Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण :
Maharashtra Breaking News Live Today, 15 October 2024 : चित्रा वाघ, पंकज भुजबळ यांची विधान परिषदेवर वर्णी; निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पार पडणार शपथविधी
नागपूर : बाळगोपाळांना केजी, सिनिअर केजीमध्ये प्रवेश देण्यासाठी पालकांची दरवर्षी धावपळ असते. घराजवळच्या शाळांचे प्रवेश पूर्ण झाल्यामुळे दूरवच्या शाळांमध्येही शोधाशोध सुरू झाली आहे.
नागपूर : मान्सूनच्या परतीचा प्रवास आता वेग धरु लागला असून उत्तर आणि ईशान्य भारताच्या अनेक भागातून मान्सूनने माघार घेतली आहे
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक… pic.twitter.com/xRD2s1gcia
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 15, 2024
राज्यात एका टप्प्यात निवडणूक होत असेल तर आम्हाला त्यावर आक्षेप नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे जाऊ महाराष्ट्रातील जनतेला घाबरलेलं हे सरकार वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. हव्या त्या घोषणा करून पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न यांचा प्रयत्न आहे. पण राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांन दिली.
नागपूर : भाजपने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनामासाठी ३१ वेगवेगळ्या मुद्द्यांवर काम सुरू केले आहे.
नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक विधानसभेचा उमेदवारी जाहीर करताच भाजपने त्याच्याविरोधात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
सविस्तर वाचा…
आम्ही निवडणुकीची वाट पाहत होतो, आता निवडणूक जाहीर झाली आहे. आम्ही तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
#WATCH महाराष्ट्र में चुनाव की घोषणा पर शिवसेना (UBT) नेता संजय राउत ने कहा, "…हमें चुनाव का इंतजार था, चुनाव की घोषणा हो गई है, हम तैयारी में लगे हैं। हम चुनाव आयोग से इतनी उम्मीद करते हैं कि वह हरियाणा की तरह इस राज्य में चुनाव न कराए, पूरे देश की जनता देख रही है कि हरियाणा… pic.twitter.com/uiWRNFiG25
— ANI_HindiNews (@AHindinews) October 15, 2024
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू, भाजपाच्या नेतृत्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभा निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
शंखनाद ?#Maharashtra #AssemblyElections2024 #Elections2024 #MaharashtraElection2024 pic.twitter.com/LdLPIlU5J9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 15, 2024
२२ ऑक्टोबर नोटिफिकेशन
२९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्जांची छाननी
४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर मतदान
२३ नोव्हेंबर निकाल
Schedule for Bye Elections to 48 ACs and 2 PCs across 15 States.
— Election Commission of India (@ECISVEEP) October 15, 2024
Details in images?#Elections2024 #ECI pic.twitter.com/UfStKpkuId
पहिला टप्पा
१८ ऑक्टोबर नोटिफिकेशन
२५ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख
२८ ऑक्टोबर अर्जांची छाननी
३० ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख
१३ नोव्हेंबर मतदान
२३ नोव्हेंबर निकाल
दुसरा टप्पा
२२ ऑक्टोबर नोटिफिकेशन
२९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्जांची छाननी
१ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर मतदान
२३ नोव्हेंबर निकाल
Schedule for General Election to Legislative Assembly of #Jharkhand to be held in two phases.

Details in images?#JharkhandAssemblyElections2024 #ECI #Schedule pic.twitter.com/mVOfJ5D7Pw
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान
२२ ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन
२९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्ज छाननी
४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर रोजी मतदान
२३ नोव्हेंबर रोजी निकाल
Schedule for General Election to Legislative Assembly of #Maharashtra,2024 to be held in a single phase.

Details in images?#MaharashtraAssemblyElections2024 #ECI #Schedule pic.twitter.com/XF4FXebtJR
व्होटर अॅपवर मतदार त्यांची माहिती तपासू शकतात. पैसे मद्य ड्रग्जच्या वाटपावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मतदान केंद्र २ किलोमीटरच्या अंतर्गत असेल – राजीव कुमार
मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरुन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्ण पणे पारदर्शकता बाळगण्यात येईल, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली
मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे- राजीव कुमार
महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ९३ लाख पुरुष तसेच ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंघ २८८ आहेत. त्यापैकी २५ अनुसूचित जाती तर २९ अनुसूचित जमीतीसाठी राखीव आहेत.
महाराष्ट्रात १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत.
आम्ही झारखंड आणि महाराष्ट्रात भेट घेतली. तिथे राजकीय पक्षांबरोबर इतरांशी चर्चा केली. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थेची माहिती घेतली. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. – राजीव कुमार
मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या नागरिकांचं अभिनंदन आणि खूप खूप आभार. दोन्ही राज्याच्या लोकांनी जो उत्साह दाखवला आहे. तो कायमस्वरुपी लक्षात राहील. – मुख्य निवडणूक आयुक्त
कोला : विधानसभा पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय कार्यालयांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजा वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणाशिवाय मंजूर करू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
आर्थिक फसवणुकीचा प्रकार १२ डिसेंबर २०२२ ते ११ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अकलूजमध्ये एका हॉटेलात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.
“आम्ही कष्ट करून उदरनिर्वाह करायला तयार, पण समाज आम्हाला…” तृतीयपंथी शिवन्या, मोहिनीचा सवाल
नागपूर : समाजातील सर्वसामान्यांप्रमाणेच आम्हीही कष्ट करून उदरनिर्वाह करायला तयार आहोत. मात्र, आम्हाला सर्वसामान्यांसारखीच वागणूक द्यायला, नोकरी द्यायला, त्यांच्यात सामावून घ्यायला, लोक तयार आहेत का, असा प्रश्न शिवन्या व मोहिनी या तृतीयपंथीयांनी उपस्थित केला.
अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना आमिर नावाच्या व्यक्तीने तीन दिवसांत धमकीचे दुसरे पत्र सोमवारी पाठवले.
मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या बहराइचमधून आणखी दोघांना अटक केली आहे. यापैकी एकाचं नाव हरीश असं आहे. हरीश हा या प्रकरणातील अन्य आरोपी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार बरोबर पुण्यात भंगाराचे काम करायचा अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या हत्या करण्यापूर्वी हरीशने धर्मराज आणि शिवकुमारसाठी मोबाईल खरेदी केल्याचंही पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे.
Baba Siddiqui murder case | Mumbai Police has detained two people from Bahraich in Uttar Pradesh. One of the two people detained is Harish, who had a scrap shop in Pune where accused Dharmaraj and Shivprasad Gautam used to work. Harish had bought new mobile phones for Shivprasad…
— ANI (@ANI) October 15, 2024
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आता भाजपातून उघड आव्हान दिले जात असून मुरबाडमध्ये नुकताच निष्ठावंतांचा मेळावा पार पडला.
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही तासांत जाहीर होणार आहे. पण त्या अगोदरच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अमरावती : बडनेरा रेल्वे स्थानकाच्या मागील वाहनतळानजीक पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी सकाळी एका २२ वर्षीय युवतीचा मृतदेह निर्वस्त्र स्थितीत सापडल्याने एकच खळबळ उडाली.
देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्याचे वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं असून ज्या मराठ्यांनी त्यांना १०६ आमदार निवडून दिले, त्याच मराठ्यांच्या मुलांचे मुडदे पाडण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. मनोज जरांगे यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.
मुंबई : अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर मनोरंजनसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतुल परचुरे यांच्या दादरमधील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले.
कल्याण, डोंबिवलीतील पाचही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काही दलालांच्या माध्यमातून गुपचूप बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बारा जागांवर सात जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णान यांच्याकडे करण्यात आली आहे. यात भाजपचे तीन, तर शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या प्रत्येकी दोन नावांचा समावेश आहे. राज्यपालांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नियुक्त्या करणे अपेक्षित असताना राजकीय नेत्यांचीच वर्णी लावली जात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि पोहरादेवी येथील धर्मगुरू बाबूसिंग महाराज राठोड यांची नावे देण्यात आली आहेत. शिंदे गटाच्या कोट्यातून माजी खासदार हेमंत पाटील आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे तर अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवडी यांची वर्णी लावण्यात आली आहे.