 (IST) 25 Jul 2025

म्हाडाचे १५ कोटी दस्तऐवज आता एका क्लिकवर उपलब्ध

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) म्हाडाशी संबंधित तब्बल १५ कोटी दस्तऐवज आता घरबसल्या पाहता येणार आहेत. …सविस्तर बातमी
18:10 (IST) 25 Jul 2025

कंत्राटदारांची थकलेली देयके; ठाकरे शिवसेनेचे कणकवलीत आंदोलन, भाजप महायुती सरकारवर गंभीर आरोप

भाजप महायुती सरकारवर कंत्राटदारांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत, सांगली येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहण्यात आली. …अधिक वाचा
17:39 (IST) 25 Jul 2025

Sudhir Mungantiwar : मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान; विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही केला खुलासा; म्हणाले, “केंद्रीय स्तरावर…”

सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मंत्रिमंडळात फेरबदल होणार का? आणि विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबतही मुनगंटीवार यांनी खुलासा करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. …वाचा सविस्तर
16:30 (IST) 25 Jul 2025

रोहित पवार रूपेरी पडद्यावर अवतरणार; ‘अवकारीका’ चित्रपटात झळकणार

समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
16:06 (IST) 25 Jul 2025

“अनिल परब अर्धवट वकील, योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवावा”; रामदास कदम यांचे आव्हान

अनिल परब हा अर्धवट वकील आहे, विधिमंडळात मी ३२ वर्षे काम केले आहे. प्रत्येक नियमाची मला माहिती आहे. एखाद्या मंत्र्यावर आरोप करताना ३५ ची नोटीस देऊन सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. आदल्या दिवशी त्याची कॉपी सभापतींना द्यावी लागते आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. मात्र या अर्धवट वकिलांनी तसे न करता योगेश कदम सभागृहात नसताना हे गुपचूप आरोप केले. त्यांनी योगेश कदम यांचा राजीनामा घेवून दाखवा असे आव्हान माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले आहे. ते खेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

15:06 (IST) 25 Jul 2025

“ज्या दिवशी पत्र हातात येईल, तोच दिवस खरा…”, अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराला मंत्रिपदाची आस

मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या अजित पवार गटातील काही आमदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. त्यातीलच एका आमदाराने “ज्या दिवशी पत्र हातात येईल, तोच दिवस खरा…”, असे सांगून आपण त्या आशेवर अजुनही बसल्याची थेट कबुली दिली आहे. …सविस्तर वाचा
14:28 (IST) 25 Jul 2025

कृषीमंत्री कोकाटेंविरुद्ध शरद पवार गट आक्रमक; पत्त्यांच्या माळा दाखवत केला निषेध

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून, ते धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज धुळे शहरात माणिकराव कोकाटे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बाहेर पत्त्यांच्या माळा दाखवत त्यांचा जोरदार निषेध केला.

14:15 (IST) 25 Jul 2025

“माझं गुलाबी गप्पा मारायचं वय नाही”, महाजनांच्या टीकेला खडसेंचं उत्तर; म्हणाले, “तुम्ही प्रफुल्ल लोढाला हॉटेलमध्ये…”

Eknath Khadse vs Girish Mahajan : “ज्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेत ते लोक पक्षात आहेत आणि आम्ही बाहेर फेकला गेलो”, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी मनातली खदखद जाहीर केली. …सविस्तर वाचा
13:37 (IST) 25 Jul 2025

अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मराठीचे धडे

परदेशात जाण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेण्याकडे मराठी कुटुंबातील मुलांचा कल आहे. मात्र अमेरिकेत स्थायिक झालेले मराठीजन हे आपल्या मुलांना मराठीचे धडे देत आहेत, हे उल्लेखनीय आहे. …सविस्तर वाचा
13:00 (IST) 25 Jul 2025

अजित पवारांसारखी कठोरता एकनाथ शिंदे दाखवतील? शरद पवार गटाचा सवाल; माणिकराव कोकाटेंचा उल्लेख करत म्हणाले…

Rohit Pawar on Manikrao Kokate : उपमुख्यमंत्री अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. …सविस्तर वाचा
12:15 (IST) 25 Jul 2025

Rohit Pawar: “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा…”, रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, “पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांचा राजीनामा होण्याची शक्यता असून. उपमुख्यमंत्री अजित पवार दाखवत असलेली ही कठोरता सरकारमधील इतर मित्रपक्ष दाखवतील का?”

ते पुढे म्हणाले की, “बॅगवाल्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही महाराष्ट्र वाट पाहतोय, त्यांच्यावर देखील नेतृत्वाला कारवाई करावीच लागेल. बॅगवाल्या मंत्र्यांवर कारवाई करायची हिंमत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी दाखवणार?”

11:37 (IST) 25 Jul 2025

Mumbai Rain: पवईत पाणीच पाणी

मुंबई उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पवईलासुद्धा बसला असून, येथील चैतन्य नगर नेव्हल कंपाऊंड येथील बॉम्बे पब्लिक स्कूल परिसर आणि आसपासच्या चाळीत मोठ्या प्रमाणात पाणीसाचल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांच्या घरात सुद्धा पाणी शिरल्याचे दिसून येत आहे.

11:14 (IST) 25 Jul 2025

“गिरीश महाजन यांना भेटल्यानंतरच लोढा कुटुंबाचा सूर बदलला…”, एकनाथ खडसेंचा आरोप

संशयित प्रफुल्ल लोढा याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅपसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर जामनेर तालुका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. …सविस्तर वाचा
11:08 (IST) 25 Jul 2025

Maharashtra: महामार्ग पोलिसांकडून चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त

महामार्ग पोलिसांनी आज मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये अँफेटामाईन, किव्हा आणि केटामाईन सारखा उच्चप्रभावी अमली पदार्थांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आली असून, यापूर्वी देखील तो ८ वर्ष अंमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्यात तुरुंगवास भोगून आला आहे.

10:27 (IST) 25 Jul 2025

Mahayuti Sarkar: “महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत”, ठाकरे गटाची टीका; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा…”

शिवेसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली असून, सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाह यांच्या हाती असल्याचे म्हटले आहे.

09:33 (IST) 25 Jul 2025

Mahayuti: महायुती सरकार प्रभावीपणे चालवण्यासाठी मंत्र्यांचे ऑडिट आवश्यक: धर्मराव बाबा आत्राम

राज्यात महायुतीचे सरकार प्रभावीपणे चालवण्यासाठी मंत्र्यांचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले आहे. “आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागलो आहोत. गडचिरोली जिल्ह्यात स्वतः लक्ष घालून चांगला परफॉर्मन्स देणार,” असेही त्यांनी सांगितले.

09:31 (IST) 25 Jul 2025

Maharashtra Live: “माझं वय गुलाबी गप्पांचं राहिलं नाही”; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट आरोपांची झोड उठवत आपली खदखद व्यक्त केली. प्रफुल लोढा प्रकरणावरून सुरू असलेल्या वादात खडसेंनी सांगितले की, “हो, लोढा माझ्याशी बोलत होता. पण गुलाबी गप्पा माझ्यासोबत नव्हे, तर माझ्याबद्दलच तो मला सांगत होता.”

खडसे म्हणाले की, “गुलाबी गप्पा करण्याचं वय आता माझं राहिलं नाही”, अशा शब्दांत त्यांनी महाजनांच्या विधानावर खोचक प्रत्युत्तर दिलं. त्यांनी महाजनांवर आरोप करत सांगितले की, “तुम्ही लोढाला हॉटेलमध्ये नेऊन त्याचे पाय दाबले, त्याच्यावर दबाव आणला, त्यामुळे मला माहिती मिळाली नाही.”

09:29 (IST) 25 Jul 2025

Maharashtra Live: शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख, (वय ५३) याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

09:26 (IST) 25 Jul 2025

Health Scam: ‘महाराष्ट्रात ६ हजार कोटींचा आरोग्य घोटाळा’, रोहित पवारांचा आरोप; म्हणाले, “३३ लाखांची अ‍ॅम्ब्युलन्स…”

Health Scam In Maharashtra: या घोटाळ्यातील कंपनीने प्रकरण दाबण्यासाठी कोणाला किती खोके दिले, याची माहिती कागदपत्रांसह समोर आणणार असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. …सविस्तर वाचा

दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.