Premium

Google च्या ‘या’ नव्याकोऱ्या स्मार्टफोनचे १५ हजारात व्हा मालक; ‘इथे’ मिळतोय डिस्काउंट…

गुगलच्या या स्मार्टफोनची मोठी मागणी असून कॅमेरा आणि डिस्प्लेमुळे या फोनची ग्राहकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.

Google Pixel 7 Discount
Google च्या 'या' फोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट (Photo-financialexpress)

गुगलने अलीकडेच नवीन Google Pixel 8 सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने Pixel 8 आणि Pixel 8 Pro असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने आता आपल्या जुन्या फोन Pixel 7 वर मोठी सूट जाहीर केली आहे. जर तुम्हाला Google फोन हवे असेल तर तुम्ही Pixel 7 फक्त १४,८९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ऑफरमध्ये तुम्हाला इन्स्टंट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरही मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Google Pixel 7 मध्ये ६.३-इंच फुल-HD+ OLED स्क्रीन आहे, ज्यासह वापरकर्त्यांना ९०Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळतो. फोनमधील प्रोसेसरसाठी Google Tensor G2 चिपसेट वापरण्यात आला आहे. Google Pixel 7 मध्ये ८GB RAM आहे.Google Pixel 7 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा पहिला कॅमेरा ५०MP आहे आणि दुसरा कॅमेरा १२MP आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १०.८ MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय या फोन्समध्ये व्हिडीओसाठी सिनेमॅटिक ब्लर व्हिडिओ फीचरही देण्यात आले आहे.

(हे ही वाचा : आता आयफोननंतर एलॉन मस्कचं ‘या’ स्मार्टफोनवर जडलं प्रेम, म्हणतात, “हा तर एकदम…” )

Google Pixel 7 वर मोठी सूट

हा Google फोन ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे, जिथे त्याची किंमत ५९,९९९ रुपये आहे, परंतु सध्या हा फोन ४१,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. याशिवाय तुम्ही तुमचा जुना फोन Google Pixel 7 च्या बदल्यात दिल्यास, तुम्हाला २७,१०० रुपयांची सूटही मिळेल. अशा परिस्थितीत तुम्ही Google Pixel 7 फक्त १४,८९९ रुपयांना खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google company has now announced a huge discount on its older phone pixel 7 pdb

First published on: 08-10-2023 at 19:01 IST
Next Story
आता आयफोननंतर एलॉन मस्कचं ‘या’ स्मार्टफोनवर जडलं प्रेम, म्हणतात, “हा तर एकदम…”