शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकण्याचे स्वप्न पाहिले होते. मी हे आकाशाएवढे आव्हान स्वीकारले आहे, तुम्ही मला साथ द्या, असे आवाहन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संध्याकाळी येथील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. यावेळी नवी मुंबई महापालिकेतील सभागृह नेते विठ्ठल मोरे यांनी त्यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला.
गडकरी रंगायतनमध्ये आयोजित या मेळाव्यात जिल्ह्य़ातील पक्षाचे सर्व आमदार, महापौर, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हासंपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव विनायक राऊत, ज्येष्ठ नेते सतीश प्रधान आदी नेते याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-12-2012 at 02:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New mumbai corporator vithaal more came back in shivsena