Name Astrology : ‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या लोकांची प्रेमात होते फसवणूक; जाणून घ्या, तुमचा तर यात समावेश नाही

नावाच्या पहिल्या अक्षरावरून हे देखील कळू शकते की त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खरे प्रेम मिळेल की नाही.

People whos name start with this letter are deceived in love
जाणून घेऊया अशा नावाच्या काही लोकांबद्दल ज्यांची प्रेमात अनेकदा फसवणूक होते. (File Photo)

ज्योतिष शास्त्रामध्ये नावाचे पहिले अक्षर एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि त्याच्या आयुष्यातील अनेक पैलूंबद्दल सांगते. नावाच्या पहिल्या अक्षरावरून हे देखील कळू शकते की त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात खरे प्रेम मिळेल की नाही. खरे प्रेम जरी मिळाले तरी त्याला आयुष्यभर सोबत देईल की नाही, म्हणजेच त्याला आपल्या जोडीदारासोबत लग्न करता येईल की ते वेगळे होतील, याबद्दलही जाणून घेता येते. चला तर मग जाणून घेऊया अशा नावाच्या काही लोकांबद्दल ज्यांची प्रेमात अनेकदा फसवणूक होते.

  • ज्या लोकांचे नाव B ने सुरू होते

B ने सुरू होणारे लोक खूप भावनिक असतात. रोमान्सच्या बाबतीत त्यांचे विचार खुले असतात. हे लोक लगेचच सुंदर लोकांकडे आकर्षित होतात आणि प्रेमात पडतात. या गोष्टीमुळे ते अनेकदा प्रेमात फसतात.

जुलै महिन्यात ‘या’ राशींच्या लोकांवर होणार कुबेराची कृपा; अचानक मोठा धनलाभ होण्याचे संकेत

  • ज्यांचे नाव E ने सुरू होते

ज्या लोकांचे नाव E ने सुरु होते, ते सहज कोणाच्याही प्रेमात पडतात आणि आपल्या जोडीदाराप्रती गंभीरही होतात. ते कोणतीही पडताळणी न करता प्रेमात पडतात यामुळेच त्यांना प्रेमात फसवणुकीचा सामना करावा लागतो.

  • ज्यांचे नाव M ने सुरू होते

असे लोक खूप चांगले जीवनसाथी सिद्ध होतात, कारण ते आपल्या जोडीदाराशी खूप एकनिष्ठ असतात. ते आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात, तरीही त्यांची प्रेमात फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.

  • ज्याचे नाव Q अक्षराने सुरू होते

अशा लोकांना आयुष्यात सर्व काही मिळते, पण प्रेमाच्या बाबतीत त्यांची झोळी रिकामीच राहते. विविध कारणांमुळे यांचे आपल्या जोडीदाराशी पटत नाही आणि ते प्रेमाच्या बाबतीत कमी नशीबवान ठरतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Name astrology people whos name start with this letter are deceived in love know that yours is not included pvp

Next Story
Zodiac Signs: २७ जूनपासून ‘या’ ४ राशींचे सुरु होतील चांगले दिवस, येणारे ७ दिवस ठरतील वरदान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी