काँग्रेसचे खासदार नवीनजिंदाल यांच्या कंपनीकडून १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेले झी समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र आणि त्यांच्या मुलास २० डिसेंबपर्यंत अटक करू नये, असा अंतरिम आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती राज राणी मित्रा यांनी या बाबत आदेश दिला असून या पितापुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर त्याच दिवशी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले आहे. आपल्या अशिलांचे पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यात असल्याने ते परदेशात पसार होण्याची शक्यता नाही, असे त्यांच्या वकिलांच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले. या पितापुत्रांना अंतरिम संरक्षण ६ डिसेंबर रोजी देण्यात आले. त्यानंतर ८ आणि ९ डिसेंबर रोजी ते चौकशीसाठी हजर राहिले. मात्र त्यानंतर त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या अंतरिम संरक्षणाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करण्यात आली.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee boss and sons protection from arrest extended till dec