कंपनीने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) २०२४ मध्ये शाओमी १४ सिरीजची घोषणा केली आहे. यामध्ये शाओमी 14, शाओमी 14 प्रो आणि शाओमी 14 अल्ट्राची आदींचा समावेश आहे. तर आता शाओमी १४ सिरीज ( Xiaomi 14) ७ मार्च रोजी भारतात अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. तसेच या स्मार्टफोनची किंमत ७५,००० हजार रुपयांपेक्षा कमी असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाओमीने कंपनीने MWC २०२३ मध्ये स्मार्टफोन तयार करण्यासाठी जर्मनीमधील कॅमेरा मेकर कंपनी Leica बरोबर पार्टनरशिप केली होती. Leica त्याच्या उत्तम कॅमेऱ्यांसाठी ओळखले जातात आणि गुणवत्ता राखण्यावर भर देतात. शाओमीबरोबर भागीदारी करून फोन कॅमेऱ्यांमध्ये “Leica लूक” आणण्याचे Leica चे उद्दिष्ट आहे. Leica शाओमीबरोबर त्यांचे आयकॉनिक कॅमेरा वन इंच सेन्सरवर स्मार्टफोनसाठी काम करत आहोत.

हेही वाचा…‘या’ कंपनीने लाँच केलं सर्वात स्लिम स्मार्टवॉच; कॅलक्युलेटरपासून ते ब्लूटूथ कॉलिंगपर्यंत असणार फीचर्स खास

तर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी शाओमी १४ सिरीजबद्दल पाच महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

१. शाओमी १४ सिरीजमध्ये १२ जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेट असेल. तसेच याव्यतिरिक्त कमी रॅम आणि स्टोरेज असलेली मॉडेल्सही असू शकतात.

२. शाओमी १४ सिरीजमध्ये ४,६१० एमएएच बॅटरी वापरली जाईल. हे ९० डब्ल्यू वायर्ड, ५० डब्ल्यू W वायरलेस आणि १० डब्ल्यू रिव्हर्स वायरलेस चार्जिंग सपोर्टसह परिपूर्ण असणार आहे .

३. शाओमी १४ सिरीज ओएस सह लॉन्च होणारा दुसरा फोन आहे. पोको एक्स६ प्रो ( Poco X6 Pro) हे भारतात प्री-इंस्टॉल केलेले HyperOS सह लॉन्च होणारे पहिले उपकरण होते.

४. शाओमीच्या नवीन सिरीजमध्ये ६.३६ इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले ; ज्यामध्ये १.५के रिझोल्यूशन आणि १२० एचझेडपर्यंत रिफ्रेश रेट असणार आहे . हे ३,००० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देखील देईल.

५. शाओमी १४ सिरीज तीन मुख्य कॅमेऱ्यांसह येईल ; ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५०-मेगापिक्सेल हंटर ९०० सेन्सर, ५० मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेरा आणि अल्ट्रा वाइड एंगल लेन्ससह सुसज्ज दुसरा ५० मेगापिक्सेल सेन्सर. याव्यतिरिक्त, यात सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा सुद्धा दिला जाणार आहे . तर ७ मार्च रोजी जबरदस्त कॅमेरा फीचर्स असणारा हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xiaomi company 14 series in india launch on march seven five things about the phone you must know before buy asp