नागपूर : दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेवर एका टॅक्सीचालकाने बलात्कार केला. तिला जाळ्यात ओढून दोन वर्षे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी पीडित ३५ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली. सचिन महादेव येवले (३७) रा. यशोधरानगर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सचिन विविध संस्थांमध्ये त्याचे वाहन भाड्याने लावतो. सहा वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. महिला खासगी संस्थेत काम करून स्वत:चा आणि दोन मुलांचा उदरनिर्वाह करते.

हेही वाचा : खळबळजनक! दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या

Rape of a woman, lure of marriage, Pune, fraud,
पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?
woman in the womens movement and Gender inequality
स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ : अभूतपूर्व‘स्त्री’
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
woman doctor riding bike dies in truck collision accident on katraj handewadi road
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू ; कात्रज- हांडेवाडी रस्त्यावर अपघात
Mother murder daughter Nagpur, Nagpur,
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सख्ख्या मुलीचा आईनेच केला खून, मृतदेहाची विल्हेवाट…
Virar police arrested bogus mantrik who raped woman
उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, भोंदू मांत्रिकाला अटक

जुलै २०२१ मध्ये महिलेची फेसबूकवर सचिनशी ओळख झाली. सचिनने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. महिलेशी लग्न आणि तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान विविध हॉटेलमध्ये नेऊन महिलेचे लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी महिलेने लग्नासाठी दबाव टाकला असता तो शिवीगाळ करून धमकावू लागला आणि लग्न करण्यास त्याने स्पष्ट नकार दिला. महिलेने पेालिसांत तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून सचिनला अटक केली.

Story img Loader