-

आहारात पांढऱ्या तांदळाला पर्याय म्हणून बाजरीचं सेवन जर आहारात सुरु केलं तर शरीराला फायबर जास्त प्रमाणात मिळतं. वजन नियंत्रणात आण्यासाठीही बाजरीची भाकरी उपयुक्त आहे.
-
बाजरीचा ग्लायमेक्स इंडेक्स तांदूळाच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होण्यास मदत होते.
-
बाजरीचं सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बाजरीत जास्त फायबर असल्याने ते आरोग्यासाठी उपयोगी असतं.
-
बाजरीचं नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. रक्तदाब कमी होण्यासही मदत होते.
-
बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं. दीर्घकाळ भूक लागत नाही. ज्याचा फायदा वजन नियंत्रणासाठी होतो.
-
तांदूळाच्या तुलनेत बाजरीत लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराची उर्जा वाढण्यास मदत होते.
-
बाजरी ही आरोग्यदायी आहे. बाजरीची भाकरी आणि भाजी हा जेवणाचा उत्तम पर्याय ठरू शकतो.
तांदूळ खाण्याऐवजी जर बाजरीचा समावेश आहारात केला तर काय होतं?
तांदूळ सोडून जर बाजरी खाण्यास सुरुवात केली तर काय होतं?
Web Title: What happens when you replace white rice with millets iehd import scj