Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार १४ ऑगस्ट २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार धनू राशीच्या व्यक्तींना रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, रविवार १४ ऑगस्ट २०२२
आजचे राशीभविष्य १८ ऑगस्ट, (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 14 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. आनंद वार्ता कानी पडतील. जोडीदाराचे सौख्य वाढेल. अति उत्साह दाखवू नका. जुन्या मित्रांची चांगली साथ लाभेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

आर्थिक योजना गुप्ततेने कराव्यात. शहानिशा केल्याशिवाय गुंतवणूक करू नका. नातेवाईक नाराज होऊ शकतात. डोळ्यांची काळजी घ्यावी. बोलण्यातून गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

योग्य शहानिशा केल्याशिवाय कामे करू नका. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. आरोग्यात सुधारणा होईल. अनावश्यक खर्च टाळावेत. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील॰

कर्क (Cancer Horoscope Today ):-

संधीचे सोने करायला शिका. गृहीणींवरील ताण वाढू शकतो. कठोर परिश्रमाचे चीज होईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आवड पूर्ण करताना खर्चाकडे लक्ष ठेवा.

सिंह (Leo Horoscope Today ):-

स्वत:चेच मत खरे करायला जाऊ नका. खेळकरपणे कामे हाताळाल. बौद्धिक ताण जाणवेल. डोकेदुखीचा त्रास संभवतो. प्रलोभनापासून दूर राहावे.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

मानसिक ताण बाजूला सारा. सकारात्मक विचारसरणीचा मार्ग धरावा. जवळच्या मित्राकडून आधार मिळेल. पालकांचे सहकार्य घ्यावे. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

तूळ (Libra Horoscope Today ):-

आवडी-निवडीवर अधिक खर्च कराल. आवडत्या छंदाला वेळ द्यावा. आजचा दिवस शुभ कारक. इतरांच्या चांगल्याचा विचार करावा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. मित्राला मदत कराल. प्रिय व्यक्तिला भेटण्याची ओढ वाटेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी घटना मन खिन्न करू शकते.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

रागावर नियंत्रण ठेवावे. नातेवाईकांची नाराजी सहन करावी लागेल. मुलांविषयी मनात नाराजी उत्पन्न होईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. आहारावर नियंत्रण ठेवावे.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

स्वत:च स्वत:ची अवहेलना करू नका. जुनी कामे निघतील. कौटुंबिक शांतता जपावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे. आवडत्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा माराल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. अधिकाराचा सुयोग्य वापर करावा. बुद्धी आणि विवेक कमी लावावेत. जोडीदाराचे मत ग्राह्य धरावे लागेल. भागीदारीत वर्चस्व दाखवाल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

कुटुंबातील लोकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात. जनसंपर्कात भर पडेल. मनोबल वृद्धिंगत होईल. स्वभावातील उधळेपणा ओळखावा. चटकन नाराजी दर्शवू नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कर्क राशीत बनली सूर्य आणि शुक्र यांची युती! ‘या’ ३ राशींचे बदलू शकते भाग्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी