Marathi News Updates : चेंबूरमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून एकीकडे सर्वसामान्यांच्या सुरक्षेवर प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अजित पवारांकडील अर्थखात्याकडून कधीकधी निधी येत नसल्याचा उल्लेख केल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत अजित पवारांबाबत नाराजी असल्याचं समोर येऊ लागलं आहे. यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आल्याचं दिसत आहे.
Mumbai-Maharashtra News Live Today, 10 April 2025 : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
Ujjwal Nikam on Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या कोर्टातील सुनावणीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ एप्रिल रोजी होणार आहे. सीआयडीकडून त्यांचं म्हणणं २४ तारखेला न्यायालयासमोर मांडलं जाईल. त्यावर सुनावणी होईल. आधी वाल्मिककडून युक्तिवाद होईल. त्यानंतर आम्ही सरकारची बाजू मांडू. आम्ही सरकारतर्फे जी कागदपत्रं सादर केली, त्यात संतोष देशमुखला मारहाण केल्याचा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ आरोपींनी काढला होता असा दावा करण्यात आला होता. व्हिडीओला बाहेर प्रसिद्धी मिळू नये, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं आहे. वाल्मिकची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणीही आम्ही न्यायालयात केली आहे – उज्ज्वल निकम, सरकारी वकील
मी अमेरिका सरकारचे आभार मानतो की एवढ्या मोठ्या मास्टरमाईंडला ते भारताकडे सोपवत आहेत. पण तहव्वूर राणाला अजमल कसाबप्रमाणे अंडासेल, बिर्याणी अशा सुविधा द्यायची गरज नाही. अशा दहशतवाद्यांसाठी वेगळी व्यवस्था असायला हवी. दोन ते तीन महिन्यांत फाशी किंवा भररस्त्यावर गोळ्या घातल्या पाहिजेत. त्यांना इथे आणून बिर्याणी खाऊ घालणं, कोट्यवधी खर्च करणं हे पूर्णपणे वाया घालवणं आहे. राणा येतोय म्हणजे उपकार करत नाहीये. त्याला भररस्त्यात गोळ्या घातल्या तर पाकिस्तानमध्ये ही दहशत निर्माण होईल – २६/११ दहशतवादी हल्ल्यावेळी लोकांना सतर्क करणाऱ्या मुंबईतील छोटू चायवाल्याची प्रतिक्रिया
#WATCH | Mumbai: On 26/11 Mumbai attacks accused Tahawwur Rana's extradition to India, Mohammed Taufiq, a tea seller known as 'Chhotu Chai Wala' whose alertness helped a large number of people escape the attack, says, "…For India, there is no need to provide him with a cell.… pic.twitter.com/zLqHEt7sHs
— ANI (@ANI) April 9, 2025
वाडा तालुक्यातील जंगलात वाढत्या वणव्यांनी नैसर्गिक वनसंपत्ती नष्ट होण्याच्या मार्गावर
उन्हाळ्यात वाढत्या “वणव्यांमुळे अनेक परिसरातील जंगले बेचिराख होण्याच्या घटनांमद्ये वाढ झाली आहे. हे वणवे निसर्ग व मानवनिर्मित दोन्ही प्रकारचे असुन ते वेळीतच रोखुन वन संपत्तीचे जतन करण्याच्या दृष्टीने वनविभागाने डोंगर परिसरातील स्थानिक नागरीकांच्या पुढाकाराने जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
‘तो’ एक व्हिडियो आणि ११ तासांचे थरराक अपहरनाट्य…
नालोसापाऱ्यात राहणाऱ्या रोहन तिवारी या २२ वर्षांच्या तरुणाच्या कुटुंबियांना रात्री एक व्हिडिओ पाठविण्यात आला. रोहन चे अपहरण करण्यात आले होते आणि त्याला मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले होते. रोहनच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी ३ लाखांची खंडणी मागितली होती. सविस्तर वाचा…
पालिकेने सुशोभित केलेल्या चौकांचे सौंदर्य मावळले; विविध ठिकाणच्या चौकांची दुरावस्था
वसई विरार शहरात सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पालिकेने विविध ठिकाणचे चौक सुशोभित करून त्याठिकाणी शिल्प, कारंजे, रोषणाई अशी साधने बसवून शहराचे सौंदर्य खुलवले होते. परंतु त्या चौकांची योग्य रित्या देखभाल होत नसल्याने बिकट अवस्था झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. सविस्तर वाचा…
प्रलंबित ऊस देयकावरून स्वाभिमानी संघटना आक्रमक; संबंधित कारखान्यांवर कारवाईची मागणी
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले. अद्याप अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाचे देयक अद्याप दिले नाही. या हंगामात सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ‘शुगरकेन कंट्रोल’ कायद्याचा भंग केला आहे. सविस्तर वाचा…
मोरा-मुंबई रोरो सेवेला आता डिसेंबर २०२५ चा मुहूर्त; महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा नवा दावा
मोरा बंदर ते मुंबई च्या भाऊचा धक्का दरम्यानच्या ७५ कोटी खर्चाच्या मोरा रोरो सेवेचे काम काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले होते. मात्र हे काम पुन्हा एकदा वेगाने सुरू करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
रद्द केलेल्या भूखंडांचा सिडकोकडून महिन्याभरात लिलाव
वर्षानुवर्षे भूखंडाचा ताबा राखूनही त्याचा नियोजित वापर टाळणाऱ्या १८ मोठ्या भूखंडांचा ताबा सिडकोने गेल्या आठवड्यात रद्द केला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारांच्या लगत असलेले काही मोठे भूखंडही सिडकोने रद्द केले. सविस्तर वाचा…
Water Tanker Service Stopped : मुंबईतील टँकर सेवा आजपासून बंद
मुंबईत आजपासून टँकर सेवा बंद करण्यात आल्या असून टँकर असोसिएशनने पाणीपुरवठा बंद केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा निर्णय झाल्यामुळे पुढच्या दोन महिन्यांत मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
Chembur Firing Marathi Updates : चेंबूरमधील गोळीबार…व्यवसायिकाची प्रकृती स्थिर
नवी मुंबई येथील एका व्यवसायीकावर बुधवारी रात्री चेंबूर परिसरात गोळीबार करण्यात आला होता. जखमी व्यवसायिकावर चेंबूर परिसरातील झेन रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी रात्री उशीरा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
Beed Murder Case Hearing : बीड हत्या प्रकरणाची आज सुनावणी
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल झाले आहेत.
मुंबईत सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत की नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या. त्यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातली एक गोळी त्यांच्या दातात अडकली आहे. नेते सुरक्षित नाहीत, अभिनेते सुरक्षित नाहीत. सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही. मग महाराष्ट्रात सुरक्षित कोण आहे? ज्या मुंबई पोलिसांना स्कॉटलंडच्या बरोबरीने आम्ही बघत होतो. पण दुर्दैवाने आज आम्हाला धक्का बसतोय. मुंबई पोलिसांबाबत दरारा वाटायचा . पण अशा घटनांमुळे आपण उत्तर प्रदेश किंवा बिहारच्या दिशेने चाललोय की काय असं मला म्हणावं लागतंय – वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस पक्ष
Varsha Gaikwad on Chembur Firing: “मुख्यमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल”
सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. ज्या प्रकारे मुंबईत रस्त्यावर गोळीबार व्हायला लागलाय. मी सातत्याने सांगते. मुंबईत तीन घटना घडल्या होत्या. भायखळ्यात रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला. आता चेंबूरमध्ये गोळीबार झाला. या सगळ्या घटना पुन्हा एकदा एक बाब स्पष्ट करतात की मुंबई व महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गुन्हेगार सर्रासपणे येऊन गोळ्या झाडत आहेत. सर्वसामान्यांमध्ये असंतोष व घबराटीचं वातावरण आहे. या प्रश्नाचं गृहमंत्र्यांना-मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल – वर्षा गायकवाड, खासदार, काँग्रेस पक्ष
देवेंद्र फडणवीसांनी मोदींच्या वारसदाराबाबत मांडली भूमिका (फोटो – पीटीआय संग्रहीत)
Mumbai-Maharashtra News Live Today, 10 April 2025 : महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींचा आढावा…