नागपूर : सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे, सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नागपूरमध्ये शुक्रवारपासून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची प्रतिनिधी सभा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गुरूवारी रात्री नागपूरला येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला. दहा दिवसात दुसऱ्यांदा त्यांचा दौरा रद्द झाला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या अधिवेशनासाठी ४ मार्चला नड्डा नागपूरला येणार होते. दिल्लीत ऐनवेळी पक्षाची बैठक ठरल्याने त्यांचा नागपूर दौरा रद्द झाला होता. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. मेळाव्याला मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
NIA action in Bangalore blast case two arrested from Kolkata
कोलकात्यातून दोघांना अटक; बंगळूरु बॉम्बस्फोटप्रकरणी ‘एनआयए’ची कारवाई
All three parties in mahayuti are fighting for Nashik Lok Sabha seat
भुजबळ मुंबईत तर, गोडसे दिल्लीत… इच्छुकांची पडद्याआडून मोर्चेबांधणी
Mira-Bhainder NCP district president Mohan Patil arrested
राष्ट्रवादी मिरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांना अटक, शैक्षणिक संस्थेत घोटाळा केल्याचा आरोप

हेही वाचा…फडणवीस यांनी घेतली गडकरी यांची नागपुरात भेट

आता १५ व १६ मार्चला नागपुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची प्रतिनिधी सभा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे १४ तारखेला रात्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा नागपूरला येणार होते. पण याही वेळी काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाल्याचे भाजपच्या कार्यालयाकडून सायंकाळी सांगण्यात आले. आता ते १६ तारखेला येणार आहेत. ते संघाच्या प्रतिनिधी सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे.