Marathi Breaking News Live Updates, 16 October 2025: येत्या काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही महत्त्वाची पदे आणि अधिक जागा मिळवण्यासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे.

याचबरोबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरांमध्ये खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. यासह राज्यातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.

Live Updates

Maharashtra Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

17:03 (IST) 16 Oct 2025

सांगली : विशाल पाटील-चंद्रकांत पाटलांमध्ये शाब्दिक जुगलबंदी

जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींना यांत्रिक बोटींचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. …वाचा सविस्तर
16:54 (IST) 16 Oct 2025

उमरीच्या गोरठेकर बंधूंची आता अजित पवारांच्या पक्षात घुसखोरी !

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पवार यांचा पुढील आठवड्यातील नांदेड जिल्हा दौरा निश्चित झाला. …सविस्तर वाचा
16:15 (IST) 16 Oct 2025

Ramdas Athawale: लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेसोबत आल्यानेच पराभव… केंद्रीय मंत्री म्हणाले…

लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. …वाचा सविस्तर
16:03 (IST) 16 Oct 2025

निवडणुकीपूर्वीच तलवार म्यान! राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. …वाचा सविस्तर
15:59 (IST) 16 Oct 2025

Sanjay Gaikwad: जिल्ह्याच्या मतदार यादीत एक लाखावर बोगस मतदार, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा विरोधकांच्या सुरात सूर

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी  मतदार एक लाखावर बोगस मतदार असल्याचा दावा करीत विरोधकांच्या मत घोटाळ्याच्या आरोपात सुरात सूर मिळवला आहे. …सविस्तर वाचा
15:50 (IST) 16 Oct 2025

मंडणगड औद्योगिक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण करा; राज्यमंत्री योगेश कदम यांचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड परिसराच्या औद्योगिक विकासासाठी एमआयडीसीची निर्मिती करणे गरजेचे आहे. या भागात उद्योग येण्यास तयार आहेत. …सविस्तर बातमी
15:33 (IST) 16 Oct 2025

Pimpri Chinchwad Crime : मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरीच्या आमिषाने फसवणूक

एका बहुराष्ट्रीय (मल्टीनॅशनल) कंपनीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाच जणांची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. …सविस्तर वाचा
15:21 (IST) 16 Oct 2025

Ramdas Athawale: आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलींनी रिपब्लिकन पार्टीत यावे… निवडणूक लढवावी… रामदास आठवलेंची खुली ऑफर…

गडचिरोलीत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)मध्ये यावे. त्यांना येत्या निवडणूकीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी ऑफर थेट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. …वाचा सविस्तर
15:20 (IST) 16 Oct 2025

“मी रामदास कदम यांचा मुलगा, मला फरक पडत नाही”, विरोधकांच्या टिकेवर गृह राज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांत विविध प्रकरणांमुळे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत. याबाबत बोलताना योगेश कदम म्हणाले, “विरोधक काय बोलतात, याचा मला फरक पडत नाही. मी त्यांच्या टीकेला महत्त्व देत नाही. शेवटी मी रामदास कदम यांचा मुलगा आहे. कोण काय करत आहे आणि कोणासाठी करत आहे, हे मला माहिती आहे.”

15:15 (IST) 16 Oct 2025

महंमदवाडी, कोंढव्यात घरफोडीच्या तीन घटना; बारा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

कोंढवा बुद्रुक आणि महंमदवाडी भागात झालेल्या घरफोडीच्या तीन घटनांमध्ये बारा लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे …सविस्तर वाचा
14:42 (IST) 16 Oct 2025

Morarji Mill Protest: नागपूर- वर्धा मार्गावर रास्तारोको, मोरारजी मील कामगारांचे आंदोलन, तणाव

बुटीबोरी येथील मोरारजी टेक्सटाईल मील आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वेळ मागितला होता. …वाचा सविस्तर
14:40 (IST) 16 Oct 2025

मिरा-भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे दुहेरी मतदार संघात नाव; लोकसभा निवडणुकीनंतर हा घोळ केल्याचा काँग्रेसचा दावा

मिरा-भाईंदर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून वोट चोरी केल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येत आहे. …अधिक वाचा
14:36 (IST) 16 Oct 2025

फडणवीसांचे महामार्ग अडकले शेतकऱ्यांच्या भूमीत! भूसंपादन न झाल्याने निविदा रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाजावाजा केलेल्या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या तीन महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांना शेतकऱ्यांच्या भूसंपादनातील अडचणींमुळे मोठा झटका बसला आहे. …सविस्तर बातमी
14:36 (IST) 16 Oct 2025

‘एसपी’ निलोत्पल यांच्या त्रिसूत्रीने गडचिरोली नक्षलमुक्तीच्या वाटेवर; सर्वात यशस्वी कारकीर्द…

चार दशके नक्षलवादाच्या हिंसेने होरपळणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात बुधवारी, १५ ऑक्टोबर रोजी एक ऐतिहासिक सुवर्णपान लिहिले गेले. …सविस्तर बातमी
14:34 (IST) 16 Oct 2025

कपातीवरून दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गोकुळवर धडक मोर्चा; आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघामध्ये दीर्घकाळासाठी ठेवी घेतलेल्या आहेत. त्याबद्दल ‘डिबेंचर’ स्वरूपात परतावा दिला जातो. या ‘ डिबेंचर’ मध्ये ४० टक्क्यांहून अधिक कपात गोकुळ दूध संघाने केल्याचा आरोप दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला आहे. …वाचा सविस्तर
14:22 (IST) 16 Oct 2025

प्रथमच निवडून आलेल्या आमदारांनाच निधी; राष्ट्रवादी काँग्रेसचे धोरण, जिल्हाध्यक्षांना कामाला लागण्याचा आदेश

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ने दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तसेच आमदारांची व्यापक बैठक मुंबईत घेतली. …सविस्तर बातमी
13:51 (IST) 16 Oct 2025

लोकसत्ता इम्पॅक्ट : मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची शिफारस; अवैध वाळू उत्खननप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा दणका…

२ ऑक्टोबर रोजी मौजा मद्दीकुंठा व चिंतरेवला या रेतीघाटांवर करण्यात आलेल्या मौका चौकशीत तब्बल १५,६६५ ब्रास अवैध रेती साठा आढळून आला व त्यासाठी २९ कोटीपेक्षा अधिक रकमेचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
13:51 (IST) 16 Oct 2025

तब्बल ४० ‘अॅप्स’चा बोजा; अध्यापनाऐवजी डिजिटल प्रणालींमध्ये अडकले शिक्षक…

राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सध्या तब्बल ४० हून अधिक शासकीय मोबाइल अॅप्स, डिजिटल अहवाल प्रणाली आणि व्हॉट्सअॅपवरील आदेशांच्या चक्रात अडकावे लागले आहे. …सविस्तर वाचा
13:51 (IST) 16 Oct 2025

‘आम्ही भाड्याने कार्यकर्ते आणत नाही, तुकडा देणारे तुम्ही कोण?’ धर्मरावबाबा आत्रामांवर भाजपचा जोरदार प्रहार…

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी काही दिवसांपूर्वी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. …अधिक वाचा
13:49 (IST) 16 Oct 2025

Gold–silver Price : सोने थांबायचे नाव घेईना… जळगावमध्ये आता नेमका किती दर ?

शहरातील सुवर्ण बाजारपेठेत धनत्रयोदशी दोन दिवसांवर आली असताना, गुरूवारी देखील दरवाढ कायम राहिल्याने सोन्याने पुन्हा नवीन उच्चांक केला. …वाचा सविस्तर
13:27 (IST) 16 Oct 2025

ऐन दिवाळीत खोळंबा; धनादेश वटण्यास विलंब, कारण रिझर्व्ह बँकेने आता…

रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवार्ती बँक आहे. याच बँकेद्वारे देशभरातील बँक व्यवहाराचे नियमन होत असते. धनादेश असो की ऑनलाईन व्यवहार याच बँकेने त्याबाबत दिशा ठरवून दिली आहे. …अधिक वाचा
13:27 (IST) 16 Oct 2025

मोठ्या भाजप नेत्याची नातेवाईक कुलगुरूपदाच्या शर्यतीत! यापूर्वीच्या एका गंभीर आरोपाची नव्याने चर्चा…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच भाजपच्या एका मोठ्या नेत्याची नातेवाईक कुलगुरूपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती पुढे येत आहे. …अधिक वाचा
13:27 (IST) 16 Oct 2025

कोल्हापूरमध्ये सत्तेसाठी सर्व मातब्बर घराणी सक्रिय

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित राहिले आहे. यामुळे अध्यक्षपदासाठी गेली सात आठ वर्ष तयारीत असलेल्या ग्रामीण भागातील बड्या नेत्यांचा हिरेमोड झाला आहे. …सविस्तर वाचा
13:26 (IST) 16 Oct 2025

नितीन गडकरी धुळे शहराच्या मदतीला…उद्योजक, व्यापाऱ्यांना दिलासा

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील येथील हॉटेल रेसिडेन्सी पार्कजवळ वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनधारकांची अखेर सुटका झाली आहे. …वाचा सविस्तर
13:26 (IST) 16 Oct 2025

Jalgaon Politics : नेत्यांची हुशारी… निवडणूक कार्यकर्त्यांची; प्रमुख पद घरच्यांना !

जिल्ह्यात भुसावळसह चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, एरंडोल, पाचोरा, जामनेर, चोपडा, धरणगाव, यावल, रावेर, सावदा आणि फैजपूर, या नगरपालिका आहेत. तसेच मुक्ताईनगर, भडगाव, नशिराबाद आणि शेंदुर्णी, या नगरपंचायती अस्तित्वात आहेत. …वाचा सविस्तर
13:25 (IST) 16 Oct 2025

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या…”, मुंबई महापालिका निवडणुकीबाबत शिंदे गटाच्या मंत्र्याचं विधान चर्चेत

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या मीटिंगमध्ये काय ठरले, हे मला माहिती नाही. पण महायुतीमध्ये आम्ही भाजपासोबत आहोत. महायुतीतील ज्येष्ठ नेते अजेंडा ठरवून त्यावर चर्चा करतील.”

13:04 (IST) 16 Oct 2025

Prashant Hiray : प्रशांत हिरे कुटुंबियांचा पाय आणखी खोलात; बँक घोटाळ्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या मालिकेमुळे अडचणीत सापडलेल्या मालेगाव येथील माजी मंत्री प्रशांत हिरे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नाशिक जिल्हा महिला विकास सहकारी बँकेतील १७ कोटी ७४ लाखाच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाला आहे. …सविस्तर वाचा
13:00 (IST) 16 Oct 2025

दिवाळीत फराळावर ताव, वडा-पाव मागणीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट

दिवाळसणातील मिष्टान्नांची ओढ आणि सुटीसाठी गावी परतलेल्या मुलांमुळे वडा-पावच्या विक्रीत ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली असून, डिसेंबर महिना उजाडेपर्यंत व्यवसायात मंदीच राहणार असल्याचे वडा-पाव विक्रेत्या दुकानदारांचे मत आहे. …सविस्तर बातमी
12:44 (IST) 16 Oct 2025

महिलावर्ग पाठदुखीने त्रस्त… वेळीच करून घ्या या चाचण्या

घर-ऑफिस ही तारेवरची कसरत करत असताना किंवा घरातली कामे उरकत असताना अनेक महिलांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो. अनेकदा त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही आणि ही पाठदुखी गंभीर स्वरूपाचे दुखणे बनून जाते. अशावेळी तज्ज्ञांनी सुचविलेल्या या तपासण्या… …सविस्तर बातमी
12:42 (IST) 16 Oct 2025

Tejas mk1A maiden flight : नाशिकमध्ये ९०० लढाऊ विमानांची निर्मिती… आता ‘तेजस एमके – १ ए’ – एचएएल नाशिकची जागतिक स्तरावर नाममुद्रा

एचएएलच्या स्थानिक सुविधेतून निर्मिलेल्या पहिल्या तेजस एमके-१ ए या लढाऊ विमानाचे उड्डाण शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. …सविस्तर बातमी

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स