Butter Naan Recipes: आपण हॉटेलमध्ये नेहमीच बटर नान खातो. पण अनेकदा घरी पनीर मसाला, बटर चिकन असे पदार्थ बनवल्यावर बाहेरुन नान आणावे लागतात. अशावेळी तुम्ही अवघ्या काही मिनिटांत घरच्या घरी बटर नान बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया बटर नान बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…

बटर नान बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Butter Naan Recipes)

  • १/२ कप बारीक मैदाचे पीठ
  • १/४ कप ताजे दही
  • १/४ चमचा बेकिंग सोडा
  • १/२ चमचा साखर
  • २ चमचे तेल
  • १ चमचा काळे तीळ
  • बटर प्रमाणानुसार
  • चवीनुसार मीठ

हेही वाचा: मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा ‘चिली गार्लिक पराठा’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

बटर नान बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदाच्या पीठात दही, बेकिंग सोडा, मीठ, साखर आणि तेल घालून सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या.
  • आता कोमट पाण्याच्या साहाय्याने पीठ मळून घ्या त्यानंतर त्यावर थोडे तेल लावून पीठ पुन्हा मळून घ्या.
  • पीठ मळून ते १ तास झाल्यावर झाकून ठेवा.
  • आता मळलेल्या पीठाचा गोळा करून त्याला अंडाकृती आकारात लाटून घ्या.
  • आता लाटलेल्या नानला बटर लावा आणि पुन्हा एकदा दुमडून घ्या.
  • नंतर परांठ्याप्रमाणे नानला लाटून घ्या.
  • नान लाटत असताना त्याला थोडे पाणी लावा ज्यामुळे नान तव्याला चिटकणार नाही.
  • त्यांतर नानवर काळे तीळ लावा.
  • आता या नानला खरपूस भाजून घ्या.
  • हे झाल्यावर त्यावर पुन्हा बटर सोडा.
  • तयार बटर नान तुम्ही पनीर मसाला, चिकन मसाला यांसह सर्व्ह करा.