Nagpur Breaking News Updates: यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात फुलसावंगी परिसरात आज सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात टेंभी शिवारातील शेतात काम करणाऱ्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली दुसरी महिला गंभीर भाजली आहे. तर दुसरीकडे हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या आजारामुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 19 may 2025

00:49 (IST) 20 May 2025

उल्हास, वालधुनीत मिसळणाऱ्या नाल्यांचे जीओ टॅगिंग; नाल्यांचे अक्षांश, रेखांशासह नाल्यांची संपूर्ण माहितीचे संकलन

ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे. …अधिक वाचा
00:49 (IST) 20 May 2025

उल्हास, वालधुनीत मिसळणाऱ्या नाल्यांचे जीओ टॅगिंग; नाल्यांचे अक्षांश, रेखांशासह नाल्यांची संपूर्ण माहितीचे संकलन

ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे. …अधिक वाचा
00:39 (IST) 20 May 2025

तुळजाभवानी मंदिरात दहा हजार दान देणाऱ्यांना नि:शुल्क दर्शन, शिर्डीच्या साई मंदिराच्या पावलावर पाऊल

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनाबाबत प्रस्तावित नियमावलीच्या अनुषंगाने सूचना आणि अभिप्राय मागविण्यात आले आहेत. …वाचा सविस्तर
23:52 (IST) 19 May 2025

मेट्रो ३… बीकेसी ते आचार्य अत्रे मार्गिकेवरुन आतापर्यंत दोन लाख प्रवाशांचा प्रवास, मार्गिकेला वाढता प्रतिसाद

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या मेट्रो ३ चे काम सुरु आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. …वाचा सविस्तर
23:30 (IST) 19 May 2025

अजित पवारांचे पुस्तकाऐवजी क्रेन पुष्पहारांनी स्वागत

बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनिमित्त आयोजित अजित पवार यांच्या दौऱ्याचा प्रारंभ परळीतूनच झाला …सविस्तर बातमी
21:46 (IST) 19 May 2025

उद्धव ठाकरे यांच्या काळापेक्षा रस्ते कामाचा वेग अधिक; पालकमंत्री ऍड. आशिष शेलार यांचे मत

कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी दिले. …सविस्तर बातमी
21:27 (IST) 19 May 2025

नामांकित कंपन्यांच्या नावे पादत्राणे करणाऱ्या कारखान्यावर छापा; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारखान्यातून तब्बल आठ लाख रुपये किमतीच्या चपला आणि बूट पोलिसांनी जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. …सविस्तर वाचा
20:41 (IST) 19 May 2025

मुंबईच्या रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर सोनमोहोराचा सडा

सोनमोहोराच्या झाडाखालून जाताना होणारा पिवळ्या फुलांचा वर्षावही भर उन्हाळ्यात मन प्रसन्न करतो आहे. …अधिक वाचा
20:30 (IST) 19 May 2025

खरिप हंगामाचा खेळखंडोबा; कृषी सहाय्यकांचा बहिष्कार, २०१४ पासून मागण्या प्रलंबित

कृषी सेवकाचा कालावधी रद्द करावा, या २०१४ पासूनच्या प्रलंबित मागण्यासाठी पाच मेपासून कृषी सहाय्यक काळ्या फिती लावून काम करीत होते. …अधिक वाचा
19:31 (IST) 19 May 2025

बस अपघातात पाय गमवाव्या लागलेल्या नागरिकाला एक कोटींची भरपाई; मोटार वाहन अपघात दावे न्यायाधिकरणाचा निर्णय

बसचा चालक भरधाव, बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. परिणामी, त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला उलटली. …अधिक वाचा
19:23 (IST) 19 May 2025

आंतरराष्ट्रीय प्रश्नांत पक्षाची भूमिका आणू नये; ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा संजय राऊत यांना टोला

एका शिष्टमंडळामध्ये त्यांच्या पक्षाची एक महिला सदस्यदेखील आहे. त्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये पक्षीय भूमिका आणू नये,’ असे पवार म्हणाले. …सविस्तर बातमी
19:04 (IST) 19 May 2025

मेट्रो ४ आणि ४ अ…कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो मार्गिकेची चाचणी ऑगस्टमध्ये, वर्षाअखेर मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन

वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली-गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेवरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या १०.५ किमी मार्गिकेवरील चाचणीला ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे. …वाचा सविस्तर
19:04 (IST) 19 May 2025

सीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

कुर्ला-परळ पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे (१०.१ किमी) नवीन रेल्वे मार्ग टाकणे आणि कुर्ल्यापुढील प्रवाशांची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. …वाचा सविस्तर
18:17 (IST) 19 May 2025

आजारांबद्दल बोलका बाहुला जागृती करणार; पुण्यातील सह्याद्री रुग्णालयासाठी सत्यजित पाध्येंकडून ‘विचारकर’ बाहुल्याची निर्मिती

भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. ‘विचारकर’ बाहुला भारतातील पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट ठरला आहे. …अधिक वाचा
17:05 (IST) 19 May 2025

हवाई दलाचा गणवेश परिधान करणाऱ्या तोतया अटकेत; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

पोलिसांनी त्याचा घरातून दोन टी शर्ट, हवाई दलाचे बिल्ले (बॅज), शूज, जर्किन असा मुद्देमाल जप्त केला. हवाई दलाचा गणवेश त्याने महिनाभरापूर्वी जाळून टाकल्याची माहिती दिली आहे. …सविस्तर बातमी
16:43 (IST) 19 May 2025

मसाज पार्लरच्या नावाखाली पुण्यातील कल्याणीनगर भागात वेश्याव्यवसाय

तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली. …सविस्तर बातमी
16:28 (IST) 19 May 2025

विधान भवनातील प्रवेशद्वार  तपासणी कक्षात आग; जीवितहानी नाही

आग काही मिनिटात विझली असली तरी विधानभवनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी आणि विद्युत यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. …अधिक वाचा
15:45 (IST) 19 May 2025

अधिकाऱ्यांना न्यायसंस्थेचा राग आहे का? सरन्यायाधीश गवई यांनी प्रोटकॉलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काँग्रेसचा सवाल

भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथम महाराष्ट्रात आले. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्य शिष्टाचार (प्रोटॉकालचा) मुद्दा उपस्थित केला. …अधिक वाचा
15:26 (IST) 19 May 2025

नागपूर : ३० जूनपर्यंत ऑनलाईन कर भरणा केल्यास १५ टक्के सवलत

नागपूर महापालिकेत या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने उचललेल्या पावलांना करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. …अधिक वाचा
14:59 (IST) 19 May 2025

तब्बल १३ वर्षानंतर बोधगया महाविहाराबाबत सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली तारीख

नागपूर : बिहारमधील बोधगया येथील महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाशी संबंधित ‘बोधगया मंदिर कायदा, १९४९’ रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात २०१२ साली याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने तब्बल १३ वर्षानंतर याचिकेवर अंतिम सुनावणीसाठी तारीख निश्चित केली आहे.

सविस्तर वाचा….

14:41 (IST) 19 May 2025

अकरावीला प्रवेश घ्यायचा आहे ? प्रवेशाची चिंता मिटली

अकरावी प्रवेश प्रक्रियेला २१ मे पासून सुरूवात होणार असून अनेक विद्यार्थी व पालकांना महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिंता सतावत आहे. मुंबई विभागातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या १ लाख ४० हजार ७४ इतक्या जागा जास्त आहेत. सविस्तर वाचा

14:41 (IST) 19 May 2025

महारेरा नोंदणीकृत दलालांची संख्या ५० हजार पार; कोकण विभागात सर्वाधिक २१ हजार ५० दलालांची नोंदणी

महारेरा नोंदणीकृत गृहनिर्माण प्रकल्पांनी ५० हजारांचा टप्पा पार केल्यानंतर आता स्थावर संपदा क्षेत्रात महत्त्वाची अशी भूमिका बजावणाऱ्या दलालांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. सविस्तर वाचा…

14:40 (IST) 19 May 2025

धार्मिक पशुवधाच्या परवानगीसाठी यंदा महानगरपालिकेकडून ऑनलाईन सुविधा, बकरी ईदीनिमित्त देवनार पशुवधगृहात विविध सुविधा उपलब्ध

बकरी ईदनिमित्त धार्मिक पशुवधाच्या परवानगीचा अर्ज करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे यंदा पालिकेच्या अॅप्लिकेशनवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, म्हैसवर्गीय प्राणी व बकरे यांचा आयात परवाना व ‘स्लॉट बुकिंग’साठीही ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. सविस्तर वाचा…

14:39 (IST) 19 May 2025

‘या’ समाजाचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल, “सरकार तर आले, आमचे काय?” फुंकला बिगुल…

विधानसभा निवडणुकीपूर्वी समाज नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आले की तुमच्या मागण्या मार्गी लावणार, अशी हमी दिली होती. …वाचा सविस्तर
14:32 (IST) 19 May 2025

‘सारथी’च्या ‘फेलोशिप’ची प्रतीक्षाच, संशोधक विद्यार्थ्यांचे हाल

अमरावती : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे अंतर्गत पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्या प्रलंबित फेलोशिप, घरभाडे भत्ता आणि आकस्मिकता निधी मिळालेला नाही. यामुळे हे संशोधक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत.

अधिक वाचा…

14:30 (IST) 19 May 2025

Maharashtra Rain Alert Today: राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

सविस्तर वाचा…

14:28 (IST) 19 May 2025

Mumbai COVID-19 Death: मुंबईत दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये करोनाबाधित असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र हे मृत्यू करोनामुळे झाले नसून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या आजारामुळे झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…