Marathi News Update: एकीकडे निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर त्यावरून राष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र चालू आहे. दोन्ही आघाड्यांकडून अद्याप अंतिम जागावाटप जाहीर करण्यात आलेलं नसून टप्प्याटप्प्याने उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाचं अंतिम चित्र समोर येण्यासाठी मतदार व राज्याच्या नागरिकांची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.
Maharashtra News Today 15 March 2024: मविआ व महायुतीच्या जागावाटपाचे सर्व अपडेट एका क्लिकवर!
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे.
पिंपरी : महापालिकेचा कारभार आता कागदविरहित (पेपरलेस) होणार असून, प्रशासनाने त्या दिशेने पाऊल टाकले आहे. ‘जीएसआय सक्षम ईआरपी’ प्रणालीचे अनावरण आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भाजपने सहाव्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर करणे अपेक्षितच होते. यंदा त्यांना निवडणूक सोपी जाणार की मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका बसणार याची आता चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या दोन दशकांतील नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्यानंतरचे ठळक नाव म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर.
निवडणुकीत विखे विरोधक लंके यांच्या पाठीमागे एकवटले जाण्याची शक्यता आहे. ही लढत केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसेल तर ती विखे विरुद्ध पवार अशीच रंगण्याची जास्त शक्यता आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णालयांची गुणवत्ता आणि दर्जा उंचाविण्याकरता राज्य शासनाने ‘कायाकल्प’ उपक्रम राबविला.
पुणे : प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मुख्य प्राप्तिकर आयुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. हे कर्मचारी आज (ता.१५) दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत.
महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अखेर ते कुठल्या चिन्हावर आणि कुठल्या पक्षातून लढणार याबाबत स्पष्ट विधान केलं आहे.
तुम्ही ठाण्याच्याच आहात का? बरं ‘स्टॉप’ सांगा आणि आधारकार्ड हाताशी ठेवा लवकर…’टीएमटी’ बसमधील तुडुंब गर्दीत वाहकाच्या या सूचनांनी महिला प्रवासी काहीकाळ बुचकळ्यात पडल्या.
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. अजय तावरे यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. आता ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याची बाब समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलच्या जमिनीला सोन्याचा दर आला आहे. त्यामुळेच या जमिनींच्या सरकारी दस्ताबाबत कोणतीही नोंद करण्यासाठी पनवेलच्या तहसिल कचेरीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर ठरवलेले आहेत.
नागपूर : सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची प्रतिनिधी सभा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गुरूवारी रात्री नागपूरला येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला.
पुणे : मार्केट यार्ड- गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ एका गॅरेजमध्ये पहाटे आग लागली. आगीत १७ दुचाकी जळाल्या. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
पुणे : पुण्यात पकडलेल्या ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांना मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगात त्यांनी बाँम्बस्फोटाची चाचणी केली होती.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी ही जागा आपल्यालाच मिळणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी संगितल्याचा दावा केला असताना दुसरीकडे ही जागा महायुतीची आहे हे सांगताना भाजपा नेते धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री मंडलिकांची समजूत काढतील, कोल्हापुरात बंडखोरी होणार नाही, असं सूचक विधान केलं आहे.
प्रणिती शिंदेंना मराठा आंदोलनांकांनी सोलापूरच्या पेनूरमध्ये रोखलं. चरणराज चवरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर्स लावले होते. यावेळी प्रणिती शिंदेंनी आंदोलकांना बॅनर्स काढायला लावले.
कुणीही कुणालाही पाडत नाही. हे पाडापाडीचं भूत कुणाच्या मानगुटीवर का बसतंय मला माहिती नाही. मविआमध्ये कुणीही कुणालाही पाडणार नाही. आम्हाला भाजपाला पाडायचं आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. आजची बैठक महाविकास आघाडी म्हणून होत नाहीये. काँग्रेस व राष्ट्रवादीत आणि शिवसेना व काँग्रेसमध्ये एखाद-दुसऱ्या जागेवर काही चर्चा बाकी आहे. त्या होत आहेत – संजय राऊत</p>
वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी आम्हाला जी २७ जागांची यादी दिली होती, त्यातल्या चार जागा आहेत. त्यावर आता वंचितच्या नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आता त्यांनी आम्हाला त्यांची भूमिका कळवायची आहे. यात बोलवण्या किंवा न बोलवण्याचा किंवा मानसन्मानाचा प्रश्नच नाही. आम्ही कुणालाही निमंत्रण देऊन बोलवत नाही. मविआ एक कुटुंब आहे. प्रत्येकजण कधीही आमच्या त्या बैठकीत सहभागी होऊ शकतं. समाजमाध्यमातून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा कधीच केली जात नाही – संजय राऊत</p>
महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह