अलिबाग तालुक्यातील भाल येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जमिनीच्या वादातून राडा झाला. दोन गटांत झालेल्या या हाणामारीत एकूण पाचजण जखमी झाले असून, त्यातील तीनजण गंभीर जखमी आहेत. त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाल येथील वहिवाटीचा रस्ता आहे. तो रस्ता काही लोकांनी बंद केला. याबाबत तहसील कार्यालयातदेखील तक्रार करण्यात आली होती.
सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रस्ता अडविणाऱ्या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकांमध्ये आणि रस्ता अडविणाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.   या हाणामारीमध्ये उमेश घरत, विजय म्हात्रे, मनोहर पाटील, दिलीप पाटील हे गंभीर जखमी झाले आहे. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य दोन जखमींना उपचारानंतर सोडून देण्यात आले. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qurreal in bhal on land seprationthree injured