पनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलच्या जमिनीला सोन्याचा दर आला आहे. त्यामुळेच या जमिनींच्या सरकारी दस्ताबाबत कोणतीही नोंद करण्यासाठी पनवेलच्या तहसिल कचेरीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दर ठरवलेले आहेत. पनवेल तालुक्यातील गिरवले गावातील एक ३४ वर्षीय तरुण शेतकरी मागील सव्वादोन महिन्यांपासून वेळोवेळी कचेरीतील वरिष्ठांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हेलपाटे मारुनही त्याचे काम होत नसल्याने अखेर या पिडीत शेतकऱ्याने पोलीसांकडे धाव घेऊन हा सर्व काळाबाजार उघडकीस आणला.

जानेवारी महिन्यात गिरवले येथील शेतकऱ्याने त्यांचे सातबारावरील भोगवटादार २ चा १ करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचे काम केले जात नव्हते. अखेर संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार पीडित शेतकऱ्याने नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलीसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात पुरावा निश्चित होण्यासाठी पंचांसहीत व फोन व इतर रेकॉर्डींग सूरु ठेवली. पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ४ मार्चला गोरे याने एक एकर जागेच्या भोगवटदारा वर्ग २ चा एक करण्यासाठी अगोदर ९० हजार रुपयांची मागणी केल्याचा पुरावा पोलीसांच्या हाती लागला. त्यानंतर पीडित शेतकऱ्याने गोरे याच्यासोबत तडजोड केल्यानंतर ८० हजार प्रति एकरी दिल्यानंतर काम करतो असे ठरले. अखेर गुरुवारी दुपारी पनवेल तहसिल कचेरीमध्ये पीडित शेतकऱ्याच्या जमिनीचे क्षेत्र ३४ गुंठे असल्याने ८० हजारांचे निम्मे म्हणजे ४० हजार रुपये घेण्याचे ठरले.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
demolition of seven bungalows became controversial
विश्लेषण : सात बंगल्यातील पाडकाम वादग्रस्त का ठरले? मजबूत वास्तू धोकादायक घोषित करण्यामागे पालिका-विकासकांचे साटेलोटे?
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

हेही वाचा : पनवेल रेल्वेस्थानकातील चेंगराचेंगरी टाळता येईल का ?

लाचेची रक्कम घेण्याचे ठरल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी साध्या वेशात तहसिलदार कचेरीत गेले. त्यांनी महसूल सहाय्यक या पदावर काम करणाऱ्या किरण अर्जुन गोरे याला शेतकऱ्याकडून लाच मागितल्याची पुन्हा एकदा पडताळणी केली. पडताळणीमध्ये गोरे व त्याचे सहकारी लाचेवर ठाम असल्याचे समजल्यावर पीडित शेतकऱ्याने ही रक्कम एका तासात आणून देतो असे सांगितले. त्यादरम्यान पोलीसांचे पथक साध्या वेशात कचेरीत वावरत होते. गोरे याने सायंकाळी पावणेसहा वाजता जशी लाच स्वीकारली तसे लगेच गोरे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. गोरे यांच्यासोबत या लाचेच्या रकमेतील त्याचे हिस्सेदार तहसिल कचेरीतील कोणी वरिष्ठ अधिकारी सामील आहे का? याची चौकशी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. गोरे याची संपत्ती किती आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.