मोटोरोला एक लोकप्रिय मोबाईल उत्पादन कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले स्मार्टफोन्स बाजारात सादर करत असते. कंपनीने नुकताच एक स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. मोटोरोला कंपनीने भारतात एज ५० (Edge 50) हा स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन जबरदस्त फीचर्ससह आकर्षक किमतीत लाँच करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. मोटोरोला कंपनीने लाँच केलेल्या Edge 50 या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि ऑफर्स याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Edge 50 स्मार्टफोनचे फीचर्स

मोटोरोला एज ५० मध्ये जगातील पहिला असा ट्रू कलर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांसाठी अनेक प्रकारची AI फीचर्स देखील दिले आहेत. या फोनचे भारतातील लॉन्चिंग हे जगातील स्तरावरील पहिले आहे. यामध्ये AI पॉवर्ड प्रो ग्रेड कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा पॅंटोन फीचर्ससह येतो. यामुळे ग्राहकांना फोटो खूप चांगल्या क्वालिटीचे काढता येतात. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि १० मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स पाहायला मिळते. तसेच OIS सह हायब्रीड झूम लेन्स देखील मिळणार आहे.

(हे ही वाचा : नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी? )

या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन ७ Gen ३ प्रोसेसर, pOLED डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा १४४ Hz इतका असणार आहे. यात ६.७ इंच आकाराचा डिस्प्ले मिळेल. तसेच अँड्रॉइड १४ आधारित Hello UI हे फिचर देखील मिळेल. कंपनी या फोनला तीन ऑपरेटिंग सिस्टीम आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट ऑफर करणार आहे. मोटोरोला एज 50 प्रो मेटल फ्रेम्ससह सिलिकॉन वेगन लेदर फिनिशमध्ये तयार करण्यात आला आहे. मोटोरोला एज 50 प्रो मध्ये एआय जनरेटिव्ह थीमिंग, एआय फोटो एन्हांसमेंट इंजिन, एआय अडॅप्टिव्ह स्टेबिलायझेशन आणि अन्य फीचर्स मिळतात. या फोनला चार्जिंगसाठी १२५W टर्बोपावर TM चार्जिंग आणि १०W रिव्हर्स पॉवर शेअरिंगसह सेगमेंटचे पहिले आणि एकमेव टर्बोपावर TM ५०W वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आले आहे. या फोनला ४,५०० mAh क्षमतेची बॅटरी मिळते.

काय आहे किंमत आणि ऑफर्स?

८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३१,९९९ रुपये तर १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३५,९९९ रुपयांना लाँच करण्यात आले आहे. एक्सचेंज केल्यास यावर २ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. एचडीएफसी बँक कार्डवर २,२५० रुपयांचा डिस्कांउंट मिळणार आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डवर २,००० रुपयांची त्वरित सूट मिळेल. याव्यतिरिक्त, ग्राहक एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील मिळवू शकतात. ग्राहक हा फोन फ्लिपकार्ट, Motorola.in आणि भारतातील आघाडीच्या रिटेल स्टोअरवर मर्यादित कालावधीच्या शुभारंभ ऑफरसह फक्त २७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.