Marathi Breaking Marathi Headlines Updates: : राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ते शक्तीपीठ महामार्गासह आदी विषयांवर या अधिवेशनात चर्चा सुरु आहे. तसेच राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ५ जुलै रोजी विजय मेळावा साजरा करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तसेच सध्या राज्यातील हजारो वारकरी पंढरपूरकडे निघाले असून ते लवकरच पंढरपूरमध्ये पोहचणार आहेत. या बरोबरच राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनातील सर्व घडामोडींसह राज्यातील प्रत्येक घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra News Live Updates / Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Live : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

20:25 (IST) 4 Jul 2025

वैभववाडी: करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत; तासाभरात वाहतूक पूर्ववत

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवून वाहतूक एका तासाच्या आत सुरळीत केली. …वाचा सविस्तर
20:17 (IST) 4 Jul 2025

अलिबाग-वडखळ महामार्गावर शनिवार-रविवारी अवजड वाहनांना बंदी

अलिबाग वडखळ महामार्गावर शनिवार रविवारी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. …वाचा सविस्तर
18:51 (IST) 4 Jul 2025

उपमुख्यमंत्री शिंदेंनी ‘जय गुजरात’ घोषणा का दिली? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “गुजराती…”

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून चांगलाच वाद सुरु आहे. असं असतानाच आज (४ जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ‘जय गुजरात’ ही घोषणा दिली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदेंच्या या घोषणेनंतर विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 4 Jul 2025

Devendra Fadnavis : ‘मराठीच्या नावाखाली कोणी गुंडगिरी केली तर…’, देवेंद्र फडणवीसांचा मनसेला मोठा इशारा

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मनसेला मोठा इशारा दिला आहे. …सविस्तर बातमी
17:47 (IST) 4 Jul 2025

वसतिगृहांवर आता ‘जनजाती छात्रावास विकास समिती’ ची देखरेख; आदिवासी विकासएक विभागाचा निर्णय

सद्यस्थितीत राज्यात ४९० शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी २०६ मुलींची तर, २८४ वसतिगृहे मुलांची आहेत. या वसतिगृहांची विद्यार्थी क्षमता ५८ हजार ७०० इतकी आहे. …सविस्तर बातमी
17:46 (IST) 4 Jul 2025

नाशिक जिल्ह्यातील ३६ शाळांना वर्गवाढीस मान्यता

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे १९ शाळांमध्ये इयत्ता पाचवी, सहावीचे वर्ग, सहावीसाठी तीन शाळा, चार शाळांना आठवी आणि चार शाळांना नववी-दहावी असे वर्ग जोडले जाणार आहेत. …अधिक वाचा
17:01 (IST) 4 Jul 2025

डोंबिवलीत रेतीबंदर, कुंंभारखाणपाडा खाडीत वाळू माफियांच्या ३० लाखाच्या सामग्रीला जलसमाधी

खाडी पात्रात वाळूचा बेकायदा उपसा करणारी वाळू माफियांची ३० लाख रूपयांची यांत्रिक सामग्री महसूल डोंबिवली, कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी खाडी पात्रात बुडून टाकली. काही सामग्रीला आग लावून ती भस्मसात केली. …वाचा सविस्तर
16:57 (IST) 4 Jul 2025

‘समृद्धी’ ठरतोय मृत्यूचा महामार्ग, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार ठार, एक गंभीर; भरधाव मोटार…

भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात दोघांचा घटनास्थळीच, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. …सविस्तर वाचा
16:17 (IST) 4 Jul 2025

हिंदी भाषेसंदर्भातील निर्णयाचा ठाकरे बंधूंना लाभ अशक्य – राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचा दावा

या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना वर्षभरात विजय साजरा करण्याची संधी मिळाली असली तरी याचा राजकीय फायदा त्यांना होणार नसल्याचे तटकरे म्हणाले …अधिक वाचा
16:16 (IST) 4 Jul 2025

“हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?”, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंच्या ‘जय गुजरात’च्या घोषणेनंतर टीका

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुण्यातील गुजराती समुदायाकडून जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त अमित शाह आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की, “अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शाहांच्या समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js
15:28 (IST) 4 Jul 2025

दापोलीत पाच वर्षाच्या मुलाला आईने पैशासाठी विकले; पोलिसांकडून दोघांना अटक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केवळ पैशासाठी पाच वर्षाच्या चिमुरड्याला स्वतःच्या आईने विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …वाचा सविस्तर
15:19 (IST) 4 Jul 2025

नाशिक कुंभमेळ्यात प्रयागराजच्या धर्तीवर पोलिसांची वॉर रुम

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पोलिसांनी सुक्ष्म नियोजनास सुरुवात केली असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितींचा सामना करण्यासाठी ‘वॉर रूम’ उभारण्यात येणार आहे. …अधिक वाचा
15:10 (IST) 4 Jul 2025

धुळ्यात कारागीरच निघाला चोर… १३ मोटारसायकली पोलिसांकडून जप्त

धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय परिसरातून मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. …वाचा सविस्तर
14:59 (IST) 4 Jul 2025

धुळ्यात महावितरणविरोधात ग्राहकांचे आंदोलन…वारंवार वीज पुरवठा खंडित

वीज असतांना मीटर जे रिडींग दाखवते, तेच मीटर जर काही मिनिटे वीज पुरवठा खंडित होऊन परत सुरळीत झाल्यास थेट १०० ते २०० युनिट वाढलेले दाखवते. …सविस्तर बातमी
14:50 (IST) 4 Jul 2025

नाशिकमध्ये डेंग्यूचे जूनमध्ये २५ रुग्ण, गतवर्षीच्या तुलनेत प्रादुर्भाव कमी

सातत्याने सुरू असलेल्या पावसात शहरात विविध आजारांनी डोके वर काढले असताना गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रादुर्भाव मात्र यंदा कमी आहे. …अधिक वाचा
14:43 (IST) 4 Jul 2025

सिंधुदुर्ग जिल्हा उप कारागृह सावंतवाडीची संरक्षक भिंत कोसळली: सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड

घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखले. …वाचा सविस्तर
14:35 (IST) 4 Jul 2025

Aaditya Thackeray : भारत पाकिस्तानबरोबर हॉकी अन् क्रिकेट खेळणार? आदित्य ठाकरे आक्रमक, केंद्राला विचारला सवाल; म्हणाले, “जर तुम्ही…”

यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२५ मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्यांवरून आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. …अधिक वाचा
14:25 (IST) 4 Jul 2025

छ. संभाजीनगर: समाजमाध्यमांवरील प्रेमानंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार …. दोघांवर गुन्हा

ल्पवयीन फिर्यादीने चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. …वाचा सविस्तर
14:22 (IST) 4 Jul 2025

“जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर…”, आदित्य ठाकरेंची रामदास कदम यांच्यावर जहरी टीका

उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरे यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले की, “जास्त बाम लावल्यामुळे डोक्यावर परिणाम होतो हे त्यांचं उदाहरण आहे. ज्या व्यक्तीचा निवडणुकीत दोनवेळा पराभव झाल्यानंतर देखील विधानपरिषद दिली, मंत्री पदे दिले, पण तरीही ते पळून गेले. त्या व्यक्तींवर मी आता बोलू इच्छित नाही”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

13:08 (IST) 4 Jul 2025

“इंग्रजांनी व काही स्वकीयांनी आमच्या अनेक नायकांवर अन्याय केला”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान; पुण्यात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा दिला संदर्भ!

पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण आज आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत अपुराच पोहचण्यासाठी इंग्रज व काही स्वकीयांना दोष दिला. त्यामुळे मोगलांनंतर आपल्याकडे थेट इंग्रजच आहले, असं आपल्याला वाटलं, असंही फडणवीस यावेळी आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या युद्धनीतीचे काही दाखले दिले. एनडीएमधील कार्यक्रमात अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होतं.

सविस्तर वाचा

12:29 (IST) 4 Jul 2025

काळा गणपती भागात कारने सहाजणांना उडवले; एकाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरातील काळा गणपती भागात भरधाव कारने सहा पादचाऱ्यांना उडवल्याने एकाचा मृत्यू, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. …सविस्तर बातमी
12:03 (IST) 4 Jul 2025
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण

थोरले बाजीराव पेशवे यांचा खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे आज ४ जुलै केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह आदी नेते उपस्थित आहेत.

11:44 (IST) 4 Jul 2025

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून प्रहार आक्रमक, विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांचं आंदोलन

विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे, या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत आहेत. यातच राज्य सरकारने आश्वासन दिल्यानुसार अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मुद्यावरून आता प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनासमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

11:26 (IST) 4 Jul 2025

आज सकाळपासून मनसे आणि ठाकरे गटाकडून वरळी डोम परिसरात बॅनरबाजी

५ जुलैला मनसे आणि शिवसेना यांच्यावतीने जल्लोष मेळाव्याचे आयोजन वरळीच्या एनएससीआय डोम या ठिकाणी करण्यात आले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे एकत्र फोटो लावण्यात आले आहेत. ‘आम्ही गिरगावकर’च्यावतीने मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत. त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल, तसेच ब्रँड मराठीचा फक्त ठाकरेच… महाराष्ट्र माझा, अशा प्रकारचे बॅनर परिसरात लावण्यात आले आहेत.

10:28 (IST) 4 Jul 2025

महाराष्ट्रातील इंधनाचे नवे दर जाहीर; मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलची किंमत किती?

पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०४ जुलै २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आज तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय, हे तुम्ही खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घेऊ शकता…

सविस्तर वाचा

10:24 (IST) 4 Jul 2025

Maharashtra Breaking News LIVE : ‘मराठीचा अपमान केला तर तिथेच कानाखाली बसेल’, संदीप देशपांडेंचा इशारा

Maharashtra Breaking News LIVE : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मराठीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. देशपांडे म्हणाले की, आयुष्यभर दुकानाच्या काचा बदलत राहायचं की व्यावसाय करायचा हे एकदा त्यांनी ठरवावं आणि त्यानंतर पुढची भूमिका घ्यावी. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तिथल्या तिथे कानाखाली बसेल असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत., (फोटो-संग्रहित छायाचित्र)