Airtel ही देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेलने देशात आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी ऑगस्टमध्ये ९९ रुपयांचा अनलिमिटेड डेटा पॅक लॉन्च केला आहे. एअरटेल एकाच वेळी ग्राहकांसाठी अनुकूल दर पर्याय ऑफर करण्यासाठी आणि ARPU (प्रति वापरकर्ता सरासरी महसूल) वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे पावले उचलताना दिसत आहे. आता कंपनीने या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सुविधांमध्ये काही बदल केले आहेत. जे ग्राहकांना फायदेशीर ठरू शकते. कंपनीने ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये कोणकोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लॅन: आधी मिळणारे फायदे

एअरटेल ९९ रूपये डेटा पॅक ग्राहकांना १ दिवसाची वैधता मिळते. तसेच अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. तथापि, ३० जीबी चे योग्य वापर धोरण (FUP) लागू होते. ३० जीबी हाय-स्पीड डेटा वापरल्यानंतर एअरटेल वापरकर्ते ६४ KBps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरू शकतात. कृपया लक्षात घ्या की या डेटा पॅकचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk  ने दिले आहे.

हेही वाचा : Airtel 99 Rs Plan: कंपनीने लॉन्च केला जबरदस्त प्लॅन; मिळणार ३० जीबी डेटा

एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लॅन: आता मिळणारे फायदे

एअरटेलने ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे आता अपडेट केले आहेत. यामध्ये आता एका दिवसांऐवजी दोन वापरकर्त्यांना मिळणार आहे. मात्र (FUP) मध्ये बदल करून दररोज २० जीबी इतके करण्यात आले आहे. हा डेटा संपल्यानंतर स्पीड हा ६४ Kbps इतका होईल. याच अर्थ आता एअरटेल ग्राहक दोन दिवसांसाठी दररोज २० जीबी म्हणजे एकूण ४० जीबी डेटाचा आनंद घेऊ शकणार आहेत.

या प्लॅनमध्ये कंपनीने एक दिवसाची वैधता ही दोन दिवस इतकी केली आहे. तर एकूण मिळणाऱ्या डेटामध्ये देखील १० जीबी इतकी वाढ केली आहे. मात्र या डेटा प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एक सक्रिय बेस प्लॅन असणे आवश्यक आहे. जर का कंपनीचे वापरकर्ते कंपनीने ज्या भागात ५ जी लॉन्च केले आहे त्या भागात राहत असतील तर ते एअरटेलच्या ट्रूली अनलिमिटेड प्लॅनसह ५ जी डेटाचा आनंद घेऊ शकतात. सध्या ज्या वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते त्यांच्यासाठी एअरटेलचा ९९ रुपयांचा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel update our 99 rs prepaid plan 2 days validiy and 40 gb deta check all details tmb 01