Maharashtra Political News Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पात्र की अपात्र, यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी चालू आहे. त्याचा निकाल प्रलंबित असतानाच निवडणूक आयोगाने पक्ष व चिन्ह कुणाचं यावर निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय आयोगानं जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलं आहे.

Live Updates

Maharashtra News Today 07 February 2024: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाचा निकाल, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात!

12:35 (IST) 7 Feb 2024
सोयाबीनची उत्पादकता अधिक, नाफेडकडून खरेदी मात्र मर्यादित; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात पिकांची परिस्थिती चांगली नाही. अवकाळी, अतिवृष्टी व पावसाच्या खंडाचा पिकांवर दुष्परिणाम झाला. या संकटाला तोंड देत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतले.

सविस्तर वाचा…

12:26 (IST) 7 Feb 2024
नागपूर : दोन कोटींच्या गांजासह तस्कराला अटक

ओडिशा आणि आंध्र प्रदेशात गांजाची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. याच राज्यांतून देशभरात गांजाचा पुरवठा केला जातो.

सविस्तर वाचा…

12:17 (IST) 7 Feb 2024
विस्तारित तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांसाठी ४८३ कोटी

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीचा विस्तार चिंध्रण, म्हाळुंगी आणि कानपोली या गावांच्या जमिनींवर केला जाणार असून मागील दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने या नव्या औद्योगिक वसाहतीसाठी भूसंपादन केले. त्यानंतर या औद्योगिक वसाहतीचे काम कधी सुरू होणार याकडे उद्योजकांचे लक्ष लागले होते. जानेवारीत याबाबतची निविदा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) प्रसिद्ध केली होती.

वाचा सविस्तर…

12:16 (IST) 7 Feb 2024
ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते पुरुषोत्तम खरे यांचे निधन

पनवेल : पनवेल शहरामधील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते पुरूषोत्तम नारायण खरे यांचे शनिवारी (ता.३ फेब्रुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. खरे यांचे वय ८४ वर्षे होते. १९६० च्या दशकात सुरू केलेला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय पुढील चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सचोटीने केला. त्यांच्या स्वतःच्या वर्तमानपत्राच्या दुकानात “self service” चा अनोखा प्रयोग त्यांनी १९७० च्या दशकात राबवला होता. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक आणि खाजगी संस्थांच्या पदावर काम केले.

पनवेलमधील एका प्रतिष्ठीत देवस्थानचे विश्वस्तपद , पनवेल को ऑप अर्बन बँकेचे संचालकपद , पनवेल तालुका वृत्तपत्र संघटना , कोकण वृत्तपत्र विक्रेता संघटना, पनवेल नगरपालिका शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य अशा माध्यमातून ते सामाजिक कार्याशी जोडले गेले होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

12:12 (IST) 7 Feb 2024
पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणातील सहा रेकॉर्डिंग क्लिप पोलिसांच्या हाती…’हा’ गुंड झाला गजाआड

पुणे : गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींच्या मोबाइलमध्ये १९ हजार ८२७ ध्वनिमुद्रित फिती (रेकॉर्डिंग) आढळून आल्या आहेत. त्यांपैकी १० हजार ध्वनिमुद्रित फितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यांपैकी सहा ध्वनिमुद्रित फिती मोहोळ खून प्रकरणाशी संबंधित आहेत.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 7 Feb 2024
पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य भैयाजी जोशी म्हणाले, ‘आता काशी, मथुरेतही…’

पिंपरी : देश बदलतोय, त्याची अनुभूती येत आहे. जय श्रीरामचा नारा दिला जातोय. श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम राहावी. आता काशी, मथुरेतही…

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 7 Feb 2024
नागपूर : पगार रखडल्याने पोलीस कर्मचारी उसनवारीवर

सध्या दहावी-बारावीच्या मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या असून मुलांना शैक्षणिक खर्च जास्त असतो. मात्र, पोलीस कर्मचारी सध्या हतबल असून एकमेकांना मदत करीत वेळ निभावून नेत आहेत.

सविस्तर वाचा…

11:47 (IST) 7 Feb 2024
नागपुरात विधवा महिलेवर टॅक्सी चालकाचा बलात्कार

सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 7 Feb 2024
नांदेड : महाप्रसादातून दोन हजार जणांना विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणांना सतर्क केले.

सविस्तर वाचा…

11:33 (IST) 7 Feb 2024
धावत्या उरण-नेरुळ लोकलमध्ये महिलेची प्रसूती

उरण : मंगळवारी सकाळी ७.५० च्या उरण – नेरुळ लोकलने प्रवास करणाऱ्या उरणमधील एका महिलेची चालत्या लोकल मध्येच प्रसूती झाली आहे. यात या महिलेला मुलगी झाली आहे. यावेळी जनरल बोगीतील महिला आणि मुलींनी मदतीचा हात पुढे करीत प्रसूत झालेल्या महिलेला मदत केली.

वाचा सविस्तर…

11:33 (IST) 7 Feb 2024
केंद्रप्रमुखांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त…. शाळा तपासणी कशी ठरणार ‘असर’दार?

पुणे : असरच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात राज्याची कामगिरी खालावल्याचा ‘असर’ शिक्षण विभागावर झाला. त्यामुळे राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी केंद्रप्रमुखांवर देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

11:31 (IST) 7 Feb 2024
पवना नदीवरील समांतर पुलाचे काम संथगतीने; महापालिकेने ठेकेदाराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

पिंपरी : पिंपरी व पिंपळे सौदागर या गावांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पुलाच्या कामाची मुदत संपून वर्ष उलटल्यानंतरही काम अपूर्णच आहे. महापालिकेने ठेकेदाराबाबत घेतला ‘हा’ निर्णय

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 7 Feb 2024
खळबळजनक! दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण सुरक्षा पथकाला पाचारण करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 7 Feb 2024
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून करीरोड येथील ७२ वर्षांच्या वृद्धासह त्यांच्या नातेवाईकांची ९० लाखांना फसवणूक करण्यात आल्याची तक्रार माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या दोन भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

10:55 (IST) 7 Feb 2024
अमरावती : स्‍पर्धा परीक्षेतील अपयश; महिलेची आत्‍महत्‍या

स्‍पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असल्‍याने नैराश्‍यातून ३० वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

10:49 (IST) 7 Feb 2024
वसई : बनायला गेला पोलीस, पण बनला चोर

दुचाकीवरून जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरण्यात आले होते. विशेष म्हणजे दुचाकीवरून आलेल्या इसमानेच धावत्या दुचाकीवरून ही चोरी केली होती.

सविस्तर वाचा…

10:48 (IST) 7 Feb 2024
Maharashtra News Live: ३ वाजेपर्यंत शरद पवार गटाकडून पक्षनाव सुचवलं जाणार

अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव सुचवण्याची एक संधी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आज दुपारपर्यंत शरद पवार गटाकडून पक्षासाठी तीन नावं निवडणूक आयोगाला सुचवली जाणार आहेत.

10:17 (IST) 7 Feb 2024
Maharashtra Political News Live Update: काका – पुतण्यांमधला ओलावा – मनसेनं शेअर केला राज ठाकरेंचा व्हिडीओ

राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा काय घडलं होतं? बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? मनसेनं राज ठाकरेंचाच जुना व्हिडीओ केला शेअर!

10:15 (IST) 7 Feb 2024
Maharashtra Political News Live Update: जखमी वाघ अधिक धोकादायक असतो…! – रोहित पवारांनी शेअर केला ‘तो’ फोटो!

जखमी वाघ अधिक धोकादायक असतो…! – रोहित पवार

10:09 (IST) 7 Feb 2024
Maharashtra News Live: रोहित पवारांनी राष्ट्रवादीची तुलना केली महाभारताशी!

महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे. कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला… भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहीजे? तेंव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला. नंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला… कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते…. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय.. ‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे आदरणीय पवार साहेब हे आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार! – रोहित पवार

10:07 (IST) 7 Feb 2024
Maharashtra Political News Live Update: “…तर हा मलाही सांगेल, ए गप्प बस”! मनसेनं शेअर केला राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ.

६ मे २०२३ च्या रत्नागिरीच्या सभेत राजसाहेब जे श्री. अजित पवारांबद्दल म्हणाले ते आज खरं ठरलं… असो. पण कुणाचं काहीही न हडपता, बुजुर्ग नेत्यांचा अवमान न करता शून्यातून स्वतःचं राजकीय अस्तित्व ‘नवनिर्माण’ करणाऱ्या राजसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय ह्याचा आम्हाला सार्थ अभिमान ! – मनसे

10:05 (IST) 7 Feb 2024
Maharashtra Political News Live Update: काल सरकारचे बाळराजे कुठे होते? – संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सूचक सवाल

पुण्याचे नवे पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे गुंडांची परेड घेऊन इशारा दिला.राजकारण्यांच्या आसपास फिरकायचे नाही वैगरे..छान! काही गुंड टोळ्या आणि त्यांचे प्रमुख मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत थेट मींधे गँग मध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांची परेड काढणार काय? हातात भगवा घेतलेले हे महात्मा कोण आहेत? हा पुण्यातला गुन्हेगार आहे .. याच्यावर खुन ,खुनाचा प्रयत्न, चोरी, अपहरण असे गुन्हे आहेत व मोका मधुन नुकताच बाहेर आला आहे महाराष्ट्रात गुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! (काल सरकारचे बाळराजे कोठे होते?त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते..या राज्याचे कठीण आहे) – संजय राऊत</p>

10:00 (IST) 7 Feb 2024
Maharashtra News Live: मनसेचं अजित पवारांना उद्देशून खोचक ट्वीट!

‘भुजां’मध्ये कितीही ‘बळ’ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे ‘तट’ फोडून सत्तेसाठी घातलेला हा ‘वळसा’ महाराष्ट्राला ‘पटेल’ का? वाह रे पट्ठ्या…!” – मनसेचं अजित पवारांना उद्देशून खोचक ट्वीट!

अजित पवारांनी शरद पवारांना अनेकदा अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिला आहे.

Maharashtra News Today 07 February 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!