नगर : अखेर गेल्या काही दिवसांपासून इन्कार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार निलेश लंके यांनी आज, गुरुवारी सायंकाळी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये, शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांची नगर दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. तसे झाल्यास भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शरद पवार गटाचे आमदार लंके यांच्यामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत विखे विरोधक लंके यांच्या पाठीमागे एकवटले जाण्याची शक्यता आहे. ही लढत केवळ विखे विरुद्ध लंके अशी नसेल तर ती विखे विरुद्ध पवार अशीच रंगण्याची जास्त शक्यता आहे. नगर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसताना एकाचवेळी अजित पवार यांना धक्का देत परंपरागत विरोधक विखे यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करण्याच्या व्यूहरचनेत शरद पवार यांची खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.

आमदार लंके यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक उड्या मारल्या. त्यातील ही सर्वात महत्त्वपूर्ण ठरत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून त्यांनी सुरुवात केली. पारनेर तालुकाध्यक्ष असताना तत्कालीन पारनेरचे आमदार विजय औटी यांच्याशी त्यांचे बिनसले. औटी यांनी दिलेल्या काटशाहने लंके यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. औटी यांच्या विरोधातच पारनेर-नगर मतदारसंघातून ते विजयी झाले. एकाचवेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार या तिन्ही नेत्यांशी त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर प्रथम ते शरद पवार गटात सहभागी झाले. नंतर काही दिवसातच अजितदादा गटात सहभागी झाले. त्यापूर्वी शिंदे- फडणवीस सरकारच्या बहुमताच्या चाचणीवेळी आमदार लंके यांची अनुपस्थिती धक्कादायक ठरली होती. त्याचवेळी त्यांची वाटचाल राजकीय कोलांटउड्या मारणारी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
BJP worker shiv shankar das
‘भाजपा जिंकू दे, तुला घरातून उचलून आणेन’, कार्यकर्त्याची महिलेला धमकी; पोलिसांनी केली अटक
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

हेही वाचा : Electoral Bond Data : निवडणूक रोख्यांसाठी भाजपानंतर ‘या’ पक्षाला देशात सर्वाधिक पसंती!

नगर-पारनेर मतदारसंघातील वर्चस्वावरून आमदार लंके व भाजप खासदार विखे यांच्यामध्ये राजकीय वैमनष्याची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांच्यामध्ये पारनेरमधील विकासकामांच्या श्रेयवादावरून खडाजंगी रंगली. त्यानंतर आमदार लंके यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघ सोडून नगर लोकसभा मतदारसंघातील प्रश्नात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी खासदार विखे यांना लक्ष करण्यास सुरुवात केली. परिणामी आमदार लंके जरी महायुतीत असले तरी विरोधी महाविकास आघाडीच्या नगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा त्यांना पाठिंबा मिळू लागला.

महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्या कार्यपद्धतीवरून जिल्हा भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. भाजपमधील जुने निष्ठावान पदाधिकारी विखे पिता-पुत्रांपासून अंतर राखून आहेत. गेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विखे पिता-पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढेल असा दावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पक्षश्रेष्ठी करत होते. मात्र घडले उलटेच. पक्षाच्या पाच पराभूत आमदारांनी विखे यांच्या विरोधात तक्रारी केल्या व त्यांना पराभव जबाबदार धरले. मात्र तरीही विखे यांचे पक्षातील वजन वाढत गेले. भाजपच्या केंद्रीय बलाढ्य नेतृत्वाला भेटण्यासाठी राज्यातील प्रदेश भाजपची विखे यांना आवश्यकता राहिली नाही.

हेही वाचा : Electoral Bonds: गेल्या ५ वर्षांत एकट्या भाजपानं निम्मे निवडणूक रोखे वटवले; आयोगानं जाहीर केली सविस्तर आकडेवारी!

हेच दुखणे लक्षात ठेवत माजीमंत्री राम शिंदे विधानपरिषदेवर नियुक्ती होताच आक्रमक झाले. त्यांनी लोकसभा निवडणूक निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करत विखे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे भाजपचे आमदार शिंदे-युवा नेते विवेक कोल्हे व अजितदादा गटाचे आमदार लंके आदींनी एकत्रितपणे विखे यांच्यावर चढाई करण्यास सुरुवात केली. यापूर्वीही जेव्हा जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ होती, तेव्हाही विखे विरुद्ध इतर सर्व असे राजकारण रंगत असे. विशेषतः सहकारातील निवडणुका याच पद्धतीने लढवल्या जात. मध्यंतरी विखे कुटुंबीय शिवसेनेत गेले. बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे एकाच वेळी केंद्रात व राज्यात शिवसेनेकडून मंत्री झाले. त्यावेळीही असेच चित्र जिल्ह्यात निर्माण झाले होते. आता विखे भाजपमध्ये आल्यानंतरही पुन्हा एकदा विखे विरुद्ध इतर सर्व असे वातावरण निर्माण होत आहे.

बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातील राजकीय वैमनष्य हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा अध्याय आहे. तेच युद्धपुढे राधाकृष्ण विखे व अजित पवार यांच्यामध्ये खेळले गेले. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सुजय विखे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडेही उमेदवारीची मागणी केली होती. परंतु तेही शक्य न झाल्याने ते भाजपमध्ये प्रवेश करते झाले. विखे व पवार कुटुंबीयांमध्ये नगर जिल्ह्यात सातत्याने राजकीय लढाया सुरू असतात.

हेही वाचा : NRC संदर्भात मोदी सरकारची भूमिका काय? मोदी-शाह काय म्हणाले…

महायुतीत नगर लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे आहे. तेथे भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीमध्ये नगरची जागा शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नाही. राष्ट्रवादी एकत्रित असताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी केलेल्या उमेदवारीच्या चाचणीत त्यांनी निलेश लंके यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले होते. मात्र फुटीनंतर लंके अजितदादा गटाकडे केले. आमदार निलेश लंके यांची घरवापसी करत शरद पवार यांनी एकाच वेळी अजित पवार व विखे कुटुंबीय यांना शह दिल्याचे मानले जाते.