Mumbai Weather Forecast Today : राज्यात पावसाचे थैमान चालू असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मुंबई, नवी मुंबई व पनवेल भागातही मुसळधार पावसाने मोठं नुकसान झालं आहे. पनवेलमधील जनजीव विस्कळीत झालं आहे. पावसाने मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रविवारपासून कोसळणाऱ्या या पावसामुळे चार जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.
Maharashtra News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
“राज्याची अवस्था नेपाळसारखी, तीन महिन्यांत २४ हजार कोटींचं कर्ज घेतलं”; संजय राऊतांचा दावा
शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत म्हणाले, “जे राज्य सरकार अवघ्या तीन महिन्यात राज्य चालवण्यासाठी २४ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेतं त्या राज्याची अवस्था नेपाळसारखीच झालीय असं म्हणावं लागेल. नेपाळ आणि आपल्या अवस्थेत काहीच फरक नाही. राज्यात प्रचंड बेरोजगारी आहे. विकासकामं ठप्प आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांना एसआरएची कामं मिळत आहेत. तसेच कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. याव्यतिरिक्ता इतर कुठलीही कामं चालू नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक जात रस्त्यावर आणली जात आहे. जातीजातीत संघर्ष सुरू केला आहे.”
संजय राऊत म्हणाले, “माझं मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान आहे की त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर यावं आणि शिक्षण, रोजगार क्षेत्रात राज्याने काय प्रगती केली ते सांगावं. राज्यात मोठी लूट चालू आहे. राज्यावर दहा लाख कोटी रुपयांचा डोंगर उभा आहे. अशा स्थितीत आर्थिक शिस्तीच्या गोष्टी करणारे अजित पवार या सगळ्यावर काय बोलतात याकडे लोकांचं लक्ष आहे. स्वतःच्या लोकांना महाराष्ट्र लुटू द्यायचा असं धोरण अजित पवार यांनी अवलंबलं आहे का ते सांगावं.”
सकाळपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचं प्रमाणं
रत्नागिरी जिल्हा
मंडणगड-0 मिमी
दापोली-१९ मिमी
खेड-20 मिमी
गुहागर-16 मिमी
चिपळूण-11 मिमी
संगमेश्वर- 0 मिमी
लांजा-9 मिमी
राजापूर-31 मिमी
वाकवली-25.6 मिमी
सिंधुदुर्ग जिल्हा
दूधमार्ग-30 मिमी
मालवण-6 मिमी
कुडाळ-63 मिमी
कणकवली-३९ मिमी
वैभववाडी-14 मिमी
मुळदे-57.6 मिमी
रामेश्वर-64.4 मिमी
सावंतवाडी-4 मिमी
देवगड-41 मिमी
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज
Thunderstorm accompanied with lightning, heavy rain and gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of South Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 15, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/LN3cyvlF9s
नवरात्रोत्सव २०२५ : पालघर एसटी आगाराची भाविकांना देवी दर्शनाची अनोखी भेट
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर अभयारण्यातली १.१९ हेक्टर वनजमीन अदानीला
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली; हृदय, फुफ्फुस, किडनी प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र निधी उभारणार
बीडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, “बीडमधील आष्टी तालुक्यातील नदीला पूर आला असून सहा गावांना फटका बसला आहे. जिल्ह्यात मागी काही तासांपासून ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा अनेक तालुके व गावांना फटका बसला असून आज (१६ सप्टेंबर) सर्व शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.”
१३ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी
राज्याच्या १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी (१५ सप्टेंबर) अतिवृष्टी झाली. रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्हयांत अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. तर, खडकवासल्याबरोबरच इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. रायगडमधील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनवेल तालुक्यातील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेण तालुक्यामधील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यातील माणगाव, इंदापूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली असून जनजीव विस्कळीत झालं आहे. याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली.
Thane illegal constructions : ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई; पालिकेने मागितला SRPFचा बंदोबस्त
हडपसर-दिवेघाट मार्गावर ब्लास्टिंग….चार तास वाहतूक बंद
हडपसर-दिवेघाट मार्गावर ब्लास्टिंग….चार तास वाहतूक बंद
मंत्री सरनाईक संतापले….दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली अन् समाज माध्यमांसमोर अधिकारी धारेवर
रायगड, पुणे व छ. संभाजीनगर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने रायगड, पुणे व छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
Heavy rains in Maharashtra : राज्यात पावसाचा कहर,चौघांचा बळी; मराठवाड्याला सर्वाधिक फटका (लोकसत्ता टिम)
राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाड्याला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली. कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे.