earbuds available under 1 thousand rupees on amazon | Loksatta

अमेझॉनवर बजेट इअरबड्स उपलब्ध, किंमत १ हजारांच्या आत, १० तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, पाहा यादी

तुमचे बजेट कमी असेल तर, १ हजार रुपयांच्या आतही काही इअरबड्स उपलब्ध आहेत. या इअरबड्सबाबत जाणून घेऊया.

अमेझॉनवर बजेट इअरबड्स उपलब्ध, किंमत १ हजारांच्या आत, १० तासांपेक्षा अधिक प्लेटाईम, पाहा यादी
(pic credit – amazon)

बाजारात महागडे इअरबड्स उपलब्ध आहेत. त्यांची किंमत २५ हजारांपर्यंत आहे. मात्र, तुमचे बजेट कमी असेल तर, १ हजार रुपयांच्या आतही काही इअरबड्स उपलब्ध आहेत. या इअरबड्सबाबत जाणून घेऊया.

१) झेब्रॉनिक्स झेब साउंड बॉम्ब ३ टीडब्ल्यूएस इअरबड्स

Zebronics Zeb – Sound Bomb 3 TWS हा ब्लूटूथ इअरबड्स असून ते इन बिल्ट माईकसह मिळतात. इअरबड्समध्ये हँड फ्री कॉलिंग आणि व्हाइस असिस्टेंट फीचर मिळते. या इअरबड्समध्ये तुम्हाला १३ एमएमचा दमदार ड्राइव्हर मिळतो ज्यामुळे संगीत स्पष्ट ऐकू येते. अमेझॉनवर हे इअरबड्स ७९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

(सॅमसंग, असूसला फुटणार घाम; ९६ जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो ‘हा’ लॅपटॉप)

२) पीट्रॉन बासबड्स

pTron Bassbuds B21 TWS Earbuds मध्ये तुम्हाला टीडब्ल्यूएस आणि स्टिरिओ साउंड सपोर्ट मिळतो. हे इअरबड्स ब्लूटूथ ५.२ कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहेत. इअरबड्स २४ तासांचा बॅटरी बॅकअप देतात. अमेझॉनवर या इअरबड्सची किंमत ७९९ रुपये आहे.

३) वीकूल मुनवॉक एम १ ईएनसी इअरबड्स

WeCool Moonwalk M1 ENC True Wireless Earbuds मधून तुम्हाला चांगला साउंड एक्सपिरिअन्स मिळेल. या इअरबड्सद्वारे तुम्ही हँड फ्री कॉलिंग सहज करू शकाल. यासह इअरबड्सपासून सराउंड साउंड इफेक्टही मिळतो. इअरबड्स आणि चार्जिंग केस दोन्ही मिळून ४० तासांचा बॅटरी बॅकअप देतात. सिंगल चार्जमध्ये इअरबड्स १० तासांचा प्ले टाईम देतात.

४) ट्रुक बड एफ १

Truke Buds F1 Bluetooth 5.3 Truly Wireless इअरबड्स सिंगल चार्जमध्ये १० तासांचा प्लेटाईम देतात, तर चार्जिंग केससह इअरबड्स ३८ तासांपर्यंतचा प्लेटाईम देतात. इअरबड्समधून डीप बेस मिळतो आणि ते एएसी कोडेकला सपोर्ट करतात. इअरबड्समध्ये ड्युअल एमईएमएस एमआयसी एनव्हायरमेंटल नॉइस कॅन्सलेशन देखील मिळते. अमेझॉनवर हे बड्स ८९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

(सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत)

५) पीट्रोन बासबड्स

pTron Bassbuds Eon Truly Wireless इअरबड्स हे अमेझॉनवर ८७८ रुपयांमध्ये मिळत आहेत. इअरबड्सना आकर्षक डिजाइन मिळाले आहे. क्विक पेअरींग, फास्ट चार्चिंग, टच कंट्रोल आणि ३० तासांपर्यंतचा प्लेटाईम ही बड्सची वैशिष्ट्ये आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 17:21 IST
Next Story
सादर झाला INFINIX ZERO 5G 2023; 8 जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत