व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या | WhatsApp new picture in picture mode Feature know what is the use | Loksatta

व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या

WhatsApp New Feature : व्हिडीओ कॉलशी संबंधित व्हॉटसअ‍ॅपचे नवे फीचर काय आहे जाणून घ्या

व्हिडीओकॉल सुरू असताना वापरता येणार दुसरे अ‍ॅप्स; काय आहे WhatsApp चे नवे फीचर जाणून घ्या
व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ कॉलशी निगडित नवे फीचर रोलआउट होणार आहे (फोटो : Freepik)

व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉटसअ‍ॅप वापरत नसतील असे क्वचित काहीजण तुमच्या संपर्कात असतील. वापरण्यासाठी सोपे असणारे आणि सर्वांकडे उपलब्ध असल्यामुळे पटकन संपर्क साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा वापर केला जातो. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्ससाठी सतत नवनवे फीचर लाँच केले जातात. असेच एक व्हिडीओ कॉलशी संबंधित नवे फीचर लवकरच रोल आउट होणार आहे. काय आहे हे फीचर जाणून घ्या.

व्हॉटसअ‍ॅपवरील व्हिडीओ कॉलचा आपण सगळेच वापर करतो, पण हा व्हिडीओकॉल सुरू असताना आपल्याला इतर अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. जर तुम्ही व्हिडीओ कॉल सुरू असताना बॅक बटण निवडले तर स्क्रिन ऑफ होते. यामुळे व्हिडीओ कॉल सुरू असताना इतर अ‍ॅप्स वापरता येत नाहीत. पण आता यावर लवकरच एक पर्याय उपलब्ध होणार आहे, हा पर्याय म्हणजे व्हॉटसअ‍ॅपचे नवे फीचर. हे फीचर वापरून व्हॉटसअ‍ॅप व्हिडीओ कॉल सुरू असताना इतर अ‍ॅप्स वापरता येणार आहेत.

आणखी वाचा: सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर

व्हॉटसअ‍ॅपच्या या नव्या फीचरचे नाव ‘पिक्चर इन पिक्चर मोड’ आहे. याची माहिती ‘व्हॉटसअ‍ॅप बीटा इन्फो’कडुन देण्यात आली आहे. हे फीचर सध्या फक्त निवडक आयओएस बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 20:04 IST
Next Story
अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट