Mumbai Maharashtra News Today : राज्यात दोन नवी राजकीय समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातीलही दरी मिटण्याची शक्यता आहे. ही दोन्ही समीकरणं जुळून आल्यास राज्यातील राजकारणात कदाचित वेगळे वारे वाहू लागतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी हा खटाटोप सुरू आहे. विधानसभा आणि लोकसभेत सपाटून मार खालल्यानंतर या चारही नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे आज महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई हे आज सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीसपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश असतील. तसंच, वसई विरारमध्ये ईडीने छापेमारी केली असून ४१ बेकायदेशीर इमारतप्रकरणात धडक कारवाई करण्यात आली आहे. तर, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यासह राज्यातील विविध अपडेट्स जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News Live Today 14 May 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या
Devendra Fadnavis : “भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने दाखवलं”, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सैन्यांचं कौतुक
गुटख्याची विक्री करणारे दोघेजण अटकेत
महापालिका शाळेची गोधडी आता परदेशात, विद्यार्थिनींना शिक्षिकेची साथ
“नाक घासून माफी मागा, मगच विलिनीकरणाची चर्चा करा”, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ठेवल्या अटी-शर्थी
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी अजित पवारांवर विखारी टीका केल्या आहेत, त्यांनी नाक घासून माफी मागावी, मगच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजित दादांनी निर्णय घ्यावा. दादा जो निर्णय घेतील ते आम्ही सर्व मान्य करू. टोकाची भाषणं कोणी केली. उत्तमराव जाणकर, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, काही जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांवर टीका टिप्पणी केली. त्यांनी माफी मागून पापक्षालन करावं. आम्हीही टीका केली, पण आमच्या टीकेचा एक स्तर होता. आमच्याकडूनही जहाल टीका झाल्या असतील तर आम्ही माफी मागायला तयार आहोत – अमोल मिटकरी</p>
नव्या उड्डाण पुलामुळे घोडबंदरचा प्रवास वेगवान; भाईंदर पाडा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला
जलमय, खड्डेमय स्थितीला प्रशासकासह सरकार जबाबदार – महापालिकांच्या कारभारावर संजय राऊत यांचे टिकास्त्र
राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; म्हणाल्या, “भाजपात जाण्याबाबत…”
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे एमआयडीसी समोर आव्हान.
पुण्यात अजित पवार गटाला मोठा धक्का
नागपूरमध्ये भाजपचा हिंदी भाषिकांच्या मतांवर डोळा
संजय राऊतांनी नारायण राणे आणि राज ठाकरेंचं जाहीररित्या केलं कौतुक; म्हणाले…
मी नेहमी दोन लोकांचं कौतुक करतो. राज ठाकरे आणि नारायण राणे. नारायण राणेंनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण ही शिवसेना माझी आणि मी या पक्षाचा असा दावा त्यांनी केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमलं नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि राजकारण सुरू ठेवलं. राज ठाकरेंनी दुसरा पक्ष स्थापन केला. तेव्हा आमचे मतभेद झाले. एकनाथ शिंदेंप्रमाणे त्यांनी पक्षावर दावा केला नाही – संजय राऊत</p>
राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
कृष्णा मराठवाड्याचे पाणी डिसेंबरपर्यंत, भोयर येथील पंप पूर्णत्वाकडे
जालना: पैशाच्या वादामधून लहान भावासह पुतण्याचा खून
मुंबईत मेट्रोचं जाळं वाढवणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काशीगाव ते दहीसर या मेट्रोच्या टप्प्याची तांत्रिक चाचणी होत आहे. ती झाल्यावर प्रवाशांसाठी हा टप्पा सुरु केला जाईल. पश्चिम द्रुतगती महामार्गाला पर्याय म्हणून मेट्रो हा चांगला पर्याय आहे. नेताजी सुभाषचंद्र मैदान ते अगदी बांद्र्यापर्यंत आपल्यालाला कनेक्टिव्हिटी करायची आहे. विविध टप्प्यांमध्ये त्याचं काम चाललं आहे. असं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दहिसर ते काशिगाव मेट्रो ९ मार्गाची आज चाचणी, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर
#WATCH | Mumbai: Maharashtra CM Devendra Fadnavis and Deputy CMs Ajit Pawar & Eknath Shinde conduct technical inspection of metro from Dahisar (East) to Kashigaon on Metro Route-9. pic.twitter.com/ZPuTvsD1Jo
— ANI (@ANI) May 14, 2025
तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीआधीच एकनाथ खडसेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवारांचा गट वेगळा झाला तेव्हाच…”
डोंबिवलीतील शिक्षिकेला मोबाईलवर अश्लिल लघुसंदेश पाठवून छळवणूक, छळ करणाऱ्या इसमावर चोरीचा आरोप
भूषण गवईंकडून शस्त्रसंधी होणार नाही – संजय राऊत
डी. वाय. चंद्रचूडही महाराष्ट्राचे होते. चंद्रचूड आणि गवई यांच्यात फार मोठा फरक आहे. चंद्रचूड यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. पण त्यांनी न्याय केला नाही. भूषण गवई यांच्याविषयी बरंच ऐकतोय, सामान्य घरातून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले. कालच त्यांची एक मुलाखत ऐकली एक मराठी माणूस म्हणून मन भरून आलं. त्यांनी परखडपणे सांगितलं की मी इथे विकत जायला बसलेलो नाही. मी सुद्धी निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही. अशा माणसाला कोणीही विकत घेऊ शकत नाही. त्याला मोदीच काय डोनाल्ड ट्रम्पही विकत घेऊ शकत नाही. शस्त्रसंधी भूषण गवईंकडून होणार नाही – संजय राऊत</p>
“राज ठाकरे मुक्त विद्यापीठ, त्यामुळे चर्चा करत राहू”, पालिका निवडणुकीवरून देवेंद्र फडणवीसांचं विधान
राज ठाकरेंशी आम्ही नेहमीच चर्चा करतो. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळीही केली. कॉर्पोरेशनपूर्वीही करू. या चर्चेतून काय निघेल हे आज सांगता येत नाही. कारण राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यामुळे त्यांची स्वतःची काही स्टॅट्युट आहेत. त्यामुळे कोणाला डिग्री मिळेल हे सांगता येत नाही – देवेंद्र फडणवीस</p>
त्यांना ज्यावेळी ज्यांच्यासोबत जायचं असतं ते त्यांच्यासोबत जातात. लोकसभेवेळी ते आमच्याबरोबर होते. पण विधानसभेवेळी ते आमच्याबरोबर होते की नव्हते हे त्यांना आणि आम्हालाच माहिती आहे – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे सुपूत्र भुषण गवई यांनी घेतली ५२ व्या सरन्यायाधीश पदाची शपथ
STORY | Justice B R Gavai sworn in as next CJI
— Press Trust of India (@PTI_News) May 14, 2025
READ: https://t.co/XCc0ieb6DG pic.twitter.com/32sgJ5Arfw
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
Maharashtra Breaking News Live Today 14 May 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घ्या