Budh Gochar in Aries: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो. या ग्रहांचा सर्व बारा राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला व्यापार, बुद्धिमत्ता, तर्क, अर्थव्यवस्था, वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. ग्रहांचा राजकुमार अशी ओळख असलेला बुध ग्रह लवकरच आपलं राशी स्थान बदलणार आहे. २६ मार्च रोजी बुध हा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. बुधदेवाच्या राशी बदलामुळे काही राशींना व्यापारात मोठा धनलाभ, करिअरमध्ये यश आणि जीवनात सुख लाभण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशींवर होणार धनवर्षाव!

मेष राशी

बुधाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. कारण बुधदेव तुमच्याच राशीत गोचर करणार आहेत. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. पैशाची आवक वाढू शकते. बुध गोचराच्या प्रभावामुळे तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: १५ मार्चपासून ‘या’ राशींना अचानक मिळणार भरपूर पैसा? मंगळ गोचर करताच शनिदेवाच्या कृपेने होऊ शकता श्रीमंत )

मिथुन राशी

बुधदेवाचे राशी बदल मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरु शकते. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती मिळण्याची शक्यता आहे. परदेशातून लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. व्यापारी वर्गाला यावेळी चांगला लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदू शकते.

मीन राशी

बुधदेवाचे गोचर मीन राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे.  बेरोजगारांना नोकरीची उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढण्याची शक्यता आहे.

(टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mercury transit 2024 budh transit in aries positive impact of these zodiac sing can get huge money pdb