Today Pune News Live Updates 30 may 2025: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला शोधून काढलं आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या चुलत्यांसह इतरांना धमकावणाऱ्या आणि इतर आरोप असणारा निलेश चव्हाण फरार होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी- चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याला नेपाळमधून बेड्या ठोकल्या आहेत. 

या बातमीसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरमधील विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Latest Live News Updates, 30 may 2025

22:16 (IST) 30 May 2025

तरुणीचा विनयभंग प्रकरणी टॅक्सीचालकाला अटक

अनिल आशिक अली शेख (२९) असे या टॅक्सीचालकाचे नाव आहे. त्याने टॅक्सीत बसलेल्या २२ वर्षीय तरुणीचा वाकोला येथे विनयभंग केला होता. …सविस्तर वाचा
22:08 (IST) 30 May 2025

राज्यात करोनाच्या ८४ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यामध्ये दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, राज्यात ३० मे रोजी ८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६८१ वर पोहचली आहे. मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या ४११ इतकी झाली आहे.

राज्यामध्ये शुक्रवारी सापडलेल्या ८४ पैकी सर्वाधिक ३२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत १४, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील १९ रुग्ण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सांगली महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी ३ रुग्ण, रायगड, सातारा आणि ठाणे जिल्हांत प्रत्येकी २ रुग्ण, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक रुग्णा रुग्णाचा त्यात समावेश आहे.

जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण १०,३२४ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ६८१ रुग्ण बाधित आढळले. एकट्या मुंबईत ४११ रुग्ण सापडले आहेत.आतापर्यंत २०७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून ते घरीच उपचार घेत आहेत.

22:02 (IST) 30 May 2025

एक लाख विद्यार्थ्यांनी केली आयटीआयसाठी नोंदणी, पाच दिवसांत ३५ हजार १२८ विद्यार्थ्यांनी भरले पसंतीक्रम

यंदा आयटीआयच्या प्रवेशासाठी ४१९ शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार व ५८८ अशासकीय आयटीआयमध्ये ६१ हजार अशा एकूण १ लाख ५४ हजार जागा आहेत. …सविस्तर वाचा
21:32 (IST) 30 May 2025

महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या बहाण्याने ८२ लाखांची फसवणूक, दलालाला अटकेपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

गीता रेस्टॉरंटचे मालक जयप्रकाश शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे विलेपार्ले पोलिसांनी १४ एप्रिल रोजी याचिकाकर्त्यासह अन्य आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. …वाचा सविस्तर
21:15 (IST) 30 May 2025

अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ काही अंशी सुरळीत, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षातील गर्दी ओसरली

अनेक प्रयत्नांनंतर संदेश आल्यावर ते अन्य कोणी लॉगिन केल्याचे दाखविणे, तसेच अर्जाचा दुसरा भाग सुरूच न होणे अशा अनेक समस्यांनी चार दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला …सविस्तर बातमी
21:04 (IST) 30 May 2025

टिटवाळ्यात शाळेची संरक्षित भिंत कोसळून मुलाचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याने शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी मुलांच्या पालक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. …सविस्तर वाचा
19:19 (IST) 30 May 2025

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तीला अटक

खिडकीतून घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित मुलीवर दोन वेळा जबरदस्ती केली होती. …सविस्तर वाचा
19:10 (IST) 30 May 2025

ठाणे-घोडबंदर ते भाईंदर दुहेरी बोगदा आणि उन्नत रस्ता, एमएमआरडीए लवकरच पुनर्निविदा काढणार; प्रकल्पाच्या खर्चात ३००० कोटी रुपयांनी कपात

ठाणे-घोडबंदर ते भाईंदर दुहेरी बोगदा आणि उन्नत रस्ता अखेर एमएमआरडीएने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली असून या प्रकल्पांसाठी आता नव्याने निविदा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. …वाचा सविस्तर
18:46 (IST) 30 May 2025

सव्वादोन कोटींची सायबर फसवणूक, डिजिटल अरेस्ट प्रकरणी गुजरात व पुण्यात सायबर पोलिसांची कारवाई; तिघांना अटक

डिजिटल अरेस्टच्या दोन प्रकरणांमध्ये सायबर पोलिसांनी गुजरात व पुण्यात कारवाई करून तिघांना अटक केली. मनी लाँडरींग व अमली पदार्थ तस्करीप्रकरणात सहभाग असल्याची भीती दाखवून या दोन प्रकरणांमध्ये मिळून सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. …वाचा सविस्तर
18:36 (IST) 30 May 2025

संघर्षयात्री !

१ जून २०२५ रोजी डॉ. बाबा आढाव वयाची ९५ वर्षे पूर्ण करून ९६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मला वाटते, बाबा आढावांचा हा वाढदिवस परिवर्तनवादी चळवळींचा वारसा जपणाऱ्या विचारांचा गौरवदिन आहे. …वाचा सविस्तर
17:54 (IST) 30 May 2025

छत्रपती संभाजीनगरमध्ये परवडणाऱ्या दरात भूखंड खरेदीची संधी; म्हाडाच्या ५३ अनिवासी भूखंडांचा ई लिलाव

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने ५३ व्यावसायिक, अनिवासी भूखंडांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या भूखंडांचा ई लिलाव करण्यात येणार असून या ई लिलावासाठीच्या नोंदणी, अर्जविक्री आणि अर्जस्वीकृती प्रक्रियेला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. …अधिक वाचा
17:36 (IST) 30 May 2025

इंदिरानगरात शनिवारी वीज पुरवठा बंद

शनिवारी सकाळी सात ते रात्री १० या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे. …सविस्तर बातमी
17:24 (IST) 30 May 2025

झोपडपट्ट्यांमध्ये दीड हजारहून अधिक शौचालये उभारण्याची पालिकेची योजना, निर्णय अद्याप प्रस्तावित

मुंबईत वस्ती पातळीवर महानगरपालिकेने आणखी शौचालये बांधण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात १ हजार ६०० शौचालयांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. …सविस्तर बातमी
16:52 (IST) 30 May 2025

Vaishnavi Hagawane Case: निलेश चव्हाण थेट नेपाळला कसा गेला? गेले काही दिवस पोलीसांना कसा चकवा दिला?

निलेश चव्हाणचा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर पुण्याहून दिल्ली, दिल्लीहून गोरखपूर आणि तिथून नेपाळ गाठल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. …अधिक वाचा
16:47 (IST) 30 May 2025

ठाणे जिल्ह्यात पुर परिस्थितीबाबत उपाययोजना

जिल्ह्यात पावसाळ्याच्या कालावधीत पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात तात्पुरत्या स्वरूपाची पुरपरिस्थिती निदर्शनास आली. जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क झाले आहेत. …सविस्तर बातमी
16:05 (IST) 30 May 2025

न्यायालयाच्या आदेशालाही जुमानले नाही; कर्जमाफीपासून वंचित शेतकरी दाखल करणार अवमान याचिका

कर्जमाफीसाठी पात्र असूनही लाभ न मिळालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. …अधिक वाचा
16:05 (IST) 30 May 2025

Vaishnavi Hagawane Case: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक, पिंपरी- चिंचवड पोलिसांची कामगिरी…

गेल्या काही दिवसांपासून त्याचा शोध पोलीस घेत होते …वाचा सविस्तर
15:48 (IST) 30 May 2025

ठाणे शहरात वृक्ष छाटणीला सुरुवात; मात्र, वृक्ष छाटणीचा कचरा रस्त्यावरच

ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतू, या वृक्षांचे खोड, फांद्या रस्त्यावरुन अद्याप उचलले नसल्याची बाब समोर आली आहे. …वाचा सविस्तर
15:40 (IST) 30 May 2025

राज्यात पावसाला ‘ब्रेक’,पण विदर्भात सतर्कतेचा इशारा

हवामान खात्याने एकीकडे राज्यात पावसाला ‘ब्रेक’ लागणार असे सांगितले असले तरीही दुसरीकडे विदर्भात मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे. …सविस्तर बातमी
15:39 (IST) 30 May 2025

अंबरनाथच्या कुशिवलीजवळ आढळले दोन मृतदेह, आत्महत्येचा संशय; तरूण, तरूणी प्रेमी युगल असल्याची शक्यता

याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताह्यात घेतले. …सविस्तर वाचा
15:35 (IST) 30 May 2025

दुर्बिणीद्वारे लिगामेंट प्रत्यारोपण आणि फाटलेली गादी पूर्ववत; तरुण रुग्णाला दिलासा!ठाणे जिल्हा रुग्णालयात गुढघ्याची जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी…

ठाणे जिल्हा रुग्णालयात गुरुवारी एका २४ वर्षीय तरुणावर गुडघ्याची अवघड आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. …सविस्तर बातमी
15:34 (IST) 30 May 2025

NEET-PG Exam: नीट-पीजी परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; परीक्षेचे स्वरूपच बदलणार..

नीट-पीजी (नॅशनल एलिजिबिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ही भारतात एमबीबीएसनंतरच्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये, जसे की एम.डी., एम.एस. आणि पीजी डिप्लोमा यामध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा आहे. …सविस्तर बातमी
15:18 (IST) 30 May 2025

पोलीस हवालदार सचिन खटे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …सविस्तर बातमी
15:10 (IST) 30 May 2025

दुःखद प्रसंगात ग्रामपंचायत देणार आधार…मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी तत्काळ…

गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने गावातील कुटुंबातील कुणाच्या  घरी कुणी मरण पावला तर  सांत्वन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. …सविस्तर वाचा
15:06 (IST) 30 May 2025

कल्याणमध्ये वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना रुग्ण सेवा देणाऱ्या दोन डाॅक्टरांवर गुन्हे, कडोंमपा वैद्यकीय विभागाची कारवाई

कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय विभागाने या दोन्ही डाॅक्टरांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांच्या विरूध्द विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. …वाचा सविस्तर
14:43 (IST) 30 May 2025

आई कारागृहात…पाच महिन्यांच्या बाळाचे कुणीच नाही…आता जामिनाचा कालावधी…

आई कुठेही असो, तिला बाळाची कायम चिंता असते. मग ती गृहिणी असो काम करणारी असो किंवा कारागृहात बंद असलेली महिला असो, आईचे ह्रदय बाळासाठी सारखेच स्पंदत असते. …वाचा सविस्तर
14:19 (IST) 30 May 2025

शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर कृषी सेवा केंद्र कायमचे बंद!

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात व याद्वारे उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी विविध कृषी केंद्रांतून कृषी विभागाच्या पथकांद्वारा वेळोवेळी नमुने काढण्यात आले. …वाचा सविस्तर
14:16 (IST) 30 May 2025

उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्यासाठी तिकीट सेवा बंद

शासनाने सोलापूर विभागातील प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
13:52 (IST) 30 May 2025

देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यात संगीत खुर्ची! दोन एसीपी कार्यालयात, पोलीस यंत्रणा संभ्रमात…

राजकारणात खुर्चीसाठी नेते, पदाधिकारी  यांच्यात  जाहीर वाद, संघर्ष होणे सामान्य बाब ठरते. किंबहुना खुर्ची वरून  नेत्यांत  संगीत खुर्ची, मानापमान  नाट्य रंगले नाही तर ते नवल ठरते. …अधिक वाचा
13:47 (IST) 30 May 2025

ठाणे – घोडबंदर ते भाईंदर बोगदा, उन्नत रस्ता प्रकल्पासाठीच्या निविदा अखेर रद्द, एमएमआरडीएची सर्वोच्च न्यायालयात माहिती

प्रकल्पासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी त्याबाबतची माहिती देण्यात आली. …सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे