One Plus कंपनीचे स्मार्टफोन सध्या बाजारामध्ये लोकप्रिय स्मार्टफोन्स आहेत. वनप्लस एक प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स ज्यामध्ये फीचर्स आणि टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केलेला असतो असे फोन लॉन्च करत असते. आतासुद्धा लवकरच कंपनीचा OnePlus Nord CE 3 Lite स्मार्टफोन लॉन्च होणार आहे मात्र लॉन्च होण्यापूर्वीच या फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

OnePlus Nord CE 3 Lite भारतात 4 एप्रिल रोजी लॉन्च होणार आहे. OnePlus Nord CE 3 Lite चा टिझर देखील कंपनीने सादर केला आहे. फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे याची माहिती कंपनीने दिली आहे. या स्मार्टफोनसोबत OnePlus Nord Buds 2 सुद्धा कंपनी लॉन्च करणार आहे.

हेही वाचा : Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमधील नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्याने शेअर केली भावूक पोस्ट; म्हणाला, “पहिलीच नोकरी…”

OnePlus Nord CE 3 Lite या फोनबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना यामध्ये एलसीडी डिस्प्ले वापरायला मिळू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट हा १८०० २४०० पिक्सेल इतका असणार आहे. अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. OnePlus Nord CE 3 Lite ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर मिळणार आहे.

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास वनप्लसच्या या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यामध्ये १०८ मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स, ज्याचे अपर्चर f/1.8 इतके असू शकते. बाकी दोन लेन्समध्ये २ मेगापिक्सलचे मॅक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलची डेप्थ सेन्सर असे फिचर मिळू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो.

हेही वाचा : 5G सेवेमध्ये Airtel ने रिलायन्स जीओला मागे टाकले, ‘इतक्या’ शहरांत हायस्पीड इंटरनेट सेवा सुरू

OnePlus Nord CE 3 Lite लवकरच लॉन्च होणार आहे. त्याआधीच त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. लीक झालेल्या फीचर्सनुसार वापरकर्त्यांना यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला ६७W चे SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनचे एकूण वजन हे १९५ ग्रॅम इतके असणार आहे. नेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi, GPS, NFC आणि USB टाइप-सी पोर्ट असे फिचर मिळणार आहेत. हा फोन लेमन कलरमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oneplus launched nord ce 3 lite smartphone 4 april features leaked before launching tmb 01
First published on: 26-03-2023 at 08:15 IST