Mumbai News Updates: त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेईल, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती, ती आम्ही ऐच्छिक ठेवली. त्रिभाषा सूत्राबाबत ज्येष्ठ अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल आल्यावर विद्यार्थी हित लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तसेच ३० जून रोजी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून हे अधिवेशन १८ जुलैपर्यंत असणार आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 1 July 2025

12:08 (IST) 1 Jul 2025

भिवंडी-वाडा महामार्गाची दुरावस्था व उद्रेक; १२ तास रास्ता रोको आंदोलन

आंदोलन तब्बल १२ तास सुरू होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि एसटी बस सेवा ठप्प झाली. …अधिक वाचा
12:06 (IST) 1 Jul 2025

परराज्यातून पेरूची वाढती आवक; तैवान पिंक, लखनौ ४९ जातींना पसंती

‘तैवान पिंक’, ‘लखनऊ ४९’ आणि ‘आलाहाबाद सफेदा’सारख्या दर्जेदार जातींना ग्राहकांची खास मागणी आहे. …सविस्तर वाचा
12:03 (IST) 1 Jul 2025

मानहानीची फौजदारी तक्रार, कंबोज यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर मलिक यांच्याविरुद्धचा खटला बंद

तक्रारदाराने तक्रार मागे घेतल्याने मलिक यांची मानहानीच्या फौजदारी खटल्यातून निर्दोष सुटका झाली आहे. …सविस्तर वाचा
11:53 (IST) 1 Jul 2025

१४ गावे नवी मुंबईतच, गणेश नाईकांच्या विरोधाला निवडणुकांचा अडसर

गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात यावीत अशा स्वरुपाची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून या मुद्द्यावरुन शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे. …अधिक वाचा
11:52 (IST) 1 Jul 2025

महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा मार्ग मोकळा

दादरस्थित महापौर बंगल्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्ग उच्च न्यायालयाने मंगळवारी मोकळा केला. …सविस्तर बातमी
11:41 (IST) 1 Jul 2025

बँक खाते उघडण्यास विलंब…तक्रारकर्त्याला ५० हजारांच्या भरपाई देण्याचे येस बँकेला उच्च न्यायालयाचे आदेश

आधार ओळखपत्राच्या चुकीच्या आग्रहाखातर बँक खाते उघडण्यास उशीर केल्याबद्दल उच्च न्यायालयाने येस बँकेला मायक्रोफायबर्स प्रायव्हेट लिमिटेडला ५० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. …वाचा सविस्तर
11:39 (IST) 1 Jul 2025

देवरीत अपघात; अनियंत्रित कार झाडाला धडकली ,२ जागीच ठार

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातील चिचगड कडून भरधाव वेगात येणाऱ्या अनियंत्रित कार ने रस्त्यालगत असलेल्या बीजाच्या झाडाला जोरात धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात कारमधील दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी ०१ जुलै रोजी पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास देवरी तालुक्यातील परसटोला शिवारात घडली.

सविस्तर वाचा…

11:28 (IST) 1 Jul 2025

डहाणू छ.संभाजीनगर बसचा अपघात; १४ प्रवासी जखमी, दोन गंभीर

डहाणू आगारातून सकाळी ८ वाजता निघालेली बस प्रवासात असताना ९.४५ वाजताच्या सुमारास कावडास येथील तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली आहे. …अधिक वाचा
11:23 (IST) 1 Jul 2025

डॉक्टरकडून तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न, तपासणीच्या बहाण्याने घेतला गैरफायदा

कांदिवली पूर्वमधील डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. …वाचा सविस्तर
11:22 (IST) 1 Jul 2025

पालिकेच्या आरोग्य विभागाला बनावट औषध पुरवठा; वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पालिकेने आरोग्य विभागाला औषध पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नियुक्त केले असून त्यांच्या मार्फत पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्र, माताबाल संगोपन केंद्र अशा ठिकाणी औषधांचा पुरवठा केला जातो. …सविस्तर वाचा
11:20 (IST) 1 Jul 2025

उत्तन येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई;१४ निर्माणाधीन बंगले जमीनदोस्त

येडू कंपाउंड परिसरात अनधिकृत बंगले उभारले जात असल्याची तक्रार आयुक्त राधा बिनोद शर्मा यांच्याकडे करण्यात आली होती. …वाचा सविस्तर
11:14 (IST) 1 Jul 2025

शाळांना धमक्यांचे सत्र सुरूच…कांदिवलीमधील शाळा बॉम्बने उडविण्याची धमकी

कांदिवली येथील एक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी सोमवारी देण्यात आली होती. …वाचा सविस्तर
11:10 (IST) 1 Jul 2025

आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाड्या; नवी अमरावती, खामगाव, अकोल्याहूनही…

अमरावती : पंढरीच्या विठ्ठलदर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी चार रेल्वे स्थानकांवरून विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्तांची सोय होणार आहे.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 1 Jul 2025

कॉटन ग्रीन येथे बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त…२५ लाखांचा बनावट नोटा जप्त

अंकित दीनानाथ पराशर याला अटक करण्यात आली असून, समा हुसेन लतीफ, कबीर आणि रंजीत बेहरा हे इतर संशयित आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. …अधिक वाचा
10:56 (IST) 1 Jul 2025

अकोला जिल्ह्यावर वरुणराजाची कृपादृष्टी, जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

अकोला : यंदा वरुण राजाने अकोला जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी दाखवली आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १३६.९ मि.मी. आहे. यंदा जून महिन्यात १५५.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गतवर्षी जून महिन्यात हेच प्रमाण १३९ मि.मी. होते. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला.

सविस्तर वाचा…

10:55 (IST) 1 Jul 2025

महापालिकेच्या आवाहनानंतर शाळा बंदचा संप तूर्तास स्थगित, इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनचा निर्णय

ठाणे : दिव्यातील अनधिकृत शाळांच्या विरोधात इंडिपेंडेंट स्कूल मॅनेजमेंट असोसिएशन या संघटनेने १ जुलै पासून दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने संबंधित संघटनेला हा बेमुदत संप मागे घेण्याचे आवाहन केले होते.

सविस्तर वाचा…

10:47 (IST) 1 Jul 2025

पुणे-सोलापूर रस्त्यावर इराणचा ध्वज, खामेनींचा फलक; लोणी काळभोरमधील प्रकार

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि खामेनी यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. …अधिक वाचा
10:43 (IST) 1 Jul 2025

पवई आयआयटीमध्ये घुसखोरी करणाऱ्याला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायचे होते…घातपाताचा प्रकार नाही

बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) १७ जून रोजी बेकायदेशीरपणे संस्थेच्या व्याख्यानाला बसला होता. त्याला सुरक्षा रक्षकांनी पवई पोलिसांच्या ताब्यात दिले होते. …सविस्तर बातमी
10:38 (IST) 1 Jul 2025

भांडूप येथे मुलीची आत्महत्या नाही, तर हत्या; मित्रानेच धक्का दिल्याचे उघड

याप्रकरणी भांडुप पोलीस हत्येचा गुन्हा दाखल करणार असून त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. …अधिक वाचा
10:29 (IST) 1 Jul 2025

वसई, विरारमध्ये पुन्हा ईडीची कारवाई…वास्तुविषारद, अभियंत्यांच्या १२ ठिकाणी छापे

वसई आणि मुंबईतील १२ ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे वसई, विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे. …सविस्तर वाचा
10:14 (IST) 1 Jul 2025

कर्जामुळे नैराश्यातून तरुणाची नदीत उडी , पोलिसांच्या तत्परतेने…

नागपूर : कर्जामुळे त्रस्त नैराश्यातून दोन दिवसांपूर्वी घराबाहेर पडलेल्या एका तरुणाने सोमवारी दुपारी पोलिसांच्या देखत मौदा परिसरातील कन्हान नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तत्परता दाखवत वाडी पोलिसांनी नदी पात्रातून त्याला सुखरूप बाहेर काढत प्राण वाचविले.

सविस्तर वाचा…

10:12 (IST) 1 Jul 2025

समूह विकास योजनेच्या सक्तीमुळे अडथळे; स्वतंत्रपणे पुनर्विकास करण्याच्या परवानगीसाठी मिरा-भाईंदर पालिकेचा शासनाकडे प्रस्ताव

महापालिकेकडून २४ ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यासाठी आराखडे निश्चित करून याबाबतची अधिसूचना शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
10:02 (IST) 1 Jul 2025

उद्योग नगरी चंद्रपुरात प्रदुषणाचे संकट, विविध आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ

चंद्रपूर : प्रदूषित उद्योगांमुळे या जिल्ह्यात जल व वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. माणूस, वन्यजीव प्राणी, जलचर प्राणी तसेच पक्ष्यांच्या जीवाला प्रदूषणामुळे धोका आहे. येथील कर्मवीर मां.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अहवालानुसार २०२३ ते २०२५ या कालावधीत त्वचारोगाच्या ७७ हजार ५४३ रूग्णांची तपासणी केली आहे.

सविस्तर वाचा…

09:49 (IST) 1 Jul 2025

वाळूमाफियांचा पुन्हा उच्छाद; बेसुमार वाळू उपशामुळे समुद्रकिनाऱ्यांची धूप, पर्यटनही धोक्यात

खाडी किनाऱ्या लागूनच वाळू उपसा करण्यास बंदी घातली आहे. मात्र त्यातच समुद्र किनाऱ्यांच्या भागात छुप्या मार्गाने अनिर्बंध वाळू उपसा करण्याचे प्रकार समोर येत आहेत. …अधिक वाचा
09:44 (IST) 1 Jul 2025

अन् त्याने भरविले चक्क पोलीसांना कापरे…

नागपूर : पाचपावली परिसरात सध्या जुन्या पुलाचे तोडकाम आणि नवी उड्डाण पुलासाठी पिलर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माती उपसली जात आहे. त्यात सायंकाळी सहाच्या सुमारास पावसाची रिपरीप सुरू झाली. या पावसात एक साप बिळातून बाहेर आला आणि पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या डीबी पथकाच्या कक्षात पोहोचला.

सविस्तर वाचा…

09:41 (IST) 1 Jul 2025

कोकणात काँग्रेसचे भवितव्य काय ? 

श्रीवर्धन, राजापूर मतदार या दोन मतदारसंघात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मात्र बंडखोरांना मतदारांनी नाकारले होते. …सविस्तर बातमी
09:11 (IST) 1 Jul 2025

राज्यातील मालवाहतूकदारांचा आज संप; अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणामाची शक्यता

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहनधारक आणि दररोज शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे बसचालक या संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. …वाचा सविस्तर

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे