वर्ष २०२२ मधील शेवटचा महिना सर्वच राशींसाठी चांगला काळ घेऊन येणार असे ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळेच या महिन्याच्या शेवटच्या २० दिवसांमध्ये काही राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्योतिष शास्त्रानुसार १६ डिसेंबरला सूर्यदेव धनु राशीमध्ये प्रवेश करणार असून २८ डिसेंबरला बुधदेव तर २९ डिसेंबरला शुक्रदेव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. या तीन ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा फायदा कोणकोणत्या राशींना होणार आहे हे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • मेष

मेष राशीच्या लोकांना डिसेंबर महिन्यातील शेवटचे २० दिवस लाभदायक सिद्ध होण्याची संभावना आहे. बुध, शुक्र आणि सूर्याच्या राशी संक्रमणामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात घरात सुख-समृद्धी येऊन सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याचीही संभावना आहे. हे लोक या कालावधीमध्ये बचत करण्यात यशस्वी ठरू शकतात.

शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ राशींना मिळणार ‘दरिद्र’ योगातून मुक्ती; ‘अच्छे दिन’ सुरु होण्याची शक्यता

  • कन्या

या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात फायदा होण्याचीही संभावना आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो.

  • वृश्चिक

या राशीच्या लोकांना बुध आणि सूर्याच्या राशी संक्रमणाचा फायदा होऊ शकतो. या कालावधीमध्ये त्यांना कुटुंबियांची संपूर्ण साथ मिळेल. त्याचप्रमाणे यादरम्यान एखादी जुनी समस्या सोडवली जाऊ शकते. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हा काळ शुभ सिद्ध होऊ शकतो.

१२ वर्षांनी तयार होणाऱ्या ‘नवपंचम’ योगामुळे ‘या’ राशींना आकस्मिक धनलाभाची संधी; पाहा तुम्हीही आहात का नशीबवान

  • मीन

या काळात या राशीच्या लोकांना करिअरशी निगडीत अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे मालमत्ता आणि धनशी संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनाही या काळात फायदा होऊ शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार या लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last 20 days of 2022 will be lucky for this zodiac sign fortune may shine with the blessings of mercury venus and surya pvp