Google Advance Search Engine Helps In Find Exact Result For Image Video How To Use on Mobile and Laptops | Loksatta

गूगलने आणली ‘ऍडव्हान्स सर्च इंजिन’ सेवा; फोटो, व्हिडीओ व माहिती शोधताना कसा कराल वापर?

Google Advance Search: गुगलच्या माहितीनुसार जेव्हा तुम्हाला नेमकी कशाची माहिती हवी आहे हे माहित असते आणि भाराभार माहितीची आवश्यकता नसते तेव्हा तुम्हाला हे फीचर मदत करू शकतं.

Google Advance Search Engine Helps In Find Exact Result For Image Video How To Use on Mobile and Laptops
गूगल ऍडव्हान्स सर्चचं नेमकं काम काय? (फोटो: संग्रहित)

Google Advance Search: गूगल सर्च ही जगभरातील कोट्यवधी लोकसंख्येला रोज वापरात येणारी व लागेल ती मदत करणारी एक जादुई कांडी आहे असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही. सप्टेंबरमध्ये गूगल तर्फे करण्यात आलेल्या घोषणेनुसार याच गूगल सर्चला अधिक समृद्ध करण्यासाठी कंपनीतर्फे पाऊले उचलण्यात येत आहेत. प्राप्त माहितीनुसार लवकरच गूगल सर्चमध्ये शॉर्ट व्हिडीओ उत्तरांचा सुद्धा समावेश होणार आहे. गूगलची अशी अनेक फीचर्स जी तुम्हाला हव्या त्या विषयावर अचूक माहिती शोधण्यास कामी येऊ शकतात यातीलच एक म्हणजे गूगल ऍडव्हान्स सर्च इंजिन. वेबपेज, फोटो, व्हिडीओ व बुक या भागात हे गूगलचे अद्ययावत सर्च फीचर काम करणार आहे, पण याचा नेमका वापर करायचा कसा हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर गूगलवर शोधावे लागणार नाही, उलट याच लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत..

गूगल ऍडव्हान्स सर्चचं नेमकं काम काय?

गुगलच्या माहितीनुसार जेव्हा तुम्हाला नेमकी कशाची माहिती हवी आहे हे माहित असते आणि भाराभार माहितीची आवश्यकता नसते तेव्हा तुम्हाला हे फीचर मदत करू शकतं. उदाहरणार्थ तुम्हाला मुंबईतील तुमच्या भागातील जवळच्या शाळा प्रवेश अर्जांची माहिती हवी असेल आणि तुम्हाला अगदी मागील २४ तासात उपलब्ध झालेलीच माहिती शोधायची असेल तर तुम्ही तसे फिल्टर लावून या ऍडव्हान्स सर्च इंजिनचा वापर करू शकता. यात तुम्हाला तुमच्याच परिसरातील किंवा तुम्ही सेट केलेल्या अंतरातील व वेळेतील अपडेट्स मिळू शकतील.

गूगल ऍडव्हान्स सर्च कसं वापरायचं?

गूगल ऍडव्हान्स सर्च संगणक, Android आणि iOS वर iPhones आणि iPads वर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. क्रोम व ब्राउझरवरून आपण याचा वापर करू शकता. तुम्ही गूगल ऍडव्हान्स सर्च बुकमार्क म्हणून जोडू शकता किंवा मोबाइल ब्राउझरवरील तुमच्या होमस्क्रीनवर ऍड करू शकता.

मोबाईलवर कसे वापराल गूगल ऍडव्हान्स सर्च?

  • मोबाइल ब्राउझरवर, ऍडव्हान्स सर्चसाठी थेट ‘ googledotcom followed /advanced_search’ हे युआरएल टाइप करावे लागेल.
  • इमेजसाठी, URL चा शेवटचा भाग अॅडव्हान्स्ड image सर्च,
  • व्हिडिओसाठी हा अॅडव्हान्स्ड video सर्च आहे
  • पुस्तकांसाठी हा अॅडव्हान्स्ड Book सर्च आहे.
  • मोबाईल ब्राउझरवर शोधताना तुम्हाला या युआरएलसमोर google.com जोडावे लागेल

हे ही वाचा<< iphone झाला स्वस्त, JBL, Boat वरही मोठी सूट; नोव्हेंबर अखेरीस येणारा ‘ब्लॅक फ्रायडे सेल’ आहे तरी काय?

लॅपटॉपवर कसे वापराल गूगल ऍडव्हान्स सर्च?

  • Google Search सुरु आणि कोणताही विषय शोधा.
  • तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात गियर चिन्ह दिसेल. यावर क्लिक करा.
  • एक मेनू उघडेल आणि तुम्हाला एक पर्याय म्हणून प्रगत शोध (ऍडव्हान्स सर्च) पर्याय दिसेल.
  • यावर क्लिक करा आणि तुमच्या शोध विषयासाठी पर्यायांसह एक नवे वेबपेज उघडेल.
  • तुम्हाला आवश्यक निकषांसह वेबपेज शोधता येतील.
(फोटो: Indian Express)

हे ही वाचा<< ट्विटरचे रंग बदलणार; ‘ब्लू टिक’संदर्भात एलॉन मस्क यांची मोठी घोषणा! तुम्हीही करु शकता वापर

गूगलवर तुम्हाला फोटो, व्हिडिओ आणि पुस्तकांसाठी ऍडव्हान्स सर्च वापरता येते. जेव्हा तुम्ही इमेज शोधता, तेव्हा तुम्ही फाइल आकार, गुणवत्ता , रंग आणि इमेज प्रकार शोधू शकता. व्हिडिओसाठी, Google तुम्हाला भाषा, व्हिडिओचा कालावधी, पोस्टची तारीख, व्हिडिओची गुणवत्ता आणि सब हेडिंग यांसारखे फिल्टर लागू करता येतात.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 12:41 IST
Next Story
Paytm वरून डेबिट कार्डशिवाय UPI Pin बदलता येणार; जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स