मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचे भूत आपल्याला दररोज रात्री त्रास देते, असा दावा करणाऱ्या दहशतवादी अबू जुंदालला कसाबच्या कोठडीतून हलविण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच त्याची नवी मुंबईतील तळोजा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.
कसाबसाठी आर्थर रोड कारागृहात कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या विशेष ‘अंडासेल’मध्ये जुंदालला ठेवण्यात आले आहे. मात्र कसाबचे भूत दररोज रात्री आपल्याला त्रास देते, असा दावा जुंदालने केला होता. एवढेच नव्हे, तर आपल्याला दुसरीकडे हलविले नाही तर कसाबचे भूत आपला जीव घेईल, असेही त्याचे म्हणणे होते. तशी तक्रार त्याने विशेष न्यायालयाकडे करीत इतरत्र हलविण्याची मागणीही केली होती. त्यावर न्यायालयाने त्याच्या मानसिक स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तुरुंग प्रशासनाने अहवाल सादर करीत तो मानसिकदृष्टय़ा ठीकठाक असल्याचे न्यायालयाला कळविले होते. त्यामुळे कसाबचे भूत आपल्या मानगुटीवर अखेपर्यंत बसून राहणार असा समज करून घेणाऱ्या जुंदालने अखेर आपल्याला कसाबच्या कोठडीतून हलविण्यात आले नाही तर उपोषणाला बसू, असा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भूमिका बदलत त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलविण्याची तयारी दाखवली आहे. तशी माहितीही त्यांनी विशेष न्यायालयाला दिली. जुंदालला तळोजा कारागृहात हलविण्याबाबत विचार केला जात असून त्याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप घ्यायचा असल्याचे मंगळवारी पोलिसांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Apr 2013 रोजी प्रकाशित
अबु जुंदालची लवकरच तळोजा तुरुंगात रवानगी?
मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याचे भूत आपल्याला दररोज रात्री त्रास देते, असा दावा करणाऱ्या दहशतवादी अबू जुंदालला कसाबच्या कोठडीतून हलविण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच त्याची नवी मुंबईतील तळोजा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 04-04-2013 at 03:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abu jundal now going to taloja jail