पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. अजय तावरे यांची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली. आता ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्या शिफारशीनुसार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटमध्ये याच डॉ. तावरे यांना अधीक्षक पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्यात आली होती.

डॉ. तावरे यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करावी, असे शिफारसपत्र आमदार टिंगरे यांनी मुश्रीफांना गेल्या वर्षी २६ डिसेंबरला पाठविले होते. या पत्रात म्हटले होते की, डॉ. अजय तावरे हे माझ्या परिचयाचे आहेत. ते प्राध्यापक व न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी करोना संकटाच्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडले होते. तरी त्यांची ससूनच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्याबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करावी.

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी

हेही वाचा…‘आयसिस’च्या दहशतवाद्यांचा पुणे, मुंबईसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँम्बस्फोटाचा कट उघड

यावर मंत्री मुश्रीफ यांनी शेरा मारून ते पत्र ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना पाठविले होते. नियमानुसार वैद्यकीय अधीक्षक हा प्राध्यापक असण्याची आवश्यकता आहे, असे समजते. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकष पूर्ण करीत नाहीत. त्यामुळे विनंतीप्रमाणे कार्यभार देण्यात यावा, असा शेरा मुश्रीफांनी मारला होता. त्यानंतर लगेचच डॉ. तावरे यांची तीन दिवसांत २९ डिसेंबर २०२३ रोजी वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेटप्रकरणी डॉ. तावरे यांची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यावेळी त्यांना अधीक्षकपदावरून हटविण्यात आले होते. आमदारांच्या शिफारसपत्रामुळे मात्र पुन्हा त्यांचीच नियुक्ती करण्यात आली.

विशेष म्हणजे, ससून सर्वोपचार रुग्णालयात मागील काही काळापासून वैद्यकीय अधीक्षकपदाची ‘संगीत खुर्ची’ सुरू आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तत्कालीन अधीक्षक डॉ. किरणकुमार जाधव यांना हटवून त्यांच्या जागी डॉ. अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला होता. वैद्यकीय अधीक्षक हा रुग्णालयाचे प्रशासन सांभाळणारा महत्त्वाचा अधिकारी असल्याने त्या पदावरच शिफारशीने नियुक्ती केली जात असल्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा…ठरलं! श्रीरंग बारणे मावळमधून भाजप नव्हे तर शिवसेनेकडूनच लढणार; म्हणाले, “मी आतापर्यंत शिवसेनेकडूनच…”

मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येतात. याचप्रकारे संबंधित माझ्याकडे ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून आले होते. त्यांच्या विनंतीनुसार मी हे पत्र दिले. प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असे मी लिहितो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होते. – सुनील टिंगरे, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. अधीक्षक नियुक्तीचे अधिकार अधिष्ठात्यांना असले तरी सरकारकडून आलेल्या आदेशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक असते. – डॉ. विनायक काळे, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय