भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डम्परने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.शनिवारी सकाळी माहीम कॉजवे येथे ही घटना घडली. वांद्रे पोलिसांनी याप्रकरणी डम्परचालक रफिक शेख (३६) याला अटक केली आहे. शनिवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान ही घटना घडली. माहीम कॉजवे येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका डम्परचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला घुसला. त्या ठिकाणी झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर डम्परचे चाक गेल्याने त्यात तो जागीच मरण पावला. या घटनेनंतर फरार झालेल्या डम्परचालकाला पोलिसांनी अटक केली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-11-2012 at 03:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dumper hit man sleeping on road dead