2024 Mumbai Konkan Assembly Election Result highlights : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २० नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांद्वारे जाहीर झालेले अंदाज पाहून महायुती व मविआमध्ये अटीतटीची लढत होईल असं दिसत होतं. काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. तीन चाचण्यांनी अंदाज वर्तवला होता की राज्यात मविआला बहुमत मिळेल. मात्र, सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
Mumbai Konkan Assembly Election Results highlights : मुंबईसह ठाणे व कोकणातील प्रत्येक मतदारसंघाचे अपडेट्स एकाच क्लिकवर.
Assembly Election Results Live Updates: कल्याण ग्रामीण
पक्ष/उमेदवार/मते…
– शिवसेना शिंदे – राजेश मोरे : ५५७३
– शिवसेना ठाकरे – सुभाष भोईर : २७४४
– मनसे – राजू पाटील : २१७७
– नोटा – ७६
एकूण मतदान – १०७७३
Mumbai Assembly Election Results Live Updates : नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर, सना मलिकही पिछाडीवर
अणुशक्तीनगर मतदारसंघात शरद पवार गटाचे फहाद अहमद आघाडीवर असून माज मंत्री नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक पिछाडीवर आहे.
त्याचबरोबर मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात अबू आझमी आघाडीवर असून मंत्री नवाब मलिक तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे (शिंदे) सुरेश पाहिल दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
Dombivli Assembly Election Results live updates : पहिल्या फेरीचे निकाल
एकूण मते ९ हजार ७४२
-रवींद्र चव्हाण ५९२२
-दीपेश म्हात्रे ३१२२
-नोटा १४४
Mumbra-Kalwa Assembly election result updates: मुंब्रा- कळवा विधानसभा क्षेत्रात -जितेंद्र आव्हाड – ८२६२
-नजीब मुल्ला – ४७२६
-नोटा -२६६
Thane City Assembly Constituency Electio
-संजय केळकर (भाजप) ४३३६
-अविनाश जाधव (मनसे) २२४३
-राजन विचारे (ठाकरे गट) १९१७
Ambernath Assembly Constituency Election Results: शिवसेनेचे बालाजी किणीकर १७४८ मतांनी आघाडीवर
बालाजी किणीकर -शिवसेना -४२१९
राजेश वानखेडे -२४१७
माहीम मतदारसंघ (पहिली फेरी)
माहीम मतदारसंघ (पहिली फेरी )
अमित ठाकरे (मनसे ):2156
महेश सावंत (ठाकरे गट ):2270
सदा सरवणकर (शिंदे गट ):2142
वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर
वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर
कोळंबकर :6581
श्रद्धा जाधव : 925
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. महाराष्ट्रात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसत्ता.कॉमवर तुम्ही सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स पाहू शकणार आहेत. निकालांकडे ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मंगलप्रभात लोढा ३ हजार मतांनी आघाडीवर
बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे आघाडीवर
डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत.
Dombivli Assembly Constituency : महायुतीचे रवींद्र चव्हाण पहिल्या फेरीत पाच ५००० मतांपैकी २८०० मतांनी आघाडीवर…
Mumbai Konkan Region Election Results 2024 Live : ठाणे-कोकणाने उद्धव ठाकरेंसह मविआची चिंता वाढवली, अद्याप एकाही जागेवर आघाडी नाही
अनेक मतदारसंघांमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. सुरुवातीच्या एक तासात आलेल्या कलांनुसार ठाणे कोकणातील १४ जागांवर महायुतीला आघाडी मिळाली आहे. मविआला मात्र अद्याप एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. एका जागेवर मनसेला आघाडी मिळाली आहे.
Election Results Live Updates 2024:
-शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे -५३११
-ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटळ- २८५१
-शांताराम मोरे २८३१ मतांनी आघाडीवर
Kalidas Kolambkar- वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर
वडाळ्यात भाजपचे कालिदास कोळंबकर आघाडीवर
++
Sunil Raut- विक्रोळी पोस्टल मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत आघाडीवर
विक्रोळी पोस्टल मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील राऊत आघाडीवर
Thane Assembly Election Results Live Updates :ठाणे शहर विधानसभा मतदार संघात १४५५ पोस्टल मते असून त्याची मोजणी सहा टेबलवर सुरू होणार आहे. भाजपचे संजय केळकर, ठाकरे गटाचे राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्यात लढत.एकूण १४ टेबल २७ फेरी अशी मतमोजणी होणार असून पहिल्या फेरीला सुरुवात होत आहे
घाटकोपर पश्चिममध्ये मत मोजणी केंद्रावर वीजपुरवठा खंडित
घाटकोपर पश्चिममध्ये मत मोजणी केंद्रावर वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.
Assembly Election Results Live Updates : कोपरी -पाचपाखाडी विधानसभा मतदार संघाची पोस्टल बॅलेट मतमोजणी ८:30 वाजता सुरु झाली आहे. एकूण ७८३ पोस्टल बॅलेट आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (महायुती) विरुद्ध दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे तसेच काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे अशी लढत आहे.
शिवसेना (ठाकरे) उमेदवार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघात आघाडीवर आहेत.
Assembly Election Results Live Updates :पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत चंद्रकांत पाटील सात हजाराहून अधिक मतांनी आघाडीवर. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सेने चे चंद्रकांत मोकाटे आणि मनसे चे किशोर शिंदे
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : मुंबईत महायुती आघाडीवर
महायुती – १२
महाविकास आघाडी – ५
मनसे – १
Parag SHah – घाटकोपर पूर्वमधून भाजपा उमेदवार पराग शाह आघाडीवर
घाटकोपर पूर्व – पराग शाह आघाडीवर
Amit Thackeray : माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर
माहीममध्ये मनसेचे उमेदवार अमित ठाकरे आघाडीवर असून विद्यमान आमदार सदा सरवणकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
Mumbai Konkan Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates : मुंबई, ठाणे, कोकणात महायुती चार जागांवर आघाडीवर, मनसेचा एक उमेदवार पुढे
मुंबईतील दोन जागांवर महायुती आघाडीवर आहेत. मविआला अजून एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. ठाणे, कोकणात महायुती दोन जागांवर आघाडीवर, तसेच एका जागेवर मनसेचे उमेदवार पुढे आहेत. मविआला अजून एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : बहुमत की अपक्ष, लहान पक्षांचा टेकू? सत्ता कोण स्थापन करणार?
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सत्तेसाठीच्या दोन तगड्या दावेदारांना शनिवारच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी काही आमदारांची गरज भासली तर अपक्ष, बंडखोर व लहान पक्षांच्या आमदारांना मोठा भाव येईल. या आमदारांना आपल्या तंबूत आणण्यासाठी जोरदार हालचाली केल्या जातील, हे स्पष्ट आहे. काही मोठ्या पक्षांनी अशा चर्चेला सुरुवात देखील केली आहे.
Mumbai Konkan Assembly Election Results Live Updates : शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका : मविआ नेत्यांच्या सूचना
लोकसभा निवडणुकीवेळी मतमोजणी केंद्रांवर झालेला गोंधळ लक्षात घेता विधानसभा निवडणुकीत अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी पावले उचलली आहेत. मतमोजणी केंद्रावर शेवटचे मत मोजून पूर्ण होईपर्यंत व अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत मतदान केंद्र सोडू नका, अशा स्पष्ट सूचना मविआतील तीनही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
Baramati Assembly Election Result 2024 Live Updates: बारामतीचा कारभारी कोण? काका गड राखणार की पुतण्या बाजी मारणार?
बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरविण्यात आले आहे. बारामती हा गेले कित्येक वर्ष पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. मात्र २०२२ साली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. आता विधानसभा निकालानंतर ‘केंद्रात ताई, राज्यात दादा’ हेच सूत्र बारामतीकर कायम ठेवतात का? हे पाहावे लागेल.