पुणे : मार्केट यार्ड- गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ एका गॅरेजमध्ये पहाटे आग लागली. आगीत १७ दुचाकी जळाल्या. आगीमागचे कारण समजू शकले नाही. गंगाधाम रस्त्यावर आई माता मंदिराजवळ गॅरेज आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास गॅरेजमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली.

त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत गॅरेजमधील दुचाकींनी पेट घेतला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. आगीत १७ दुचाकी जळाल्या.

dombivli taloja road thief marathi news
डोंबिवली-तळोजा रस्त्यावर जखमीला मदत करून भामट्याने दुचाकी पळविली
builder mastermind behind robbery on college road
कॉलेज रोडवरील दरोड्यामागे बांधकाम व्यावसायिक सूत्रधार; गुंडांकडून वृध्द दाम्पत्यास मारहाण
Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
School girl missing, Nanded city area,
पुणे : नांदेड सिटीतून शाळकरी मुलगी बेपत्ता, पोलीस आयुक्त रस्त्यावर, मुलगी सुखरूप रांजणगावमध्ये सापडली

हेही वाचा…शिक्षण आयुक्तालयात २३ पदांची भरती; जाणून घ्या सविस्तर…

आग लागल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. पहाटे झोपेत असलेल्या रहिवाशांना धुरामुळे जाग आली. आगीत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकी जळाल्या असून १७ दुचाकींना झळ पोहोचली आहे.