रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. जेष्ठ पत्रकारांना दिला जाणारा म. ना. पाटील पुरस्कार दैनिक निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू यांना जाहीर झाला आहे, तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कारासाठी मुरुडच्या नितीन शेडगे यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या सभेला उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, सरचिटणीस प्रकाश काटदरे, मिलिंद अष्टीवकर, अभय आपटे, शैलेश पालकर आणि वसंत चौलकर उपस्थित होते. या सभेत सस्थेकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
तर जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून जिल्ह्य़ातील साहित्यिकाला दिला जाणारा राजा राजवडे पुरस्कार यावर्षी अ‍ॅड. विलास नाईक यांच्या एक ना धड पुस्तकाला जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्कारांचे वितरण ६ जानेवारी २०१३ ला रामनारायण पत्रकार भवन अलिबाग इथे होणार आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, मार्मिकचे संपादक पंढरीनाथ सावंत आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Award declared for raigad press union