Mumbai Maharashtra Weather Update Live: यंदा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत मान्सून चक्क २५ मे रोजीच भारतात दाखल झाला आणि पुढच्याच दिवशी महाराष्ट्रात पोहोचलादेखील! त्यामुळे मे गेल्या तीन महिन्यांपासून उन्हाने पोळून निघालेल्या देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी दुसरीकडे बळीराजाच्या चिंता मात्र वाढल्या. अशा प्रकारे अनपेक्षितरीत्या अवतरलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्याचा आढावा आता शासकीय पातळीवर घेतला जात आहे.
Mumbai Maharashtra News Highlights : मुंबईसह महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
सोलापुरात हंगाम सुरू होण्यापूर्वीच मे महिन्यात ४५ टक्के पाऊस
आर. टी. देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार
कास परिसरात पर्यटकांच्या बसला अपघात, पाच जखमी
अलमट्टीमुळे उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर महाराष्ट्र – कर्नाटक एकत्रित प्रयत्न
हुंडा प्रकरणाविरोधात सानपाड्यात शिवसेना उबाठा गटाकडून अनोखे बॅनर लावून समाजप्रबोधन
बांबू लागवड पर्यावरणासाठी पोषक; पाशा पटेल यांचे शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी आवाहन
समाजमाध्यमातील चित्रफितीमुळे चार जणांना अटक, महामार्गावर परस्परांवर हल्ला केल्याची तक्रार
सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित लवकरच स्मार्ट बसगाड्या
Aaditya Thackeray on Water Logging in Mumbai: “मुंबईच्या तीन पालकमंत्र्यांचं काय?” आदित्य ठाकरेंचा सवाल; पाणी साचण्याच्या मुद्द्यावरून हल्लाबोल
“पाणी उपसण्यासाठीच्या पंपांची देखभाल करण्याचं काम सोपवलेल्या कंत्राटदारांना १०० टक्के काळ्या यादीत टाकलंच पाहिजे. पण तीन पालकमंत्र्यांचं काय? या पालकमंत्र्यांनी मुंबई पालिका मुख्यालयात कार्यालयाच्या जागेसाठी अतिक्रमण केलं. ही त्यांची जबाबदारी नाही का? मुंबई महानगर पालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचं काय? मान्सूनपूर्व बैठकांचं काय? मी सातत्याने प्रश्न उपस्थित करत असलेल्या रस्ते घोटाळ्याचं काय? एकमेकांवर आरोप करणं फार सोपं आहे. ते जबाबदाऱ्यांपासून पळ काढू शकतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. ते शहर चालवू शकत नाहीत”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी वर्गावर केली आहे.
They must 100% blacklist the contractors but what about the 3 guardian ministers?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2025
The guardian ministers have encroached into @mybmc hq for office space.
Is it not their responsibility?
What about the senior officials of the BMC?
What about pre monsoon meetings?
What… https://t.co/kNAoxgvPOQ
विदर्भ नदीवरील पुरात गाडी वाहून गेली, एकाचा मृत्यू, एक जखमी
मे महिन्यातच धोधो पाऊस, पूर्णेला पूर! उन्हाळा की पावसाळा?
शेतातून परतणारा शेतमजूर नाल्यात वाहून गेला; रात्रभर चालली शोधमोहिम
अरूण चवडे यांना महाराष्ट्र अनिसचा ‘ लक्षवेधी ‘ राज्य पुरस्कार, मेधा पाटकर करणार सन्मानित
नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीबाबत सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नांदेडमध्ये डी पी सावंत पुन्हा भाजपमध्ये
ताडोबात पर्यटन रस्त्यासाठी मुरुम उत्खनन
मुंब्रा-पनवेल मार्गावरील कमानी पुलाखालील सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे; नरखेड मार्गावर मेमू ट्रेनच्या वेळा बदलल्या
Mithi River Desilting Scam: मिठी नदी प्रकरणी अभिनेता दिनो मोरिया अडचणीत?
चौकशीत असं आढळून आलंय की आदित्य ठाकरेंचे मित्र अभिनेते दिनो मोरिया यांचीही मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणात भूमिका आहे. मुंबई पोलिसांनी दिनो मोरिया आणि त्यांच्या भावाची आठ तास चौकशी केली. आदित्य ठाकरे आणि दिनो मोरियाच्या संबंधांबद्दल आख्ख्या मुंबईला माहिती आहे. दोघे मित्र अनेकदा सोबत पार्टी करताना दिसतात. दिशा सालियन हत्या प्रकरणातही त्या दोघांवर आरोप होते. मिठी नदी गाळ प्रकरणी दिनो मोरियावरील आरोपांची सखोल चौकशी व्हायला हवी – संजय निरुपम, नेते, एकनाथ शिंदे गट
VIDEO | Mumbai: Actor Dino Morea and his brother were questioned earlier this week for eight hours by the Economic Offences Wing for their alleged links with a middleman arrested in the Rs 65 crore Mithi desilting scam. Here's what Shiv Sena leader Sanjay Nirupam (@sanjaynirupam)… pic.twitter.com/GSVcz1ETAI
— Press Trust of India (@PTI_News) May 28, 2025
आता प्राध्यापक भरतीसाठी ‘उच्च शिक्षण सेवा आयोगा’कडून? भ्रष्टाचार रोखण्यासाठी
खेलो इंडिया सातही स्पर्धांमध्ये मनमाडच्या वेटलिफ्टर्सचा दबदबा, १८ पदकांची कमाई
शिवसेना ठाकरे गटाची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी तयारी; संजय राऊत दौऱ्यावर
ठाण्यातील गडकरी रंगायतन परिसरात रस्ता खचला, ड्रेनेजचे चेंबर खचून रस्त्यावरती पडला खड्डा
येमेनी नागरिकाची तातडीने सुटका करा, उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
येमेन येथील विमान कंपनीचा माजी कर्मचारी असलेला मोहम्मद कासिम मोहम्मद अल शिबाह याला १६ मे पासून भायखळा पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते.
पाणी उपसा करणारी यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने कंत्राटदारांना १० लाखांचा दंड
मुंबईत सोमवार, २६ मे रोजी मुसळधार पाऊस कोसळला. अवघ्या १३ तासांमध्ये २५० मिलीमीटर पावसाची नोंद अनेक ठिकाणी झाली.
बेलापूरची वाताहत मानवनिर्मितच, धारण तलावांच्या वाहिन्यांमध्ये काँक्रीटचे थर
नवी मुंबई महापालिका, सिडको, कोकण भवन यासारख्या शासकीय प्राधिकरणांसह व्यावसायिक, नागरी संकुलांचे मोठे केंद्र मानल्या जाणाऱ्या बेलापुरात सोमवारच्या पावसाने पूरस्थिती निर्माण झाली.
Maharashtra Rain Update: अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू, दोघे जखमी
आतापर्यंत वीज पडणे, भिंत कोसळणे, झाडे पडणे आणि पाण्यात बुडणे अशा घटनांमुळे राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत देण्याचे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले. बैठकीत उजनी धरणाच्या जलसाठ्यात अकरा टीएमसीने वाढ झाली तसेच पावसामुळे टँकरची संख्या काहीशी कमी झाली असली तरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती देण्यात आली यावेळी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंत्री गिरीष महाजन, मंत्री आदिती तटकरे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री भरत गोगावले, मंत्री निलेश राणे यांनी चर्चेत भाग घेतला.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1927582965929845240
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर व धुळे येथे प्रत्येकी दोन पथके सज्ज ठेवण्यात आली असून, नांदेड आणि गडचिरोलीकडे ही पथके रवाना झाली आहेत. राज्यभरात संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1927582965929845240
मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच अतिवृष्टी, धरणांमधील पाणीपातळी, पिकांची स्थिती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव यांनी सादरीकरण करताना सांगितले की, ‘सचेत’ प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 19 कोटींहून अधिक सतर्कतेचे संदेश नागरिकांना पाठवण्यात आले आहेत. राज्य आपत्कालीन केंद्रामध्ये अत्याधुनिक संवाद यंत्रणा व निर्णय सहाय्य प्रणाली (Decision support system) कार्यरत आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1927582965929845240
नुकसानीच्या तात्काळ पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Mumbai Maharashtra News Highlights : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!