Nagpur Breaking News Updates : भारत-पाकिस्तानमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले. ७ मे रोजी हा सराव होणार असून त्यामध्ये शत्रूने हल्ला केल्यास सुरक्षा यंत्रणा तसेच नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढविण्याचा उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात नागपुरात आणि नजीकच्या शहरात कुठल्या भागात स्वसंरक्षणाचा सराव केला जाणार आहे ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 06 May 2025

09:48 (IST) 7 May 2025

बिबट्या @ मुक्कामपोस्ट पुणे विमानतळ !

पुणे विमानतळ परिसरातील वसाहतीतील लोकांमध्ये एप्रिलच्या सुरुवातीपासूनच याठिकाणी बिबट असल्याची कुजबुज सुरू होती. तर २८ एप्रिलला पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ एक बिबट्या दिसल्याने आणि तशी अधिकृत तक्रार पुणे वनखात्यात करण्यात आल्यामुळे वनअधिकारी आणि वन्यजीवतज्ञ एका आठवड्याहून अधिक काळापासून “हाय अलर्ट”वर होते. …सविस्तर बातमी
23:50 (IST) 6 May 2025

परदेशी नोकरीचा मोह महागात; ३८ तरुणांना सव्वा कोटींचा गंडा

हॉटेलमध्ये किचन स्टाफ, वाहनचालक, हाऊसकिपिंग, स्टोअर किपर, सुरक्षारक्षक आदी पदांसाठी जागा रिक्त असून त्यात नोकरी लावण्याचा दावा कंपनीने केला होता. …अधिक वाचा
21:59 (IST) 6 May 2025

मिठी नदी गाळ कंत्राट गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखलच तीन पालिका अधिकाऱ्यांसह मध्यस्थी व कंत्राटदारांविरोधात गुन्हा

तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. …सविस्तर वाचा
20:15 (IST) 6 May 2025

दोन बिबट्यांची कातडी, एक हस्तीदंत जप्त

गुप्त माहितीच्या आधारे या विभागाने उज्जैनमधील एका हॉटेलमध्ये दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. …सविस्तर बातमी
20:06 (IST) 6 May 2025

मुंबईत दोन वेळा रस्त्यांची सफाई होणार, कचऱ्याच्या गाड्यांची सेवा कंत्राटदारांकडून घेणार, मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई शहर आणि उपनगरांतील घनकचरा व्यवस्थापनाची सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कामांचे फेरनियोजन करण्यात आले आहे. …वाचा सविस्तर
18:35 (IST) 6 May 2025

प्रवाशांची डिजिटल तिकीटांना पसंती ६५ टक्के प्रवाशांचा प्रवास डिजिटल तिकीटाद्वारे, व्हाॅटसॲप तिकीटांचा सर्वाधिक वापर मेट्रो २ अ आणि ७ वर

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिका टप्प्याटप्प्यात दाखल झाल्या असून सध्या या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावत आहेत …वाचा सविस्तर
18:11 (IST) 6 May 2025

राहूल गांधींच्या प्रभू श्रीराम हे ‘पौराणिक पात्र’ असल्याच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया; श्रीरामांचा विरोध करणाऱ्यांचा अंत निश्चित…

यावर सर्वच स्तरातून विरोध होत असून विश्व हिंदू परिषदेनेही राहूल गांधींच्या या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी या वक्तव्यासाठी राहूल गांधी यांनी देशातील सर्व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. …अधिक वाचा
17:02 (IST) 6 May 2025

पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा, इच्छुकांच्या आकांक्षांना धुमारे…

महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. अमरावती महापालिका आणि जिल्हा परिषदेवर गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. …अधिक वाचा
17:00 (IST) 6 May 2025

विदर्भातील शिक्षकही न्यायालयात जाणार! संचमान्‍यतेचा शासन निर्णय…

याचिकेतील उपस्थित केलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन उच्च न्यायालयाने शासनाला व सर्व प्रतिवाद्यांना संचमान्यतेबाबत आज आहे ती परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश पारित केले. …सविस्तर बातमी
16:44 (IST) 6 May 2025

नागपुरात ५ ते ७ टक्के मुलांमध्ये अस्थमा… श्वसनरोग तज्ज्ञ काय म्हणतात…

विदर्भ चेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश स्वर्णकार म्हणाले, अस्थमाचे रुग्ण भारतात झपाट्याने वाढत असून जगात भारताचा या रुग्णसंख्येत (भारतात ३.५० कोटी रुग्ण) चौथा क्रमांक आहे. परंतु, या आजाराने होणाऱ्या मृत्यूत (भारतात वर्षाला २ लाख रुग्णांचा मृत्यू) मात्र भारत पहिला आहे. …अधिक वाचा
16:28 (IST) 6 May 2025

शासकीय रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागाच्या कार्डसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही… ‘क्यूआर कोड’द्वारे…

नागपूर, महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट नंबर कार्ड (आभा) नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. हे कार्ड असलेल्यांसाठी वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णालयांत ‘क्यूआर कोड’ नोंदणीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. …सविस्तर वाचा
16:15 (IST) 6 May 2025

यवतमाळच्या ‘अभिप्राय कक्ष’ची राज्यस्तरावर दखल; काय आहे उपक्रम…

नागरिकांना सेवा विहीत कालावधीत व विहित शुल्कात उपलब्ध झाली का? आपले सरकार सेवा केंद्र, सेतु सुविधा केंद्रात लाभार्थ्यांना वागणूक कशा प्रकारे देण्यात आली, याचा नियमित आणि दैनंदीन आढावा कक्षातील ऑपरेटरकडून लाभार्थ्यांना थेट संपर्क साधून घेतला जातो. …वाचा सविस्तर
15:51 (IST) 6 May 2025

हळदीच्या कार्यक्रमात नाचत असतानाच मोठ्या भावाचा मृत्यू…

हळदीच्या कार्यक्रमात संपूर्ण भोयर कुटुंबीय व्यस्त होते. साेमवारी विवाह असल्याने घरी वऱ्हाडी मंडळी सुध्दा आली होती. सर्व कुटुंबीय मिळून रात्री ११:३० वाजता हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. यात नाचत असलेले नेतराम भोयर हे अचानक भोवळ येऊन पडले. …अधिक वाचा
15:51 (IST) 6 May 2025

डोक्यावर हेल्मेट अन हातात हातगाडीचा स्टॅन्ड; दिवसभर राबणाऱ्या ‘या’ कामगाराच्या यशाची चर्चा

डोक्यावर हेल्मेट अनं हातात चारचाकीचा हॅन्डल घेत दिवसभर ओझ वाहणा-या एका अपंग कामगारासाठी सोमवार ५ मे हा दिवस आगळा वेगळा ठरला. …वाचा सविस्तर
15:30 (IST) 6 May 2025

देशाचे भावी सरन्यायाधीश भूषण गवईंची विदर्भात इतकी संपत्ती…

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायमूर्तींनी मंगळवारी आपली संपत्ती सार्वजनिरित्या जाहीर केली. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. …अधिक वाचा
15:30 (IST) 6 May 2025

गृहमंत्र्यांच्या शहरात वृद्ध महिलेवर बलात्कार करून खून, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर…

या प्रकरणी प्राथमिक माहितीवरुन सीताबर्डी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथके तैनात करण्यात आली आहे. …अधिक वाचा
15:28 (IST) 6 May 2025

केंद्र सरकारचा निधी अडकला अन् ‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट ; नेमकं प्रकरण काय?

तब्बल तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली. या प्रश्नावर एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. …अधिक वाचा
15:09 (IST) 6 May 2025

युद्धसरावातील ब्लॅकआऊटची सूचना देणार कोण?… महावितरणचे अधिकारी म्हणतात…

केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना स्वसंरक्षणासाठी युद्ध सरावाचे आदेश सोमवारी दिले. त्यापार्श्वभूमीवर युद्धादरम्यान रात्री ब्लॅकआऊट करून संपूर्ण काळोख केला जातो. परंतु अद्यापही महावितरणला सूचना नसल्याने ब्लॅकआऊटबाबत सूचना देणार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. …वाचा सविस्तर
14:57 (IST) 6 May 2025

पुणे: मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य, करणाऱ्या एकाला पाच वर्ष सक्तमजुरी

७ ऑक्टोबर २०२१ रोजी मतिमंद मुलगी ओट्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. …सविस्तर वाचा
14:53 (IST) 6 May 2025

मिसेस अदानी असे का म्हणाल्या, “अरे हे हॉस्पिटल की…”

प्रत्येक रुग्णास मिळणारे उपचार, सेवेतील डॉक्टर, उपचार पद्धती, केमोथेरेपी सुविधा, अद्यावत मशिनरी याबाबत त्यांनी विचारपूस केली. शेवटी त्या म्हणाल्या, अरे वाह हे तर मी शासकीय रुग्णालयात पण सेवेचे असे चित्र पाहले नाही. …वाचा सविस्तर
14:32 (IST) 6 May 2025

दुर्गम गावात दुर्मिळ दातृत्व!, निराधार आजीसह नातींना दिले हक्काचे घर; अनाथांचा गृहप्रवेश थाटात

७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव या आजीसह चार नातींसह एका पडक्या घरात राहत होते. घरातील कर्ते पुरुष दगावलेले, त्यामुळे गरीब आजीच चार नातींचा सांभाळ करतात. पवार पिता पुत्रीने पदरमोड करून त्यांना हक्काचे घर बांधून दिले. …सविस्तर बातमी
14:10 (IST) 6 May 2025

बुलडोझर कारवाई का थांबविली नाही? मुख्य सचिवांनी न्यायालयात सांगितले कारण….

एखादी व्यक्ती आरोपी असला तरी त्याच्या संपत्तीवर थेट बुलडोझर कारवाई केली जाऊ नये याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२४ मध्ये मार्गदर्शक तत्त्वे तयार केल्यावर मार्च महिन्यात नागपूर महापालिकेने ही कारवाई केली. …सविस्तर बातमी
13:52 (IST) 6 May 2025

युद्धाच्या वेळी नागपूर सुरक्षित, नागरी संरक्षण मॉक ड्रिल्समध्ये ‘ या’ १६ शहरांचा समावेश

नागरिकांची संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी स्थानिक एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने रंगीत तालीम केल्या जाते. नागरी संरक्षण कायद्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला असे मॉक ड्रिल (स्वसंरक्षण सराव ) ७ मे रोजी आयोजित करण्याची सूचना राज्यांना केली आहे. …अधिक वाचा
13:28 (IST) 6 May 2025

एमपीएससीकडून ‘पीएसआय’ परीक्षेचा निकाल जाहीर, आतिश मोरे राज्यात प्रथम…

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती देण्यात आली. …अधिक वाचा
13:28 (IST) 6 May 2025

VIDEO: काय सांगता! डिझेल फुकटात मिळतेय? मग चला… बुलढाणा जिल्ह्यात गावकऱ्यांची झुंबड उडाली, अन् मग…

अपघातांची मालिका कायम असतानाच खामगाव परिसरात आज मंगळवारी, ६ मे रोजी सकाळी आणखी एका वाहन अपघाताची घटना घडली. मात्र हा अपघात नेहमीपेक्षा आगळावेगळा होता. …सविस्तर वाचा
13:09 (IST) 6 May 2025

Chaundi Cabinet Meeting : चौंडी येथे मंत्रिमंडळास खास कांस्य धातूच्या थाळीतून पुरणपोळी, आमरसाची मेजवानी

मंत्रिमंडळ बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत आहे. यासाठी चोंडी गावात खास व्यवस्था करण्यात आली आहे. …सविस्तर बातमी
12:51 (IST) 6 May 2025

कृषी सहाय्यक म्हणतात…. म्हणून ” मी कार्यालयीन व्हाट्सअप ग्रुपमधून बाहेर”

साहेबांच्या सूचना कार्यालयीन कामकाजासंदर्भातील आदेश, कर्मचा-यांकडून देण्यात येणारी माहिती असे सर्वसाधारण स्वरूप या व्हाट्सअप ग्रुपचे असते. याचे अॅडमीन संबधित विभागाचा अधिकारी असतो. …सविस्तर वाचा
12:28 (IST) 6 May 2025

देशभरात उद्या जनतेचा युद्धसराव, एनसीसी, एनएसएसला कुठल्या सूचना देण्यात आल्या?

देशभरातील एकूण २४४ जिल्ह्यांमध्ये हा युद्धसराव केला जाणार आहे. यामध्ये हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे. …सविस्तर वाचा
11:47 (IST) 6 May 2025

नागपुरातही होऊ शकतो युध्दसराव: राज्य शासनाच्या आदेशाची जिल्हा प्रशासला प्रतीक्षा

केद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे आदेश सोमवारी दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनालाराज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. …वाचा सविस्तर
11:32 (IST) 6 May 2025

डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाची बिहारच्या महिलेकडून गुंतवणुकीतून फसवणूक

सुरेश जयस्वाल यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ऑनलाईन माध्यमातून अनुकुमारी पांडे यांनी आपल्याशी संपर्क साधला. …वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे