Premium

एका महिन्यापेक्षा जास्तीची वैधता देणारा BSNL चा ‘हा’ रिचार्ज प्लॅन पाहिलात का? जाणून घ्या

BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे.

bsnl 107 rs recharge plan
बीएसएनएलचा १०७ रुपयांचा रीचार्ज प्लॅन (Image Credit- Loksatta Graphics Team)

देशामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. तसेच BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनल आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आले आहे. जो या किंमतीमध्ये इतर कोणत्याही टेलिकॉम कंपन्यांपेक्षा उत्तम फायदे देतो. तर बीएसएनएलचा हा प्लॅन किती रुपयांचा आहे आणि त्यात कोणकोणते फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीएसएनएलने ग्राहकांच्या किमान गरजा पूर्ण करता याव्यात म्हणून १०७ रुपयांचा प्लॅन आणला आहे. यामध्ये आकर्षक फायदे ग्राहकांना मिळणार आहेत. याबाबतचे वृत्त telecom talk ने दिले आहे.

हेही वाचा : UPI पेमेंट मध्येच अडकू नये म्हणून काय करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

BSNL चा १०७ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या १०७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना ३५ दिवसांची वैधता मिळणार आहे. MTNL नेटवर्कवर कॉल्ससह २०० मिनिटे स्थानिक, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स ऑफर करतो. तसेच ३ जीबी मोफत डेटा देखील यामध्ये मिळतो. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन इंटरनेटचा वापर करण्यासाठी IM अ‍ॅप्लिकेशन्सशी कनेक्ट राहण्यासाठी, आपला आवडता कंटेंट पाहण्यासाठी ग्राहकांना परवानगी देतो.

ज्यांना केवळ आपले बीएसएनएलचे सिमकार्ड सुरु ठेवायचे आहे त्यांच्यासाठी हा रिचार्ज प्लॅन एक योग्य प्लॅन म्हणता येईल. ज्यामध्ये कमीत कमी खर्चामध्ये व्हॉइस कॉल्स करता येतील, व डेटाचा आनंद देखील घेता येईल. BSNL च्या १०७ रुपयांच्या प्लॅनच्या मदतीने ग्राहक एका महिन्यापेक्षा जास्त काळ त्यांच्या कनेक्टिव्हीटी राखू शकतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bsnl 107 rs prepaid recharge plan 3 gb deta and roming std calls internet browsing check details tmb 01

First published on: 30-05-2023 at 11:54 IST
Next Story
UPI पेमेंट मध्येच अडकू नये म्हणून काय करावे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स